NCP MLA Disqualification | पितांबर मास्तरांचं वय काय?, राष्ट्रवादीच्या सुनावणीतील कळीच्या प्रश्नाने भुवया उंचावल्या
विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणी प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली आहे. सुनावणीच्या पहिल्याच दिवशी या प्रकरणी नवा ट्विस्ट आलेला बघायला मिळाला. त्यामुळे या प्रकरणी आता काय-काय घडतं ते पाहणं रंजक ठरणार आहे.
विनायक डावरुंग, Tv9 मराठी, मुंबई | 24 जानेवारी 2024 : विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यासमोर आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदार अपात्रता प्रकणारवर प्रत्यक्ष सुनावणीला सुरुवात झाली आहे. या प्रकरणी मंगळवारी (23 जानेवारी) सुनावणीचा पहिला दिवस होता. या सुनावणीवेळी एका कळीच्या प्रश्नाने अनेकांच्या भुवया उंचावल्या. खरंतर सुनावणीचा पहिलाच दिवस हा महत्त्वाचा ठरला. कारण या सुनावणीत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मोठा गौप्यस्फोट केला. सुनावणीच्या पहिल्याच दिवशी त्यांची साक्ष नोंदवण्यात आली. उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाच्या वकिलांनी जितेंद्र आव्हाड यांना पक्षांतर्गत निवडणुका घेण्यात आल्या होत्या का? असा प्रश्न विचारला. त्यावर आव्हाडांनी निवडणुका घेण्यात आल्या होत्या. पण त्याची कागदपत्रे ज्या बंद कपाटीत ठेवली होती ती कागदपत्रे पक्ष सोडून जाणाऱ्या व्यक्तींना गहाळ केली असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाड यांनी केला.
यावेळी जितेंद्र आव्हाड यांना आमदारांनी अजित पवारांना कसा पाठिंबा दिला? याबाबत प्रश्न विचारले. जितेंद्र आव्हाड यांनी सर्व घटनाक्रम सांगितला. जितेंद्र आव्हाड यांच्यानंतर शरद पवार गटाचे नेते हेमंत टकले यांची साक्ष नोंदवण्यात आली. वेळेअभावी त्यांची अपूर्ण साक्ष नोंदण्यात आली. त्यांची आज पुन्हा साक्ष नोंदवण्यात आली. यावेळी त्यांना वकिलांनी पितांबर मास्तरांचं वय काय? असा प्रश्न विचारला आणि अनेकांच्या भुवया उंचावल्या. नेमके सवाल-जवाब काय घडले, याबाबत आम्ही तुम्हाला सविस्तर माहिती देणार आहोत.
नेमते सवाल-जवाब काय?
अजित पवार गटाचे वकील : शरद पवार यांनी २ मे २०२३ रोजी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता का?
जितेंद्र आव्हाड : त्यांनी इच्छा व्यक्त केली. पण राजीनामा दिला नाही. तेव्हा छगन भुजबळ साहेब हजर होते. तेव्हा ते म्हणाले की, साहेब तुम्हीच आमची कमिटी आहात. तुमच्याशिवाय आम्ही आमच्या राजकीय भविष्याचा विचार करू शकत नाहीत.
जितेंद्र आव्हाड सभागृहात जोरात माईकवर ओरडले. यावेळी विधानसभा अध्यक्षांनी आव्हाडांना समज दिली. यावेळी अजित पवार गट वकील आणि आव्हाड आमनेसामने आले. शरद पवार गटाच्या वकिलांनी सुद्धा आव्हाडांना समज दिली. जे प्रश्न विचारले जातात आहेत त्यावर ऐकून हळू उत्तर द्या, अशी तंबी जितेंद्र आव्हाड यांना देण्यात आली.
