कितीही संकट येवोत, महाराष्ट्र कधीही झुकला नाही, झुकणार नाही: अजित पवार
राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधतना अजित पवार बोलत होते.
मुंबई: राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आलं. आपलं सरकार स्थिरस्थावर होत नाही तोच कोरोनाचं संकट आलं. मधल्या काळात राज्यात दोन वादळं येऊन गेली. या संकटाचा आघाडी सरकारने सामना केला, असं सांगतानाच कितीही संकट येवोत, आव्हान येवोत महाराष्ट्र कधी झुकला नाही आणि झुकणार नाही, असं राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ठणकावून सांगितलं. (ncp leader ajit pawar address NCP foundation day)
राष्ट्रवादी काँग्रेसचा आज 22 वा वर्धापन दिन आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात कार्यकर्त्यांशी संवाद साधतना अजित पवार बोलत होते. राज्यात आघाडीचं सरकार आल्यानंतर नैसर्गिक संकटं आली. या संकटाचा आपण सामना केला. यापुढेही आपल्याला आव्हानाचं रुपांतर संधीत करावं लागणार आहे. महाविकास आघाडी सरकारने लोककल्याणाची कामं केली आहेत. ही कामे लोकांपर्यंत पोहोचवली पाहिजे, असं पवार म्हणाले.
संविधान वाचवण्याचं आव्हान
केंद्रात भाजपचं सरकार आहे. या सरकारने देशातील एकता आणि आखंडतेला धक्का देण्याचं काम सुरू केलं आहे. लोकशाही संस्था मोडीत काढण्याचं काम सुरू केलं आहे. पत्रकारांपासून अनेक घटकांची मुस्कटदाबी सुरू आहे. लोकशाहीला झुंडशाहीचं स्वरुप देण्याचं काम सुरू आहे. संविधान वाचवण्याचं आव्हान उभं राहिलं आहे. अशावेळी लोकशाही टिकवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस ठामपणे उभी राहिली आहे, असं ते म्हणाले.
महाराष्ट्राच्या विकासावर परिणाम
कोरोनाच्या संकटामुळे देशाची अर्थव्यवस्था ढासळली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या विकासावरही त्याचा परिणा झाला आहे, असं ते म्हणाले. भाजपचं केंद्रात सरकार आल्यापासून देशात महागाई वाढली आहे. पेट्रोल-डिझेलपासून ते स्वयंपाकाचा गॅसही महागला आहे, असं त्यांनी सांगितलं. कोरोनाच्या संकटात महाविकास आघाडीने लोकांना प्रचंड मदत केली. बेड, औषधे, अन्यधान्य आणि इतर शक्य ती मदत देण्याचं काम आपण केलं आहे. कोरोनाचं संकट दूर होईपर्यंत आपल्याला ही मदत करावी लागणार आहे, असंही ते म्हणाले. (ncp leader ajit pawar address NCP foundation day)
VIDEO : MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7.30 AM | 10 June 2021https://t.co/SPrmCv1eJS
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 10, 2021
संबंधित बातम्या:
मुंबईकर शिवसेनेला महापालिका निवडणुकीत जागा दाखवून देतील: चंद्रकांत पाटील