तिन्ही कृषी कायदे रद्द व्हावे हीच राष्ट्रवादीची भूमिका, माध्यमांकडून मात्र लोकांची दिशाभूल : नवाब मलिक
केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्याला महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांचा विरोध आहे, अशी स्पष्ट भूमिकाही नवाब मलिक यांनी मांडली.
मुंबई : केंद्र सरकारच्या तिन्ही कृषी कायद्यांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सल्ला दिलेला नाही. तिन्ही कृषी कायदे रद्द झाले पाहिजेत हीची पक्षाची स्पष्ट भूमिका आहे. मात्र काही माध्यमातून उलटसुलट बातम्या करुन लोकांची दिशाभूल करण्यात येत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी केला आहे. (NCP has demanded that All three agricultural laws should be repealed buy media misleading people : Nawab Malik)
केंद्राच्या तिन्ही कृषी कायद्याला महाविकास आघाडी सरकारमधील तीनही पक्षांचा कालपण विरोध होता, आजही आहे आणि उद्यादेखील असेल, अशी स्पष्ट भूमिकाही नवाब मलिक यांनी मांडली.
विधानसभेत याविरोधात प्रस्ताव पारित करण्याचे सरकारकडून काम होणार आहे. त्या कायद्याचा अभ्यास करण्यासाठी समिती नेमण्यात आली होती. ही समिती सर्व गोष्टींचा अभ्यास करेल त्यानंतर ती समिती शेतकऱ्यांच्या नेत्यांशी बोलेल. नंतर मसुदा तयार करुन पुढे कसं जायचं. शेतकऱ्यांना तो मसुदा मंजूर होणार नाही तोपर्यंत सरकार पुढे जाणार नाही, असेही नवाब मलिक यांनी स्पष्ट केले.
शरद पवार यांनी पत्रकारांना केंद्र सरकारमधील हालचालींची याबाबतीत माहिती दिली होती. केंद्रीय कृषिमंत्र्यांनी त्याचे स्वागत केले म्हणजे तिन्ही कृषी कायद्याबाबत पवार यांनी सल्ला दिला, असा होत नाही असेही नवाब मलिक यांनी सांगितले.
आमच्या सरकारचा व आमच्या पक्षाचा सुरुवातीपासूनच तिन्ही कृषी कायद्यांना कायम विरोध राहिलेला आहे हे पुन्हा एकदा नवाब मलिक यांनी ठणकावून सांगितले आहे.
इतर बातम्या
दोन नेते एकमेकांना भेटू शकतात, प्रवीण दरेकरांनी वाढवलं राऊत-शेलार भेटीचं गूढ
VIDEO: 54 साखर कारखान्यांची चौकशी करा; चंद्रकांतदादा अमित शहांना पत्रं लिहिणार
(NCP has demanded that All three agricultural laws should be repealed buy media misleading people : Nawab Malik)