Jayant Patil: आपल्याला फसवाफसवीची कामं जमत नाही, मंत्री नंतर आधी कार्यकर्ता: जयंत पाटील

Jayant Patil: या भागात पाण्याची समस्या सोडवण्याचे काम केले जात आहे. 65 गावांच्या योजनेच्या कामाला गती देण्यात येईल, त्याबाबत आम्ही निर्णय घेतलेला असून लवकर पाण्याचा प्रश्न सुटेल. काही लोकं फसवणूक केल्याचा आरोप आमच्यावर करत आहेत.

Jayant Patil: आपल्याला फसवाफसवीची कामं जमत नाही, मंत्री नंतर आधी कार्यकर्ता: जयंत पाटील
Image Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 19, 2022 | 5:34 PM

सांगली: या भागात पाण्याची समस्या सोडवण्याचे काम केले जात आहे. 65 गावांच्या योजनेच्या कामाला गती देण्यात येईल, त्याबाबत आम्ही निर्णय घेतलेला असून लवकर पाण्याचा प्रश्न सुटेल. काही लोकं फसवणूक केल्याचा आरोप आमच्यावर करत आहेत. परंतु आपल्याला फसवाफसवीची कामं जमत नाही. आम्ही जे बोलतो ते करतो, अशी ग्वाही राष्ट्रवादीचे (ncp) प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (jayant patil) यांनी दिली. तुम्ही मला कधीही फोन करू शकता आणि तुमचे प्रश्न सांगू शकता. मी मंत्री नंतर आधी पक्षाचा कार्यकर्ता आहे, असेही त्यांनी आवर्जून सांगितले. आज सांगली (sangli) जिल्हयातील जत विधानसभा मतदारसंघाचा आढावा जयंत पाटील यांनी घेतला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पाटील यांचं भाषण ऐकण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. पाटील यांनीही आपल्या खास शैलीत भाषण करत विरोधकांनाही टोले लगावले.

महाराष्ट्रभरात आपला पक्ष वाढवण्यासाठी पक्षाने कंबर कसली आहे. जत तालुक्यात आपल्या राष्ट्रवादीचा प्रभाव कसा वाढेल यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न सुरू केले आहेत. या भागात राष्ट्रवादीचा विस्तार होण्यास आता मोठी मदत होईल, असेही जयंत पाटील म्हणाले. आगामी काळात मी पुन्हा जत तालुक्यात येईन. तेव्हा आपण पुन्हा एकदा आढावा घेऊ, विविध प्रश्नांचा उहापोह करण्याचे काम केले जाईल व प्रश्नांची सोडवणूक करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितलं.

इतर पक्षांचे अनेकजण संपर्कात

बुथ कमिट्यांवर भर द्या, बुथ कार्यकर्त्यांनी लोकांच्या मदतीला धावून जावं, हे केल्याने आपण लोकांच्या मनात घर करू. बुथ कमिट्या लवकर केल्या तर चांगले होईल, असे सांगतानाच इतर पक्षाचे अनेकजण आपल्या संपर्कात आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करू इच्छित आहेत. लवकरच त्यांचा पक्ष प्रवेश केला जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केलं.

यावेळी महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, अविनाश काका पाटील, बाबासाहेब मुळीक, युवा नेते प्रतिक पाटील, बसवराज पाटील, सुरेश शिंदे, जत तालुकाध्यक्ष रमेश पाटील, युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख, युवक कार्याध्यक्ष रविकांत वर्पे, युवती प्रदेशाध्यक्षा सक्षणा सलगर, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष सुनील गव्हाणे, प्रकाश जमदाडे, सिध्दूअण्णा शिरसाठ, युवक जिल्हाध्यक्ष विराज नाईक, महिला जिल्हाध्यक्षा सुस्मिता जाधव, युवती जिल्हाध्यक्षा पुजा लाड, विद्यार्थी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश पाटील, महिला तालुकाध्यक्षा गीता कोलग आदींसह पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

संबंधित बातम्या:

Devendra Fadnavis : ‘आम्हाला हिंदुत्वाची शाल पांघरण्याची गरज नाही’, फडणवीसांचा शिवसेनेला टोला, पंतप्रधान मोदींवर स्तुतीसुमनं

Amravati | अचलपूर दंगल प्रकरणी अनिल बोंडेंना पोलिसांनी ताब्यात घ्यावे, काँग्रेस प्रवक्ते दिलीप एडतकरांची मागणी

Gunratna Sadavate : गुणरत्न सदावर्तेंच्या घरी थेट पैसे मोजण्याची मशीन! सरकारी वकिलांचा दावा; लाखो रुपयांची मालमत्ता खरेदी कुणाच्या पैशातून?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.