Sharad Pawar | ‘तो’ फोटो का शेअर केला? शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना फटकारलं

शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना राज्यसभेत भेट झाली तेव्हा चांगलंच फटकरल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. शरद पवार संतापण्यामागे प्रफुल्ल पटेल यांनी शेअर केलेला एक फोटो होता. याच फोटोवरुन शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना समोरासमोर खडेबोल सुनावलं.

Sharad Pawar | 'तो' फोटो का शेअर केला? शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना फटकारलं
Follow us
| Updated on: Sep 22, 2023 | 4:50 PM

संदीप राजगोळकर, Tv9 मराठी, नवी दिल्ली | 22 सप्टेंबर 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल यांची नुकतीच नव्या संसद भवनाच्या कॅफेटेरिया येथे भेट झाली होती. यावेळी प्रफुल्ल पटेल यांनी शरद पवार यांच्यासोबत फोटो काढलेला. तसेच पटेल यांनी हा फोटो सोशल मीडियावरही शेअर केला होता. त्यामुळे राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेलं. अखेर या प्रकरणी शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांची कानउघाडणी केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.

राज्यसभेचे 18 सप्टेंबर ते 21 सप्टेंबर या चार दिवसांसाठी विशेष अधिवेशन बोलवण्यात आलं होतं. या अधिवेशनाच्या निमित्ताने शरद पवार आणि प्रफुल्ल पटेल दिल्लीत आले होते. दोन दिवसांपूर्वी शरद पवार राज्यसभेत पोहोचले तेव्हा प्रफुल्ल पटेल हे देखील पोहोचले होते. यावेळी दोन्ही नेत्यांमध्ये फोटो सेशन झालं होतं. त्यानंतर प्रफुल्ल पटेले यांनी आपल्या अधिकृत ट्विरवर अकाउंटवर शरद पवार यांच्यासोबतचा फोटो शेअर केला होता.

शरद पवार यांच्या प्रश्नावर पटेल काय म्हणाले?

प्रफुल्ल पटेल यांनी फोटो शेअर केल्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात विविध चर्चांना उधाण आलं होतं. राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्येही या फोटोची चर्चा झाली होती. त्यानंतर संसदेचा काल शेवटचा दिवस होता. यावेळी प्रफुल्ल पटेल आणि शरद पवार समोरासमोर आले. शरद पवार यांनी प्रफुल्ल पटेल यांना काल तुम्ही जे फोटो काढले ते सोशल मीडियावर का शेअर केले? असा प्रश्न विचारला. त्यांच्या या प्रश्नावर पटेल यांनी कोणतंही उत्तर दिलं नाही, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात फूट आहे की नाही?

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दोन्ही गटांची लढाई आता केंद्रीय निवडणूक आयोगात पोहोचली आहे. दोन्ही गटांकडून पक्षावर दावा सांगितला जातोय. दोन्ही गटांना निवडणूक आयोगाने नोटीस पाठवली. दोन्ही गटांनी लिखीत स्वरुपात निवडणूक आयोगात भूमिका देखील मांडली आहे. त्यानंतर निवडणूक आयोगाने 6 ऑक्टोबरला दोन्ही गटांना बोलावलं आहे. त्यामुळे आता दोन्ही गटाच्या प्रत्यक्ष सुनावणीला आता निवडणूक आयोगात सुनावणी होण्याची शक्यता आहे. असं असताना दोन्ही गटाकडून पक्षात फूटच पडलेली नाही, असं निवडणूक आयोगात सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे नेमकं खरं काय? याबाबत संभ्रम निर्माण झाल्याची चर्चा आहे.

शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप
शिंदे गटाचा अजितदादांना सरकारमधून बाहेर काढण्याचा प्लान, कोणाचा आरोप.
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी
जरांगेंविरोधात सगळा समाज उभा करायला वेळ लागणार, कोणी दिली उघड धमकी.
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील
'सुरतलुटी वेळी शिवरायांनी पत्र लिहीले...,' काय म्हणाले जयंत पाटील.
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ
रंगारी बदक चाळीच्या बाप्पाचं लंबोदर रुप पाहण्यासाठी भक्तांची रिघ.
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय...
गडकरी यांच्या घरी कच्च्याबच्च्यांनी गणपती आणलाय....
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?
कास पठाराचा हंगाम सुरु, मोठ्यांसाठी आणि शाळकरी मुलांसाठी किती शुल्क ?.
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा
मी फुंकलो असतो तरी राजे पडले असते, असं जरांगे म्हणाले, राऊत यांचा दावा.
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे
महाराष्ट्राच्या प्रगतीत कोणतेही अडथळे नकोत, अमृता फडणवीस यांचे साकडे.
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे
गणरायाच्या आगमनाने सुखसमृद्धी येवो, एकनाथ शिंदे यांचे गणरायाला साकडे.
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई
घरोघरी बाप्पाच्या आगमनाची तयारी, नैवेद्यासाठी 21 भाज्या खरेदीची घाई.