विरोधकांचं ठरलं..! सरकारला कोंडीत पकडण्यासाठी रणनीती आखली
जितेंद्र आव्हाड यांनी हिवाळी अधिवेशनाची आठवण करून देत. सरकारला त्यांनी एक प्रकारचा इशारा दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
मुंबईः अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा पहिला दिवस आहे. त्यामुळे विरोधकांकडून आता सरकारला कोंडीत पकडण्यासाठी रणनिती आखत आहे. सरकारच्या या चुकांवर बोट ठेवण्यासाठी आता विरोधकांकडून जोरदार तयारी केली जात असून राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी शिंदे-फडणवीस सरकारने ज्या चुका केल्या आहेत त्यांची यादीच सांगणार असं सांगत सरकारला कोंडीत पकडण्यासाठी आमच्या महत्वाचे मुद्दे आहेत असंही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.
शिंदे-फडणवीस सरकारने हिवाळी अधिवेशनामध्ये काही चुका केल्या आहेत. त्यामुळे विरोधकांकडून सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.
नागपूरच्या हिवाळी अधिवेशनात ज्या पद्धतीने सरकारने चुका केल्या आहेत. ज्या चुकांवर पांघरून घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे. ते विषय या अधिवेशनामत निघणार आहेत असंही त्यांनी यावेळी सांगितले.
आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या या इशारामुळे आता सरकार विरोधकांना काय उत्तर देणार याकडे आता साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
जितेंद्र आव्हाड यांनी हिवाळी अधिवेशनाची आठवण करून देत. सरकारला त्यांनी एक प्रकारचा इशारा दिला आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये खडाजंगी होण्याची शक्यता आहे.
जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याने त्यांनी तक्रार दिली होती. त्यावर मुख्यमंत्र्यांनी कालच्या पत्रकार परिषदेत काही नेत्यांना जीवे मारण्याच्या धमकी वगैरे मिळाल्या आहेत.
त्यावर आमचे लक्ष असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले होते. त्यानंतर ते म्हणाले होते की, जर कुणी सनसनाटी निर्माण करण्याचा प्रयत्न केला गेला तर त्याच्यावरही कारवाई केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
त्यावर जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना सांगितले की, माझ्या जावयाला आणि माझ्या मुलीला जीवे मारण्याची धमकी कुणी देत असेल आणि ती गोष्ट मुख्यमंत्र्यांना सनसनाटी वाटत असेल तर त्यांचा कुटुंबवत्सलपणा आणि त्यांची प्रगल्भता दिसून येते असा टोला त्यांनी शिंदे यांना लगावला आहे.
ज्या अधिकाऱ्याकडून जितेंद्र आव्हाड यांच्या मुलीला आणि जावयाला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. तो अधिकारी मुख्यमंत्र्यांचा लाडका अधिकारी आहे. आणि त्यांच्या अभयाखालीच त्यांचे हे कारनामे सुरु असल्याची टीकाही त्यांनी केली.