कोरोना काळातील अनाथांसाठी राष्ट्रवादीची ‘राष्ट्रवादी जिवलग’ योजना; गुरुवारपासून योजनेला सुरुवात

राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वाची योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. (NCP launch scheme for children orphaned due to Covid)

कोरोना काळातील अनाथांसाठी राष्ट्रवादीची 'राष्ट्रवादी जिवलग' योजना; गुरुवारपासून योजनेला सुरुवात
उपमुख्यमंत्री अजित पवार
Follow us
| Updated on: Jul 21, 2021 | 12:42 PM

मुंबई: राष्ट्रवादीचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेसने महत्त्वाची योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोना काळात अनाथ झालेल्या मुलांच्या देखभालीसाठी राष्ट्रवादीने ‘राष्ट्रवादी जिवलग’ योजना लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. उद्या गुरुवारपासूनच ही योजना लागू केली जाणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. (NCP launch scheme for children orphaned due to Covid)

राष्ट्रवादीच्या नेत्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आज दिल्ली येथून फेसबुक लाईव्हवरून या योजनेची घोषणा केली. कोरोना काळात राज्यात अनाथ झालेल्या 450 मुलांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या माध्यमातून अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त उद्यापासून ‘राष्ट्रवादी जीवलग’ ही योजना सुरू करण्यात येत असल्याची घोषणा केली. राज्यात कोरोना काळात अनाथ झालेल्या 450 मुलांसाठी प्रेमाचा आधार म्हणून ‘राष्ट्रवादी जीवलग’ ही योजना सुरू करण्यात येत आहे, असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

अनाथांसाठी ‘राष्ट्रवादी दूत’

या योजनेचा पहिला टप्पा एक वर्षाचा असून यासाठी पक्षातील प्रत्येकी एक सहकारी असे 450 जण या 450 कुटुंबांशी म्हणजे त्या अनाथ मुलांशी जोडले जाणार आहेत. यासाठी राष्ट्रवादीने ‘राष्ट्रवादी दूत’ निर्माण केले आहेत. यात अनाथ मुलींसाठी पक्षातील महिला, युवती तर मुलांसाठी युवक किंवा पुरुष कार्यकर्ते ‘राष्ट्रवादी दूत’ म्हणून काम पाहतील, अशी माहिती त्यांनी दिली.

घरोघरी जाऊन माहिती घेणार

‘राष्ट्रवादी दूत’ या 450 अनाथ मुलांच्या घरी जातील. या मुलांच्या काय गरजा आहेत, त्यांची अडचण समजून घेऊन ती माहिती पक्षाकडे देतील. शिवाय या अनाथ मुलांची माहिती प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांकडे उपलब्ध आहे. तो डाटाही जमा केला जाईल आणि यातून एक व्यापक कार्यक्रम व पारदर्शक कारभार केला जाणार आहे. शिवाय यांची इत्यंभूत माहिती पक्षाच्या वेबसाईटवर व स्वतः माझ्या पेजवर उपलब्ध राहील, असेही त्यांनी स्पष्ट केलं. या अनाथ मुलांच्या आयुष्यात आई-वडिलांची पोकळी निर्माण झाली आहे. ती पोकळी भरून काढण्याचे काम राष्ट्रवादी काँग्रेस व राष्ट्रवादी वेल्फेअर ट्रस्टच्या ‘राष्ट्रवादी जीवलग’ या योजनेतून केले जाणार आहे. (NCP launch scheme for children orphaned due to Covid)

संबंधित बातम्या:

VIDEO: दोन डोस घेतलेल्यांना बाहेर पडू द्या; अजित पवार मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंशी चर्चा करणार

केंद्राने लेखी सांगितलंय, जातनिहाय जनगणना नाही, डाटाही देणार नाही, आता भाजपने बोलावं : विजय वडेट्टीवार

पुण्यात हिताची बँकेच्या ATM मध्ये स्फोट, चोरीच्या उद्देशाने एटीएम उडवल्याचा संशय

(NCP launch scheme for children orphaned due to Covid)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.