“राष्ट्रवादी हा पक्ष नाही तर टोळी”; भाजप नेत्यानं राष्ट्रवादी काँग्रेसच्या कामांची यादीच सांगितली
भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवाद काँग्रेसवर टीका करताना त्यांनी पक्षाची वैचारिक पातळी काढत या पक्षाला वैचारिक बैठक नाही असा टोला त्यांनी लगावला.
मुंबईः ज्या बारामती तालुक्यानं अजित पवार यांना अनेकदा आमदार केले, लाखोंच्या फरकाने निवडून दिले. त्याच बारामती तालुक्यातील 44 गावांना मात्र दुष्काळात अजूनही मोठा फटका बसतो. पाण्यासाठी ही गावं अजूनही वणवण फिरत राहतात. त्यामुळे अजित पवार यांनी आपल्या मंत्री पदं असताना काय केले याचा एकदा विचार करावा अशी टीका भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी केली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला वैचारिक बैठक नसल्याची टीकाही गोपीचंद पडळकर यांनी केली आहे.
अजित पवार यांना बारामती तालुक्याने अनेकदा आमदार केले आहे. मात्र अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसने या तालुक्यावर अन्याय केला आहे.
अजित पवार यांनी आपण लाखो मतांच्या फरकाने निवडून येत असलो तरी त्यांनी एकदा आपल्या मतदार संघात आपण काय केले याचा विचारही गोपीचंद पडळकर यांनी करावा अशी टीका त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर केली आहे.
भाजपच्या गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवाद काँग्रेसवर टीका करताना त्यांनी पक्षाची वैचारिक पातळी काढत या पक्षाला वैचारिक बैठक नाही असा टोला त्यांनी लगावला.
राष्ट्रवादी पक्षाला कोणतीही वैचारिक बैठक नसून त्यांनी कोणत्याही प्रकारचा अजेंडा नाही अशी सडकून टीका त्यांच्यावर करण्यात आली. ज्या प्रमाणे भाजपचा अजेंडा ठरलेला आहे. त्याप्रमाणे कोणत्याही प्रकारचा अजेंडाही या पक्षाकडे नाही.
भाजप प्रथम राष्ट् नंतर राजकीय पक्ष आणि नंतर व्यक्ती असा ठरलेला अजेंडा आहे मात्र राष्ट्रवादी काँग्रेसकडे नाही असा टोला त्यांनी लगावला आहे.
ज्या प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसकडे अजेंडा नाही त्याचप्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोणत्याही नेत्याकडे वैचारिक बैठक नाही. त्यामुळे त्यांची ती भूमिका मांडू शकत नाहीत. त्यामुळे येत्या काही दिवसात राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष संपणार असल्याचा हल्लाबोलही त्यांनी यावेळी केला.