रोहित पवार यांच्यासाठी आज्जी धावली, चौकशी होईपर्यंत प्रतिभाताई पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात ठाण मांडणार

रोहित पवार यांची आज पुन्हा ईडीकडून चौकशी केली जात आहे. त्यांच्या ईडी चौकशीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभाताई पवार आज राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश कार्यालयात दाखल झाल्या आहेत. त्या आपल्या नातूला पाठिंबा देण्यासाठी दिवसभर प्रदेश कार्यालयात ठाण मांडून राहणार आहेत.

रोहित पवार यांच्यासाठी आज्जी धावली, चौकशी होईपर्यंत प्रतिभाताई पवार राष्ट्रवादीच्या कार्यालयात ठाण मांडणार
Follow us
| Updated on: Feb 01, 2024 | 3:22 PM

मुंबई | 1 फेब्रुवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार रोहित पवार यांची आज पुन्हा एकदा ईडी चौकशी करण्यात येत आहे. रोहित पवार यांची याआधीदेखील चौकशी करण्यात आली आहे. त्यानंतर आज पुन्हा रोहित पवारांना चौकशीसाठी ईडी कार्यालयात हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं होतं. त्यानुसार ते आज पुन्हा ईडी कार्यालयात दाखल झाले आहेत. रोहित पवार यांच्यावर ईडीकडून करण्यात येत असलेल्या कारवाईमुळे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे. अनेक कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. या कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात गर्दी केली आहे. या कार्यकर्त्यांनी ईडीच्या या कारवाईविरोधात प्रदेश कार्यालयाबाहेर आंदोलन सुरु केलं. यावेळी रोहित पवारांनी त्यांना आंदोलन न करण्याची विनंती केली.

रोहित पवार आज ईडी कार्यालयात चौकशीला जाण्यापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश कार्यालयात आले. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधला. विशेष म्हणजे रोहित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी त्यांच्या आजी आणि शरद पवार यांच्या पत्नी प्रतिभा पवार या स्वत: आज राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आल्या. त्यांनी रोहित पवारांना आशीर्वाद दिला. प्रतिभा पवार आज दिवसभर रोहित पवार यांची ईडी चौकशी पूर्ण होत नाही तोपर्यंत राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात राहणार आहेत. प्रतिभा पवार यांच्यासह रोहित पवार यांचे वडील राजेंद्र पवार हे देखील आज राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात ठाण मांडून बसणार आहेत. रोहित पवार ईडी कार्यालयात जात असताना त्यांच्यासोबत त्यांच्या पत्नी कुंती पवार आणि बहीण रेवती सुळे या देखील प्रदेश कार्यालयात उपस्थित होत्या.

‘मी कुठेही चुकीची गोष्ट केलेली नाही’

रोहित पवारांनी ईडी कार्यालयात जाण्यापूर्वी प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. “मी व्यवसायात कुठेही चुकीची गोष्ट केलेली नाही. मी आधी व्यवसायात आलो आहे आणि नंतर राजकारणात आलो आहे. अशी अनेक लोक आहेत की जे पहिल्यांदा राजकारणात आले आहेत. नंतर व्यवसायात आले आहेत. पण त्यांना कोणतीही अडचणी आलेल्या नाही. मी व्यवसाय करत असताना अनेक अडचणी आल्यात तेव्हा देखील मी संघर्ष केला आहे आणि आज राजकारणात आल्यानंतर संघर्ष करत आहे. येथून पुढेही मला संघर्ष करावा लागणार आहे. आज महाराष्ट्रातील लोक अनेक वेगवेगळ्या पद्धतीने संघर्ष करत आहेत”, अशी प्रतिक्रिया रोहित पवारांनी दिली.

‘मला ज्या केससाठी समन्स आला त्यात…’

“तुम्ही जे काही बोललात, ते ईओडब्ल्यू यांनी क्लोजर रिपोर्ट न्यायालयात 20 तारखेला दाखल केला आहे. 19 जानेवारीला मला नोटीस आली. 20 जानेवारीला ईओडब्ल्यूने क्लोजर रिपोर्ट फाईल केला आहे. याबाबतची माहिती पत्रकारांच्या माध्यमातून मिळाली आहे. तो क्लोजर रिपोर्ट मिळावा यासाठी आम्ही न्यायालयात पत्र दिले आहे. क्लोजर रिपोर्ट कधी दिला जातो जेव्हा त्या केसमध्ये तथ्य नाही. मला ज्या केससाठी समन्स आला आहे. त्यात अनेक लोकांची नावे आहेत. त्या क्लोजर रिपोर्टमध्ये काय लिहिले आहे हे त्यांची माहिती घेतल्यानंतर कळेलच. ईडीचे अधिकारी त्यांचे काम करत आहेत. मी अधिकाऱ्यांच्या विरोधात नाही. शेवटी समन्स आला असेल माहिती मागितली असेल तर ती देण्याची जबाबदार नागरिक म्हणून माझी आणि मी ते करत आहे”, असं रोहित पवार म्हणाले.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.