आधी अमित शाह यांच्यासोबत भेटीची चर्चा, आता जयंत पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीला, पडद्यामागे काय घडतंय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जयंत पाटील आज अचानक माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या 'मातोश्री' निवासस्थानी दाखल झाले आहेत. विशेष म्हणजे जयंत पाटील आणि अमित शाह यांच्या कथित भेटीची चर्चा रायकीय वर्तुळात रंगत असताना मुंबईत घडणाऱ्या या घडामोडींना राजकीय महत्त्व प्राप्त झालंय.

आधी अमित शाह यांच्यासोबत भेटीची चर्चा, आता जयंत पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीला, पडद्यामागे काय घडतंय?
Follow us
| Updated on: Aug 07, 2023 | 6:54 PM

मुंबई | 7 ऑगस्ट 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत सध्या अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा दोन दिवसांपासून रंगलेली असताना आता मुंबईत महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत. जयंत पाटील आज शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेले आहेत. जयंत पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी त्यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी गेले आहेत. त्यामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलं आहे. उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांच्या भेटीमागे काही महत्त्वाची कारणं आहेत. त्यापैकी इंडिया आघाडीची आगामी काळात मुंबईत होणारी बैठक हे प्रमुख कारण असल्याचं मानलं जात आहे.

अमित शाह नुकतंच दोन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर आले होते. या दौऱ्यादरम्यान अमित शाह यांची शनिवारी रात्री उशिरा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत महत्त्वाची बैठक पार पडल्याची माहिती समोर आली होती. या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाच्या विस्तारावर चर्चा झाल्याची माहिती आहे. याशिवाय जयंत पाटील यांनीदेखील अमित शाह यांची भेट घेतल्याची चर्चा अचानक समोर आली होती. त्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या होत्या.

जयंत पाटील यांनी या चर्चा खोट्या असल्याचं स्पष्ट केलं होतं. आपण शरद पवार यांच्यासोबत असून अमित शाह यांच्या भेटीचा प्रश्नच उपस्थित होत नाही. अमित शाह यांच्यासोबत आपल्या भेटीच्या जाणीवपूर्वक खोट्या बातम्या पेरल्या जात आहेत, अशी प्रतिक्रिया जंयत पाटील यांनी दिली होती. तर अजित पवार यांनीदेखील जयंत पाटील आणि अमित शाह यांच्या भेटीच्या चर्चांचं खंडन केलं आहे. या चर्चांनंतर आता जयंत पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीसाठी गेले आहेत.

जयंत पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीला का गेले?

देशातील महत्त्वाच्या विरोधी पक्षांनी एकत्रित येऊन इंडिया आघाडीची स्थापना केली आहे. या आघाडीत महाविकास आघाडीचे घटक पक्ष देखील आहेत. या आघाडीची तिसरी आणि महत्त्वाची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. ही बैठक 30 ऑगस्ट आणि 1 सप्टेंबरला मुंबईत आयोजित करण्यात येणार आहे. याच बैठकीच्या नियोजनाबाबत चर्चा करण्यासाठी जयंत पाटील उद्धव ठाकरे यांच्या भेटीला गेल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. पण या बैठकीबाबत अधिकृत प्रतिक्रिया सध्या तरी दोन्ही पक्षांकडून देण्यात आलेली नाही. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि जयंत पाटील यांच्यात काय चर्चा होते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश
Suresh Dhas : 'आरोपींचा तेरे नाम झाला पाहिजे', सुरेश धस यांचा आक्रोश.
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?
सुरेश धस अजितदादांच्या भेटीला, राजकीय घडामोडींना वेग; भेटीत काय चर्चा?.
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर
'माझ्यापेक्षा जास्त अभ्यास असणाऱ्यांना...', पंकजा मुंडेंचं खोचक उत्तर.
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने....
एसटी महामंडळात फ्री स्टाइल हाणामारी, दोन कंडक्टर आले आमने-सामने.....
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?
फडणवीस, दादा नव्हे, या नेत्यामुळे मनसेची महायुतीसोबतची युती फिस्कटली?.
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?
दिल्ली विधानसभा निवडणुकीचं बिगुल वाजलं, कधी होणार मतदान अन् निकाल कधी?.
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस
बांगलादेशी बनला रत्नागिरीकर... शिरगाव ग्रामपंचायतीला पोलिसांची नोटीस.
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण
महाराष्ट्राची चिंता वाढली;7 वर्षीय मुलासह 13 वर्षीय मुलीला HMPVची लागण.
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'
मुडेंनी राजीनामा दिला? राजीनाम्याच्या प्रश्नावर म्हणाले, 'योग्य वेळी'.
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी
HMPV Virus : तुम्हाला 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा अन् अशी घ्या काळजी.