आव्हाड : वकिलांना मी सांगू इच्छितो की अनिल पाटील मोठमोठ्याने सांगत होते की तुम्ही जर राजीनामा देणार असाल तर मी ही माझ्या विधानसभा सदस्यात्वाचा राजीनामा देतो. हेच वाक्य पुढे त्यांनी प्रेसला सांगितले. जयंत पाटील आले. त्यांच्या डोळ्यात पाणी होते आणि ते साहेबांजवळ जाऊन म्हणाले की, साहेब मी राजकारणात आलो तेच तुम्हाला बघून. तुम्ही असा निर्णय कसा काय घेता तो तुम्हाला घेता येणार नाही. तिथे उपस्थित असेल्यांनी सभागृहात प्रचंड आरडाओरड सुरू केली. ते सांगू लागले की तुम्ही जाऊ शकत नाही. मी बोललो साहेब मी माझ्या यौवनातला काळ तुमच्या बरोबर होतो. मी दुसरे दार पाहीलेच नाही. तुमचा निर्णय तुमचा असू शकत नाही. तुमचा तुमच्यावर जितका अधिकार आहे त्यापेक्षा जास्त आमचा तुमच्यावर अधिकार आहे. अख्या सभागृहाची हीच भावना होती.
वकील : तुमचं म्हणणं आहे का शरद पवार यांनी राजीनामा मागे घ्यावा?
आव्हाड : त्यांनी शब्दातून कृती करणार असं म्हटलं. याचवेळी सगळीकडून आवाज उठला. याच वेळी भाषण दरम्यान त्यांनी १७ जणांची कमिटी स्थापन केली. ही कमिटी काही पर्याय दिसत आहेत का? याबद्दल निर्णय देणार होती.
वकील : शरद पवार यांनी राजीनामा देणार असल्याचं त्यांनी स्वतः ठरवलं होते? ( अशी मानसिकता तयार केली होती) असं तुम्ही म्हटलं आहे. याचा अर्थ काय घ्यायचा?
आव्हाड : त्यांनी शब्दातून कृती करणार असं सांगितलं होते. पण कृती केली नव्हती. या कमिटीत एकमताने १७ जणांनी ठरवलं. या कमिटीने एका ओळीचा ठराव मंजूर केला की शरद पवार यांनीच पुढे अध्यक्षपदी कायम राहावं असं ठरलं! जे सदस्य याचे सदस्य होते. यामध्ये महत्वाची भूमिका अजित पवार, सुनील तटकरे, हसन मुश्रीफ, प्रफुल पटेल आणि अन्य ज्यांनी पक्ष सोडला त्यांची होती
वकील : तुम्ही राष्ट्रीय जनरल सेक्रेटरी आहात का ?
आव्हाड – होय
वकील : जुलै आणि ऑगस्ट, सप्टेंबर २०२२ मध्ये देशात कोणत्याही ठिकाणी तुमच्या पक्षाच्या निवडणुका झाल्या होत्या का?
आव्हाड : मी याआधी या प्रश्नाचं उत्तर दिलं आहे. मुद्दाम हाच प्रश्न विचारला जातोय.
वकील : कोणता प्रश्न पुन्हा विचारला जातो? कोणत्या आधीच्या प्रश्नांची पुनरावृत्ती होत आहे असे वाटतं?
आव्हाड : मी निवडणूक घेण्यात आलेल्या कमिटीचं सदस्य नव्हतो. मला याबाबत माहिती नाही.
वकील: तुम्ही वर्किंग कमिटीने मेंबर आहात का?
आव्हाड – permenant invitee
वकील : वर्किंग कमिटीच्या निवडणुका झाल्या. त्याचा तुम्ही भाग होता का?
आव्हाड : मी याचा भाग नव्हतो. मला माहिती नाही.
वकील : शिस्तपालन समितीची स्थापना कशी झाली?
आव्हाड : मझ्या वैयक्तिक माहितीनुसार पक्षाध्यक्षांचा वरिष्ठ सहकाऱ्यांसोबत सल्ला घेऊन केल्याची माहिती आहे.
वकील : जून २०२३ महिन्याच्या शेवटी आणि जुलै महिन्याच्या सुरुवातीला शरद पवार यांना किती विधानसभेतील आमदारांचा पाठिंबा होता?
