महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार? जितेंद्र आव्हाड यांचं नेमकं भाकीत काय?

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी मोठा दावा केला आहे. महाराष्ट्रात आगामी काळात अनेक राजकीय घडामोडी घडणार आणि अखेर मध्यावधी निवडणुका जाहीर होणार, असं भाकीत जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार? जितेंद्र आव्हाड यांचं नेमकं भाकीत काय?
Image Credit source: tv9
Follow us
| Updated on: May 12, 2023 | 9:18 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या अनेक घडामोडी घडत आहेत. पुढच्या वर्षी देशभरात लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. त्यानंतर राज्यात विधानसभा निवडणुकांचा धुराळा उडण्याची शक्यता आहे. त्याआधी राज्यात महापालिका निवडणुकांचंदेखील बिगूल वाजण्याची शक्यता आहे. असं असताना सुप्रीम कोर्टाकडून काल महाराष्ट्राच्या सत्तासंघर्षाचा निकाल जाहीर करण्यात आला. या निकालावरुन सत्ताधारी पक्षांकडून आपल्याच बाजूने निकाल लागल्याचा दावा केलाय. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी या निकालानंतर राज्यात आगामी काळात मध्यावधी निवडणुका लागणार असल्याचं मोठं भाकीत केलं आहे.

“सुप्रीम कोर्टाने 141 पानांची रुलबुक दिली आहे. तुम्हाला त्या रुलबुकप्रमाणेच चालावं लागणार. त्यामुळे जर-तरला काहीच अर्थ नाही. तुम्हाला ज्यादिवशी अपात्रतेचा अर्ज टाकलाय त्याचदिवशीचा विचार करायचा आहे, असं सुप्रीम कोर्टाने स्पष्ट म्हटलेलं आहे. तेव्हाचा राजकीय पक्ष कोणता होता हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलंय. तेव्हा शिवसेना हा राजकीय पक्ष होता. त्याचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे होते. उद्धव ठाकरे यांनाच व्हीपचा अधिकार आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

‘सुनील प्रभू यांचा व्हीप लागू होईल’

“सुप्रीम कोर्टाने आपल्या निकालपत्रात म्हटलंय की, कोणत्याही पक्षात विधीमंडळ पक्षापेक्षा राजकीय पक्ष जास्त महत्त्वाचा आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे, व्हीप नेमण्याचा अधिकार पक्षप्रमुखाला असतो, गटनेता नेमण्याचा अधिकार हा पक्षप्रमुखाला असतो, हे कालच्या जजमेंटमध्ये लिहिलेलं आहे. म्हणून त्यांनी जजमेंट सुरु केलं तेव्हा सुनील प्रभू यांचा व्हीप लागू होईल. त्यावेळी शिवसेना उद्धव ठाकरे हाच पक्ष होता. त्यामुळे उगाच समज गैरसमज पसरविण्यात काहीच अर्थ नाही”, असं आव्हाड म्हणाले.

हे सुद्धा वाचा

“गोंधळात टाकण्याचे प्रकार सुरु आहेत. निकाल स्पष्ट आहे. फक्त आपण म्हणतो ना, नाही रे तो गेलाय, पण जाहीर कसं करायचं, किती वाजता करायचं? घरच्यांना कसं समजवायचं? असा हा प्रकार आहे”, अशी टिप्पणी जितेंद्र आव्हाड यांनी यावेळी केली.

“निकाल तुमच्या बाजूने लागलाय. तुमच्याच बाजून सगळं काही लागलंय. आमचं काहीही म्हणणं नाही. सुप्रीम कोर्टाने असं का म्हटलं की शेड्यूल 10 प्रमाणे स्प्लिट इज नॉट अलाऊड? शेड्यूल 10 चा गाभाच निघून जाईल, असं सुप्रीम कोर्टाने का म्हटलं? हे वाद घालून उगाच गोंधळात टाकायचं नाही”, असंदेखील ते म्हणाले.

‘महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार’

“सुप्रीम कोर्ट फार सीरियस आहे. दिल्लीच्या बाजून जो निकाल दिलाय, त्याबाबत केंद्र सरकार भूमिका घेत नाही, असं दिल्ली सरकारने सुप्रीम कोर्टात जेव्हा सांगितलं तेव्हा कोर्टाने तातडीने सुनावणीचे आदेश दिले. त्यामुळे लोकांना ते वर्षभर खेचतील असं वाटतंय ना, काही खेचाखेच होणार नाही. बघा आता काय होणार आहे ते. राजकारण खूप बदलत जाईल. माझ्या अंदाजाने महाराष्ट्रात मध्यावधी निवडणुका लागणार. हे माझं वैयक्तिक मत आहे”, अशी भूमिका जितेंद्र आव्हाड यांनी मांडली.

मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत
Sanjay Raut : लाडक्या बहिणींच्या नवऱ्यांना दारूडे करणार का ? संजय राऊत.
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.