‘ब्लू टिक’पेक्षा लसीकरणाकडे अधिक लक्ष द्या; राष्ट्रवादीचा केंद्राला टोला

ब्लू टिकवरून भाजप आणि ट्विटरमध्ये चांगलीच जुंपली आहे. (NCP leader nawab malik slams bjp over blue tick)

'ब्लू टिक'पेक्षा लसीकरणाकडे अधिक लक्ष द्या; राष्ट्रवादीचा केंद्राला टोला
नवाब मलिक
Follow us
| Updated on: Jun 07, 2021 | 10:59 AM

मुंबई: ब्लू टिकवरून भाजप आणि ट्विटरमध्ये चांगलीच जुंपली आहे. त्यावरून काँग्रेसने भाजपवर टीका केलेली असतानाच आता राष्ट्रवादीनेही भाजपवर निशाणा साधला आहे. ब्लू टिकपेक्षा लसीकरणाकडे अधिक लक्ष द्या, असा टोला राष्ट्रवादीने लगावला आहे. (NCP leader nawab malik slams bjp over blue tick)

राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी ही टीका केली आहे. ‘ब्लू टिक’ आणि लसीकरण यातील फरक पहिल्यांदा केंद्रसरकारने समजून घ्यावा, असे सांगतानाच ‘ब्लू टिक’ पेक्षा लोकांच्या लसीकरणाकडे जास्त लक्ष द्यायला हवे, असा टोला नवाब मलिक यांनी भाजपला लगावला आहे.

सरकार आपल्याच अंहकारात मश्गूल

ट्वीटरवर संपूर्ण भाजप आणि केंद्रसरकार ‘ब्लू टिक’ ची लढाई लढताना दिसत आहे. तर दुसरीकडे देशातील जनता लसीकरणाची लढाई लढत आहेत. ट्विटरवरील ‘ब्लू टिक’ असेल किंवा कोरोना काळातील लोकांचे लसीकरण असेल यावरून केंद्रसरकारवर टीकेची झोड उठवली जात आहे. मात्र याकडे दुर्लक्ष करून केंद्रसरकार आपल्याच अहंकारात मश्गुल असल्याची टीका त्यांनी केली आहे.

राहुल गांधींची टीका

ब्लू टिकच्या मुद्दयावरून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी ट्विट करून केंद्र सरकारवर निशाणा साधला होता. ब्लू टिकसाठी मोदी सरकार संघर्ष करत आहे. कोविडची लस हवी असेल तर आत्मनिर्भर व्हा, असं ट्विट राहुल गांधी यांनी केलं होतं. तसेच या पोस्टला प्रायोरिटी (#Priorities) हा हॅशटॅगही त्यांनी वापरला होता. यातून त्यांनी सरकार कशाला प्राधान्य देतंय हे सूचित करायचं होतं.

काय आहे प्रकरण?

ट्विटरनं काल उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंचं वैयक्तिक ट्विटर हँडल आधी अनव्हेरिफाईड केलं आणि नंतर पुन्हा व्हेरिफाईड केलं. ट्विटरनं असं का केलं ते आधी सांगितलं नाही. पण पुन्हा ब्लू टिक प्रस्थापित केल्यानंतर का हटवली ते सांगितलं. पण नायडूंना आधी जो धक्का दिला तो फक्त त्यांनाच दिला असं नाही तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्याही काही नेत्यांना ट्विटरनं अनव्हेरिफाईड केलं. म्हणजे अकाऊंटची सत्यता काढून टाकली आहे. यात संघाचे अखिल भारतीय प्रचारप्रमुख अरूण कुमार आणि सह सरकार्यवाह सुरेश सोनी यांच्या ट्विटर हँडलचा समावेश आहे. नायडूंची ब्लू टिक का हटवली ते ट्विटरनं स्पष्टपणे सांगितलं, पण संघाच्या नेत्यांची का हटवली ते मात्र सांगितलेलं नाही. त्यामुळे मोदी सरकार आणि ट्विटर यांच्यातला संघर्ष आणखी वाढला आहे. (NCP leader nawab malik slams bjp over blue tick)

संबंधित बातम्या:

सरकारला ब्लू टिकचं पडलंय, लोकहो, तुम्हीच तुमच्या लसीची व्यवस्था करा; राहुल गांधींची खोचक टीका

उपराष्ट्रपती नायडूंच्या ‘ब्लू’ टिकवर ट्विटरचा सावळा गोंधळ, धक्का देण्याचा प्रयत्न?

नायडूच नाही तर आरएसएसच्या नेत्यांनाही ट्विटरचा दे धक्का, ब्लू टिक हटवली!

(NCP leader nawab malik slams bjp over blue tick)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.