‘बायको कशी वागते, पोरं कसे वागतात यावर मला…’, जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांची गेल्या आठवड्यात भेट झाली. त्यांच्या भेटीनंतर लगेच अजित पवार दिल्लीला रवाना झाले. अजित पवार यांनी दिल्लीला जावून केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत नेमकी काय-काय चर्चा झाली, याबाबत वेगवेगळे तर्कवितर्क लढवले जात आहेत. तसेच याबाबत विविध चर्चांना उधाण आलं आहे. या घडामोडींवर जितेंद्र आव्हाड यांनी सविस्तर भूमिका मांडली आहे.

'बायको कशी वागते, पोरं कसे वागतात यावर मला...', जितेंद्र आव्हाड नेमकं काय म्हणाले?
jitendra awhad
Follow us
| Updated on: Nov 13, 2023 | 11:25 PM

मुंबई | 13 नोव्हेंबर 2023 : उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गेल्या आठवड्यात केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या भेटीत त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटाच्या मंत्र्यांकडून राष्ट्रवादीच्या आमदारांना निधी दिला जात नसल्याची तक्रार अमित शाह यांच्याकडे केल्याची चर्चा आहे. याबाबत जितेंद्र आव्हाड यांना प्रश्न विचारसा असता “दुसऱ्यांच्या घरात काय चालू आहे, बायको कशी वागते, पोरं कसे वागतात यावर मला बोलायचे नाही”, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली. जितेंद्र आव्हाड यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याबाबतही महत्त्वाचं वक्तव्य केलं. “राहूल नार्वेकर यांनी फक्त संविधान आणि न्यायालयाने सांगितलेल्या चौकटीत राहून काम करावे. त्यांना वारंवार सूचना दिल्या जातात. त्यांनी मर्यादा ओळखाव्या आणि तसं वागावे”, असं वक्तव्य जितेंद्र आव्हाड यांनी केलं.

यावेळी जितेंद्र आव्हाड यांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीबाबत प्रश्न विचारण्यात आला. “सगळे वडीलधारे आहेत. ते हजर होते. आत काय झाले, मला माहिती नाही. पण त्यात काही राजकीय आहे असे मला वाटत नाही”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली. “काही गोष्टी या योगायोगाने होतात. दिलीप वळसे पाटील हे बरेच वर्ष होते. त्यामुळे ते भेटायला गेले असतील. शरद पवार कुणाला जा म्हणणार नाही. ते गंभीर आहेत. त्यांना जायचे नसते तर त्यांनी मोठे वकील लावले नसते”, असं जितेंद्र आव्हाड यावेळी म्हणाले.

‘संभ्रम निर्माण होतोय का?’

शरद पवार आणि अजित पवार यांच्या भेटीने संभ्रम निर्माण होतो का? असा प्रश्न जितेंद्र आव्हाड यांना विचारण्यात आला. “मला वाटत नाही संभ्रम होतो. शरद पवार अडीच तास निवडणूक आयोगात जाऊन बसतात. वकिलांच्या बाजूला ऊभे राहून बोलत आहे. यातच सगळे आले की ते किती गंभीर आहेत”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. यावेळी त्यांनी महाविकास आघाडीच्या बैठकीवरही प्रतिक्रिया दिली. “दिवाळीनंतर बैठक होतील. कोण तुम्हाला काय सांगतो माहिती नाही”, अशी प्रतिक्रिया जितेंद्र आव्हाड यांनी दिली.

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.