शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे आणि अजित पवार का नव्हते? जयंत पाटील म्हणाले…

"इथे कोण उपस्थित आहे किंवा नाही यावरुन वेगळा अर्थ काढू नका", असं शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत पत्रकारांना आवाहन केलं. पण तरीही चर्चांना उधाण आलं आहे. अजित पवार आणि धनंजय मुंडे हे नेते शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत अनुपस्थित राहिले. त्यांच्या या अनुपस्थितीबाबत जयंत पाटील यांना प्रश्न विचारण्यात आला.

शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेत धनंजय मुंडे आणि अजित पवार का नव्हते? जयंत पाटील म्हणाले...
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 05, 2023 | 7:16 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांनी आज पत्रकार परिषद घेऊन आपण पक्षाध्यक्ष पद मागे घेत असल्याचं जाहीर केलं. आपले कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांच्या प्रेमाने आपण भारावलो असल्याचं शरद पवार यावेळी म्हणाले. शरद पवार यांची आजची पत्रकार परिषद महत्त्वाची होती. या पत्रकार परिषदेला राष्ट्रवादी काँग्रेसचे अनेक दिग्गज नेते उपस्थित होते. पण तरीही राष्ट्रवादी काँग्रेसचे तडफदार नेते अजित पवार अनुपस्थित होते. त्यांच्यासह आमदार धनंजय मुंडे हे देखील अनुपस्थित होते. त्यांच्या अनुपस्थितीबद्दल शरद पवार यांना पत्रकरांनी वारंवार प्रश्न विचारला. तर जयंत पाटील यांनाही याबाबत प्रश्न विचारण्यात आला.

“इथे कोण उपस्थित आहे किंवा नाही यावरुन वेगळा अर्थ काढू नका”, असं शरद पवार यांनी भर पत्रकार परिषदेत पत्रकारांना आवाहन केलं. पण तरीही अजित पवार यांच्या अनुपस्थितीवर पुन्हा चर्चा रंगू लागल्या आहेत. शरद पवार यांच्या पत्रकार परिषदेनंतर जयंत पाटील यांनी माध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांना अजित पवार आणि धनंजय मुंडे यांच्या अनुपस्थितीबाबत प्रश्न विचारण्यात आला. त्यावर जयंत पाटील यांनी भूमिका मांडली.

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

“शरद पवार यांनी महाराष्ट्र आणि देशातील कार्यकर्त्यांची मागणी मान्य केल्याबद्दल त्यांचे मन:पूर्वक आभार. त्यांची देशाला, राज्याला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला गरज आहे. त्यांनी निर्णय बदलला आणि जनतेचं तसेच कार्यकर्तेची विनंती मान्य केली त्याबद्दल आभार मानतो. सर्वांना प्रचंड आनंद झालाय”, अशी भावना जयंत पाटील यांनी व्यक्त केली.

हे सुद्धा वाचा

“सगळे सगळीकडे असू शकत नाही. अजित पवार आणि धनंजय मुंडे यांनी सकाळी त्यांची जबाबदारी पार पडली. त्यांनी बैठकीत भाग घेतला. शरद पवार यांच्या घरी जावून चर्चा केली. सगळेच गेले होते. मला अचानकपणे समजलं की पत्रकार परिषद आहे. त्यामुळे मला यायला उशिर झाला. शरद पवार यांची पत्रकार परिषद होती. मला प्रदेशाध्यक्ष म्हणून निमंत्रण होतं म्हणून मी आलो”, अशी प्रतिक्रिया जयंत पाटील यांनी दिली.

“उत्तराधिकारी असा विषय त्यांनी मांडलेला नाही. त्यांनी असं सांगितलं आहे की, पक्षाची जबाबदारी पुढे आणखी चांगल्या पद्धतीने काम करण्यासाठी आम्ही संघटनेकडे लक्ष देवून भविष्यकाळात चांगल्यापद्धतीने पुढे जाण्याचा प्रयत्न करु”, अशी भूमिका जयंत पाटील यांनी यावेळी मांडली.

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.