आव्हाड : सर्व ५४ आमदार पवारांच्या पाठीशी होते. मात्र जुलै महिन्यात ९ आमदारांनी मंत्रिपदाची शपथ घेतली. त्याआधी १ जुलैला विरोधीपक्षनेते म्हणून अजित पवारांनी स्टेटमेंट दिलं होते. शिंदे यांच्या नेतृत्वातील सरकारला criticise केलं होते. समृद्धी हायवेवरील अपघातावरून त्यांनी आरोप केले होते. २५ जुलैला निवडणूक आयोगाने आम्हाला पत्र लिहिलं. त्यांनी त्यांच्या समर्थकांच्या सह्या एका कागदावर घेतल्या होत्या. यावर तारीख नव्हती. सह्या केलेलं आमदारांचे पत्र आम्हाला निवडणूक आयोगाने दिल्यानंतर आम्हाला कळलं की अजित पवारांच्या पाठीशी किती आमदार आहेत ते! माझा विश्वास बसत नाही की त्यांनी हे सगळं गुपचूप का ठेवलं?
वकील- तुमच्या माहितीनुसार शरद पवार हे कोणत्या तारखेला अध्यक्ष झाले?
जितेंद्र आव्हाड- १ सप्टेंबरला शरद पवार अध्यक्ष झाले. नामांकन भरण्याच्या दिवशी एकच नाव आले होते. ते शरद पवार यांचे होते.
वकील – तुम्ही नोटीस पाठविलेले आमदार ते अजित पवारांबरोबर आहेत शरद पवारांबरोबर नाहीत हे कधी कळले?
जितेंद्र आव्हाड- २५ जुलैनंतर आमच्या लक्षात आले की आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला.
आव्हाड – २५ जुलैपर्यंत ४५ आमदार आमच्यासोबत आहेत असं आम्हाला ज्ञात होतं. पण निवडणूक आयोगाचं पत्र आल्यानंतर ३५-४० आमदारांनी त्यांना समर्थन दिल्याचं आम्हाला कळालं. यादरम्यान आमदारांची परवानगीशिवाय भेट घेतली. आणि आम्ही तुमच्यासोबतच आहोत असं सांगितलं. तुम्हीच आमचे विठ्ठल आहात… सर्वकाही आहात.. आम्ही तुम्हाला सोडून जाऊ शकतो?
वकील – २५ जुलै नंतर काय परिस्थिती होती?
(हेही वाचा : ‘त्या’ एका चुकीमुळे शरद पवार यांच्या हातून पक्ष जाणार?)
आव्हाड – पक्षातील नेत्यांनी सल्लामसलत करुन शिस्तभंगाची कारवाई करण्याचा विचार केला. यादरम्यान मला सह्या केलेल्या पत्रात आमदार आशुतोष काळे यांच नाव दिसलं. तेव्हा ते परदेशात असून १२ जुलैला परत येणार असल्याच काळेंच्या खास माणसाने मला सांगितल.
आव्हाड – मी १२ आमदारांच्या अपात्रेच्या याचिकेवर सही केली. उर्वरीत याचिकेवर जयंत पाटील यांनी सही केली.
वकील – पक्षाच्या अध्यक्षाच्या निवडीसाठी २०२२ मध्ये कधी निवडणूक झाली?
आव्हाड – याचा अर्थ काय ?
वकील – शरद पवारांची निवड कधी ठरली?
आव्हाड – हे प्रक्रियेत कधीच ठरलेलं नव्हतं. निवडणुकीची प्रक्रिया सुरू झाल्यानंतर पक्षाचे नेतृत्व करणाऱ्या शरद पवार ज्यांचा लोकशाहीवर प्रचंड विश्वास आहे, नॅामिन्शन भरुन निवडणुक प्रक्रिया सुरू झाली. १ सप्टेंबर रोजी शरद पवार यांचे पक्षाचे अध्यक्ष म्हणून उमेदवारी अर्ज आला. तो एकमेव अर्ज होता
आव्हाड – २५ जुलैनंतर आम्हाला कळालं की त्या आमदारांनी अजित पवार यांना पाठिंबा दिला
वकील – तुम्ही अपत्रातेची नोटीस पाठवली आमदार अजित पवाररांसोबत आहेत, आणि शरद पावरांसोबात नाहीत? हे तुम्हाला कधी कळलं?
आव्हाड – २५ जुलैनंतर आम्हाला स्पष्ट झालं
वकील – तुमच्या माहितीनुसार ही स्थिती अजून कायम आहे का?
