मुंबईसाठी स्वतंत्र आणि मोठ्या पॅकेजची घोषणा करा, जितेंद्र आव्हाड यांची मागणी

मुंबईतील उद्योग, आरोग्य, कामगार क्षेत्रासाठी स्वतंत्र आणि मोठया पॅकेजची आवश्यकता असल्याचं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं (Jitendra Awhad Demands Separate Package for Mumbai in battle against Corona)

मुंबईसाठी स्वतंत्र आणि मोठ्या पॅकेजची घोषणा करा, जितेंद्र आव्हाड यांची मागणी
Follow us
| Updated on: May 14, 2020 | 3:50 PM

मुंबई : देशात कर रुपाने सर्वात जास्त पैसा मुंबईतून जमा होतो. त्यामुळे मुंबईतील विविध क्षेत्रांसाठी स्वतंत्र आणि मोठया पॅकेजची घोषणा करावी, अशी मागणी गृहनिर्माण मंत्री आणि राष्ट्रवादीचे दिग्गज नेते जितेंद्र आव्हाड यांनी केली आहे. (Jitendra Awhad Demands Separate Package for Mumbai in battle against Corona)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘कोरोना’ संकटाचा सामना करण्यासाठी 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजची घोषणा मंगळवारी केली होती. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण याविषयी तीन दिवस विस्तृत माहिती देत आहेत.

“भारताच्या जडणघडणीत मुंबईचा मोठा वाटा आहे. देशात कररुपाने सर्वात जास्त पैसा हा मुंबईतून जमा होत होतो. पण आता मुंबईला नव्याने उभारी देण्याची गरज आहे. मुंबईतील उद्योग, आरोग्य, कामगार क्षेत्रासाठी एका स्वतंत्र आणि मोठया पॅकेजची आवश्यकता आहे. मुंबईच्या योगदानाची परतफेड करण्याची हीच ती वेळ” असं ट्वीट जितेंद्र आव्हाड यांनी केलं आहे.

हेही वाचा : सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांसाठी 3 लाख कोटींचे विना हमी कर्ज, गुंतवणुकीच्या मर्यादेत वाढ

सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग (एमएसएमई) कुटीर उद्योग आणि गृह उद्योगांना कुठलीही मालमत्ता तारण न ठेवता 3 लाख कोटी रुपयांपर्यंत विनाहमी कर्ज देण्यात येणार आहे, अशी घोषणा काल निर्मला सीतारमण यांनी केली. यामुळे 45 लाख उद्योगांना पुन्हा कामकाज सुरु करता येईल आणि रोजगारदेखील सुरक्षित राहतील.

‘कोरोना’मुक्त जितेंद्र आव्हाड

‘कोरोना’शी यशस्वी झुंज दिल्याने जितेंद्र आव्हाड यांना अवघ्या काही दिवसांपूर्वी डिस्चार्ज मिळाला होता. आव्हाडांनी आपल्या प्रकृतीविषयी ट्विटरवरुन माहिती देत उपचार करणारे सर्व डॉक्टर्स, नर्सेस, वॉर्डबॉय यांचे आभार व्यक्त केले होते.

(Jitendra Awhad Demands Separate Package for Mumbai in battle against Corona)

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.