BREAKING | बारसू रिफायनरी प्रकल्पाला अजित पवार यांचा पाठिंबा की विरोध? पाहा नेमकं काय म्हणाले

बारसू रिफायनरी प्रकल्पावरुन चांगलाच वाद चिघळलेला बघायला मिळत आहे. स्थानिकांचा या प्रकल्पाला विरोध होताना दिसत आहे. त्यामुळे ठाकरे गट आंदोलकांच्या बाजूने उभा आहे. या दरम्यान आज चांगलाच गदारोळ बघायला मिळाला. त्यानंतर आता अजित पवार यांनी आपली भूमिका मांडली आहे.

BREAKING | बारसू रिफायनरी प्रकल्पाला अजित पवार यांचा पाठिंबा की विरोध? पाहा नेमकं काय म्हणाले
Follow us
| Updated on: Apr 28, 2023 | 6:30 PM

पुणे : बारसू रिफायनरी प्रकल्पाचा वाद चिघळलेला असताना आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी आपली भूमिका मांडलीय. “ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी पहिल्यांदा पत्र दिलं आहे. आता उद्धव ठाकरेंनी आपण जनतेच्या सोबत आहे, असं म्हटलंय. प्रकल्पाचा जनतेचा विरोध असल्याने आपण विरोध करत असल्याची भूमिका उद्धव ठाकरे यांची आहे. ही त्यांची भूमिका आहे”, असं अजित पवार म्हणाले. “राष्ट्रवादी काँग्रेसची भूमिका विकासकामांच्या बाबतीत नेहमी पॉझिटिव्ह राहिली आहे. तुम्ही राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांचीही भूमिका ऐकली असेल. पण पर्यावरणाचा ऱ्हास होत असेल तर प्रकल्पाचा फेरविचार व्हावा”, असं अजित पवार म्हणाले.

“आमचं मत असं आहे की, आज प्रचंड महागाई आणि बेरोजगारी आहे. अशावेळेस काही प्रकल्प महाराष्ट्रापासून दूर गेलेले आपण पाहिले, ज्यातून काही लाख तरुण-तरुणींना रोजगार मिळणार होता. आता यातून रोजगार मिळून तिथे कुठल्याही प्रकारचे दुष्परिणाम होणार नसतील, तिथे पिढ्यांपिढ्या तिथल्या वातावरणावर परिणाम होणार नसेल, तिथल्या निसर्ग सौंदर्यावर परिणाम होणार नसेल, तिथल्या फळांची शेतीवर परिणाम होणार नसेल…”, असं अजित पवार म्हणाले.

“माझ्या माहितीप्रमाणे काल उदय सामंत मला म्हणाले की, दादा एकही घर उठवलं जात नाहीय. एकही गाव उठवलं जात नाहीय. तिथे कुणाचं घर-गाव उठवलं जात नाहीय. मग आता प्रश्न आला की, ज्यांच्या जमिनी आहेत त्यांना योग्य मोबदला मिळाला पाहिजे, याबद्दल अशाही बातम्या ऐकायला मिळत आहेत की, परराज्यातील लोकांनी तिथे जमिनी घेऊन ठेवल्या आहेत. याबद्दल शहानिशा करावी. स्थानिकांना फायदा होणार असेल तर तो स्थानिकांना व्हावा. नुकसान होणार असेल, पर्यावरणाचा ऱ्हास होणार असेल तर त्या प्रकल्पाच्या बाबतीत फेरविचार व्हावा”, असं अजित पवार म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“उदय सामंत यांनी स्वत: येऊन शरद पवार यांना माहिती दिली. मी स्वत: कलेक्टरशी बोललो. तिथल्या एसपींशी बोललो. त्यांच्याकडून वेगळ्या पद्धतीने फिडबॅक मिळाला. काही लोकं तिथे झोपले आहेत, असं आपण पाहिलं”, असं अजित पवार म्हणाले.

“काही जणांचा म्हणणं आहे की, तिथे स्थानिकांची संख्या कमी आहे. बाहेरचीच लोकं तिथे आलेली आहेत. त्याची शहानिशा केली पाहिजे. ज्यांच्या जमिनीवर प्रकल्प होणार आहे त्यांचा विरोध एकवेळ समजू शकतो. किंवा पर्यावरणाचा ऱ्हास होणार आहे तर आपल्या राज्याचं हित लक्षात घेऊन समजू शकतो”, अशी भूमिका अजित पवार यांनी मांडली.

'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी
'माझ्यासह पत्नीला वर्षापासून त्रास अन् शिवीगाळ पण आता मराठी...'- आरोपी.
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं
परळीत अजितदादा गटाच्या माजी नगरसेविकेच्या मुलानं कर्मचाऱ्याला धुतलं.
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'
'निवडणुकीनंतर माज आलाय, पुढे पुन्हा अशी घटना घडली तर...'.
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी
सकाळी 9.30ला ते दोघे आले, फोटो काढून गेले, राऊतांच्या बंगल्याची रेकी.
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट
D फॉर डॉन अन् तो मंत्रिमंडळात? जितेंद्र आव्हाडांनी दिली हिंट.
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा
'हुशार्‍या मारू नका, अडीच वर्षांनंतर..'; सत्तारांचा विरोधकांना इशारा.
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?
शरद पवारांचे 'हे' दोन नेते दादांच्या भेटीला, राजकारणात भूकंप होणार?.
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'
कल्याणात मराठी कुटुंबाला मारहाण,मनसे दिला इशारा,'येत्या २४ तासात जर..'.
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’
कल्याणात मराठी कुटुंबाला जबर मारहाण, ‘मराठी लोक भिकारडे अन् घाण...’.
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं
भाजप युवा मोर्चानं काँग्रेसचं कार्यालय फोडलं अन् पोलिसांनी जबर चोपलं.