(यावर शरद पवार यांच्या वकिलांनी आक्षेप घेतला)
जितेंद्र आव्हाड : सभागृहात निवडून आलेले आमदार कोणत्याही ठराव केल्याशिवाय शरद पवारांना पदावरून काढू शकत नाहीत. निवडणूक आयोगाला दिलेलं पत्र काही सह्यांच आहे. त्यावर तारीख नाही. सध्या कागदावर घेण्यात आलेल्या सह्या आहेत. आपला पक्ष आधीच फुटला आहे आणि नंतर शपथ घेतली, हे दाखवण्यासाठी अशा प्रकारे पत्र दाखवण्यात आली. याच पत्रावर आशुतोष काळे यांची सही आहे. हे पत्र ३० तारखेचे असल्याचं दाखवत आहेत. यावेळी तर ते देशाबाहेर होते. राष्ट्रीय कार्यकारिणीत १२ निवडून दिलेले सदस्य आहेत. आणि १६ invitee आहेत. याबाबत पत्र प्रफुल पटेल यांची दिलं होते. एकूण २८ सदस्य आहेत. २ जुलैला झालेल्या पत्रकार परिषदेत मी उपस्थित नव्हतो. मी शरद पवार यांच्याबाबत अशी माहिती ठेवत नाही.
आव्हाड – राष्ट्रीय कार्याध्यक्ष म्हणून सुप्रिया सुळे आणि प्रफुल्ल पटेल यांची निवड केली. तेव्हा पटेलांनी ट्वीट केलं होतं की, अनेक वर्षांच्या अनुभवानंतर शरद पवारांनी मला कार्याध्यक्ष केलं. पक्षातील फुटीनंतर अजित पवार गटात पटेल यांना कोणी पद दिलं हे मला माहिती नाही. त्यांनी जाहीर केलं की अजित पवार हे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत.
वकील : न्यायालयीन कागदपत्रांवर तुम्ही सह्या केल्या का ?
आव्हाड – चीफ रिडर्निंग ॲाफीसर पितांबर मास्तर यांनी सह्या केलेली कागदपत्रे ही निवडणूक आयोगाला सुपूर्द केली. त्यामुळे विचारलेल्या प्रश्नाबद्दल मला माहिती नाही
आव्हाड – दिलीप वळसे पाटील यांच्यासारखे वरिष्ठ नेते आणि आरोप झाल्यानंतरही मंत्रीमंडळात छगन भुजबळ यांना शपथ घ्यायला सांगितली. हसन मुश्रीफ यांचा राजकीय जन्म शरद पवारांच्या धर्मनिरपेक्षतेमुळे झाला. बलवान असलेले सदाशिव मंडलिक, धनंजय मुंडे हे भाजपातून बाहेर पडल्यानंतर त्यांना शरद पवारांनी त्यांना विधान परिषदेत विरोधीपक्षनेता केलं. अनिल पाटील जे भाजपात असताना 2 निवडणुकीत पराभूत झाले. तेव्हा शरद पवार आपल्या उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी गेले होते.
जितेंद्र आव्हाड यांची फेरसाक्ष संपली. यानंतर हेमंत टकले यांची फेरसाक्ष नोंदवण्याचं काम सुरु झालं.
वकील – प्रतिज्ञापत्रावरील ही सही कोणाची?
टकले – ती माझी सही आहे
वकील – यातील आशय खरा आहे का?
टकले – माझ्या माहितीनुसार पत्रातील सगळा आशय बरोबर आहे. १ सप्टेंबर २०२२ रोजी निवड झाली होती.
वकिल – १०/११ सप्टेंबरला राष्ट्रीय कार्यकारीणी झाली होती का ?
टकले – होय
वकील – पितांबर मास्तरांची सही केवळ दाखवण्याकरीता आहे का?
टकले – नाही… निवडणुका होतात
वकिल – पितांबर मास्तर यांच वय काय ?
टकले – ८० च्या वर
यानंतर वेळेअभावी सुनावणीचा कालावधी संपला, आता या प्रकरणाची पुढील सुनावणी 25 जानेवारी 2024 ला होणार असल्याचं स्पष्ट करण्यात आलं. सुनावणीच्या सुरुवातीला हेमंत टकले यांची साक्ष नोंदवण्याचं काम सुरु होईल.