अनिल देशमुख राज ठाकरे यांच्या भेटीला, पडद्यामागे मोठं काहीतरी घडतंय?

महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडी घडत आहेत. देशात पुढच्या वर्षी लोकसभा निवडणुका होणार आहेत. त्यामुळे प्रत्येक पक्षाच्या गोटात जोरदार हालचाली सुरु आहेत. असं असताना आज महाराष्ट्राच्या राजकारणात आज अनपेक्षित अशा भेटीगाठी होताना दिसत आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात आश्चर्य व्यक्त केलं जातंय.

अनिल देशमुख राज ठाकरे यांच्या भेटीला, पडद्यामागे मोठं काहीतरी घडतंय?
Follow us
| Updated on: Aug 29, 2023 | 2:42 PM

मुंबई | 29 ऑगस्ट 2023 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे नेते अनिल देशमुख यांनी आज महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. अनिल देशमुख राज ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘शिवतीर्थ’ निवासस्थानावर गेले होते. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सकाळी साडेनऊ वाजता अनिल देशमुख यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली आहे. दोन्ही नेत्यांमध्ये अंदाजे तासभर चर्चा झाल्याची माहिती समोर आलीय. अनिल देशमुख हे शरद पवार यांचे निकटवर्तीय आहेत. महाविकास आघाडी सरकारच्या काळात ते राज्याचे गृहमंत्रीदेखील होते.

अनिल देशमुख गृहमंत्री असताना तत्कालीन मुंबईचे पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी केलेल्या आरोपांमुळे त्यांना मंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं होतं. तसेच ते वर्षभरापेक्षा जास्त काळ जेलमध्ये होते. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर काही महिन्यांनी त्यांना सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर जामीन मिळाला होता. यानंतर राष्ट्रवादीत उभी फूट पडली आणि त्यानंतर आता ते राज ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत.

राज ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकीय संबंध गेल्या काही दिवसांपासून ताणले गेले आहेत. राज ठाकरे यांच्याकडून सातत्याने राष्ट्रवादी काँग्रेस आणि शरद पवार यांच्यावर टीका केली जात आहे. असं असताना अनिल देशमुख यांनी राज ठाकरेंच्या निवासस्थानी जावून त्यांची भेट घेतल्यामुळे या भेटीवर आश्चर्य व्यक्त केलं जात आहे. अनिल देशमुख यांनी राज ठाकरे यांची भेट का घेतली असावी? या मुद्द्यावरुन राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या आहेत.

अनिल देशमुख आणि राज ठाकरे यांच्या भेटीत नेमकी चर्चा काय?

या भेटीत राज ठाकरे यांनी अनिल देशमुख यांची ईडीची केस समजून घेतली. अनिल देशमुख यांच्यावर असलेले आरोप, परमबीर सिंह यांनी बार मालकांकडून 100 कोटींच्या वसूलीचे आरोप केले होते. त्यामुळे त्यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला होता. ईडीने या प्रकरणात चौकशी केली होती. ईडीच्या दाव्यानुसार, अनिल देशमुख यांच्याविरोधात आरोप निश्चित झाले होते. त्यामुळे अनिल देशमुख तब्बल 13 महिने जेलमध्ये होते. ही संपूर्ण केस काय होती ती अनिल देशमुख यांनी राज ठाकरेंना समजावून सांगितली, अशी माहिती खात्रीलायक सूत्रांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला दिली आहे.

आपल्याविरोधात करण्यात आलेले आरोप हे कशापद्धतीने राजकीय हेतूने प्रेरित होते, ते अनिल देशमुख यांनी राज ठाकरे यांना समजावून सांगितले. तसेच अनिल देशमुख यांचा तुरुंगातला जो अनुभव होता तो त्यांनी राज ठाकरेंना सांगितला, अशी माहिती मिळत आहे.

भेटीआधी फोनवर दोनवेळा चर्चा

विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून अनिल देशमुख आणि राज ठाकरे यांची भेटीआधी फोनवर देखील चर्चा झाल्याची माहिती समोर येत आहे. राज ठाकरेंनी अनिल देशमुख यांना याआधी दोनवेळा फोन केला. यावेळी त्यांनी भेटीची इच्छा व्यक्त केली. त्यानंतर आज भेटीचा वेळ आणि दिवस ठरला. त्यानुसार अनिल देशमुख आणि राज ठाकरे यांची भेट घडून आली. अनिल देशमुख आणि राज ठाकरे यांच्यातील मैत्रीपूर्ण संबंध बघायला मिळाली नव्हती. त्यामुळे या भेटीला जास्त महत्त्व प्राप्त झालंय.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.