तर गोपीनाथ मुंडेंनी केंद्रावर दबाव आणून आरक्षण मिळवून दिलं असतं: छगन भुजबळ
ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे. गोपीनाथ मुंडे असते तर केंद्रावर दबाव आणून ओबीसींना आरक्षण मिळवून दिलं असतं, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
मुंबई: ओबीसीच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी पुन्हा एकदा भाजपला डिवचले आहे. गोपीनाथ मुंडे असते तर केंद्रावर दबाव आणून ओबीसींना आरक्षण मिळवून दिलं असतं, असं छगन भुजबळ यांनी सांगितलं.
छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधताना ही प्रतिक्रिया व्यक्त केली. ओबीसींचं आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही पूर्ण तयारी करत आहोत. ओबीसींना आरक्षण मिळू नये म्हणून भाजप कायदेशीर फंडे वापरत आहे. जनतेने हे लक्षात घ्यायला आहे. ओबीसींच्या आरक्षणाच्या विरोधात कोण आहे ते जनतेने समजून घ्यावा. त्यामुळे भाजपला धडा शिकवला पाहिजे, असं भुजबळ यांनी सांगितलं.
सदोष का असेना पण डेटा द्या
इम्पिरिकल डेटा द्यावा अशी आमची मागणी आहे. भले तो सदोष का असेना पण केंद्राने हा डेटा दिला पाहिजे. आम्ही त्या चुका दुरुस्त करू. पण डेटा द्या. इम्पिरिकल डेटा देणं ही केंद्राची जबाबदारी होती. उज्ज्वला योजना देताना या डेटाचा केंद्र सरकारने वापर केला होता. मग आम्हालाच हा डेटा का दिला नाही? भाजप सरकारला ओबीसींना आरक्षणच द्यायचं नाही, असं सांगतानाच आज गोपीनाथ मुंडे असते तर भाजपकडून ओबीसी आरक्षणाला विरोध झाला नसता. त्याचं दु:ख आमच्या मनात आहे, असंही त्यांनी सांगितलं. उद्या सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय ओबीसी आरक्षणाबद्दल येणार आहे याकडे आमचे लक्ष लागलेले आहे, असंही त्यांनी सांगितलं.
संजय राऊत काय म्हणाले?
दरम्यान, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही मुंडे असते तर युती राहिली असती असं म्हटलं आहे. भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज ते असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती. गोपीनाथ मुंडे असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. बहुजन समाजाच्या नेतृत्वाची सुरुवात त्यांनीच केली, असे वक्तव्य राऊत यांनी केले. भाजपमध्ये गोपीनाथ मुंडे यांच्यासारखा एकही नेता आज नाही. आज ते असते, तर महाराष्ट्रात युती कायम राहिली असती. शिवसेना काय आहे, हे फक्त गोपीनाथ मुंडे यांनाच कळाली होती. गोपीनाथ मुंडे असते. त्यांच्यासारखा एकही नेता भाजपमध्ये नाही, असंही त्यांनी सांगितलं होतं.
यावेळी त्यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. शरद पवार सर्वात अनुभवी आणि लोकप्रिय नेते आहेत. कृषी, संरक्षण क्षेत्रात त्यांनी ठोस पावले उचलली. महाराष्ट्राने देशाला जी काही नेतृत्व दिली, त्यात यशवंतरावानंतर शरद पवार आहेत. महाविकास आघाडीचा प्रयोग शरद पवारांशिवाय शक्य नव्हता. 81 वर्षांनंतरही पवार एखाद्या तरुणासारखे सक्रिय आहेत. जनतेशी थेट संवाद असलेले, हवेत गप्पा न मारणारे आणि आजही तरुणांना लाजवतील असे काम करणारे नेते म्हणजे पवार आहेत, असं राऊत म्हणाले.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 12 December 2021 pic.twitter.com/GkzmEpizpv
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 12, 2021
संबंधित बातम्या: