शिंदे गट ऐकेना, तिढा सुटेना, पण सुनील तटकरे यांनी महत्त्वाची बातमी सांगितली

मंत्रिमंडळाचा विस्ताराचा तिढा काही सुटताना दिसत नाहीय. त्यामुळे आता दिल्लीत खलबतं होणार आहेत. शिंदे गट काही खात्यांसाठी आक्रमक झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. असं असताना आता सुनील तटकरे यांनी विस्ताराची वेळ सांगून टाकली आहे.

शिंदे गट ऐकेना, तिढा सुटेना, पण सुनील तटकरे यांनी महत्त्वाची बातमी सांगितली
Follow us
| Updated on: Jul 12, 2023 | 5:30 PM

मुंबई : राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार कधी होईल? हा प्रश्न सातत्याने चर्चेत येतोय. मंत्रिमंडळ विस्ताराकडे सत्ताधारी पक्षाच्या आमदारांसह संपूर्ण राज्याचं देखील लक्ष आहे. सत्ता स्थापन होऊन वर्ष उलटलं तरी अद्याप विस्तार झालेला नाही. याशिवाय आता सरकारमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही दाखल झाल्याने या मंत्रिमंडळ विस्ताराला जास्त महत्त्व प्राप्त झालं आहे. राष्ट्रवादीच्या नऊ नेत्यांनी मंत्रिपदाची शपथ घेतली आहे. पण अद्याप खातेवाटप झालेलं नाही. त्यामुळे याबाबत सातत्याने चर्चा होत आहेत. विशेष म्हणजे याचसाठी महाराष्ट्राच्या राजकारणात पडद्यामागे अनेक घडामोडीदेखील घडत आहेत. असं असताना आता राष्ट्रवादीचे नेते सुनील तटकरे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

राज्य मंत्रिमंडळाचा दुसऱ्या टप्प्यातील विस्तार उद्या संध्याकाळापर्यंत होईल, असं मोठं वक्तव्य सुनील तटकरे यांनी केलं आहे. विशेष म्हणजे मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर मोठ्या हालचाली घडत असल्याची माहिती मिळत आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आता दिल्लीला रवाना झाले आहेत. त्यांच्यापाठोपाठ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे देखील दिल्लीला रवाना होण्याची शक्यता आहे. या सगळ्या घडामोडींदरम्यान सुनील तटकरे यांनी महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.

सुनील तटकरे नेमकं काय म्हणाले?

“आम्ही एकसंघाने काम करण्याचा निर्णय घेतलेला आहे. काही वेळेला काही गोष्टींमध्ये थोडासा वेळ होऊ शकतो. पण कुठल्याही प्रकारचा समज-गैरसमज न राहता स्पष्टपणाची भूमिका घेऊन एका ताकदीने पुढे जाण्याचा निर्णय घेतलेला आहे. त्यामुळे मंत्रिमंडळाचा विस्तार, पालकमंत्री याबाबतचा निर्णय उद्या संध्याकाळपर्यंत झालेला आपल्याला पाहायला मिळेल”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.

हे सुद्धा वाचा

“मंत्रिपदाची शपथ घेतल्यापासून अजित पवार दिल्लीला गेलेले नाहीत. मंत्रिमंडळाचा विस्तार हा मुद्दा काही तिढा नाही. तसेच याबाबतचा निर्णय राज्य स्तरावर घेतला जाणारा आहे. रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आम्ही कधीच आग्रही नव्हतो. शेवटी ज्यावेळी एकत्रित काम करण्याचं ठरलेलं असतं तेव्हा त्याबाबतची जाणीव मनात ठेवून काम करणं महत्त्वाचं असतं. मला वाटतं, याबाबतचा निर्णय मुख्यमंत्री त्यांच्या स्तरावर घेतील”, अशी प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली आहे. राज्यात राजासारखी राहणारी व्यक्ती दिल्लीला सुभेदार होण्यासाठी जात असल्याची टीका जितेंद्र आव्हाड यांनी केली. आव्हाडांच्या या टीकेबद्दल सुनील तटकरे यांना प्रश्न विचारला असता, “आव्हाडांसारख्या बेताल पद्धतीचे व्यक्त करणाऱ्या लोकांकडे मला फारसं लक्ष द्यावं असं वाटत नाही”, असं प्रत्युत्तर त्यांनी दिलं.

“अतिशय व्यवस्थित पद्धतीने काम सुरु आहे. काहीच अडचण नाही. आम्ही एकदिलाने काम करतोय”, अशीदेखील प्रतिक्रिया सुनील तटकरे यांनी दिली.

वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल
दिवसा तरूणीची हत्या, सुऱ्यानं 4-5 वार; थरकाप उडवणारा व्हिडीओ व्हायरल.