“मी थंड पण नाही राहणार आणि शंड पण नाही मी”; राष्ट्रवादीच्या नेत्यानं एकाच वाक्यात सत्ताधाऱ्यांना सुनावलं

माझ्या स्वतः च्या पोरीला गोळ्यांनी उडवण्याची धमकी मिळते आणि पोलीस कारवाईपण करत नाहीत. यावेळी त्यांनी उद्वेगानेही सांगत म्हणाले की, राजकारण गेलं खड्ड्यात.

मी थंड पण नाही राहणार आणि शंड पण नाही मी; राष्ट्रवादीच्या नेत्यानं एकाच वाक्यात सत्ताधाऱ्यांना सुनावलं
Follow us
| Updated on: Feb 25, 2023 | 11:41 PM

मुंबईः सध्याच्या राजकारणावर मला बोलायचं आहे असं सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी आज सत्ताधारी आणि विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. सध्या 6 महिने मी मंत्री नाहीय मात्र पण जे गेल्या सहा महिन्यामध्ये माझ्यावर चार केसेस टाकण्यात आल्या त्यामधील एकही केस खरी नाही असंही त्यांनी यावेळी स्पष्ट सांगतिले. मला जामीन देताना न्यायाधीशांनी सांगितलं की ही केस नाही तरीही माझ्यावर केस टाकण्याचा प्रयत्न केला गेला आहे.

माझ्यावर पहिली केस टाकली तेव्हा गुन्हे वेगळ्या प्रकारचे होते, मात्र मला जेलमधे टाकलं तेव्हा कलम 7 आमच्यावर लावले गेले जे अस्तित्वात नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

माणसांच्या गर्दाती ज्या ज्या बाईला मी सांगतो आहे की, बाजूला व्हा, धक्काबुक्की होईल तिलाच हाताशी धरून माझ्यावर 354 गुन्हा टाकण्यात आला आहे. मात्र हे चुकीचे आहे.

यावेळी आमदार जितेंद्र आव्हाड यांनी बोलताना सांगितले की, अनेक लोकांचे फोन आले. आमच्या येथील अधिकारी बोलताना बोलतोय आहे की, सुभाशसिंग ठाकूर म्हणजे दाऊदचा राईट हँड याला वापरून मी आव्हाडच्या पोरीला आणि नवऱ्याला मारून टाकीन टेप आहे. टेप ऐकूनही पोलिसांनी त्याला अजून अटकसुद्धा केली नाही असंही त्यांनी यावेळी सांगितले.

आम्हालासुद्धा साध्या गुन्ह्यात आत टाकू शकतात, पण मी तुमच्या साक्षीने सांगतोय की तुम्ही माझी निष्ठा विकत घेऊ शकत नाही. मी मृत्यूला घाबरत नाही मात्र मी घाबरतो एकच गोष्टीला तो म्हणजे परमेश्वर कारण माझी चौकट साफ असल्याचेही जितेंद्र आव्हाड यांनी सांगितले.

जितेंद्र आव्हाड यांनी पोलिसांच्या कारवाईवरही बोट ठेवले. ते म्हणाले की, ही कोणती पद्धत आहे की, कळवा पोलीस स्टेशनला फोन आला की आमच्या चार-चार कार्यकर्त्यांना आत टाकायचं पण त्यांचा दोष आणि गुन्हा काहीही नसताना त्यांनी आता टाकले आहे.

तर त्यांनी एका नगरसेवकाचे उदाहरण देताना सांगितले की, गटाराचे काम करताना पोलीस आमच्या लोकांना पोलीस आता टाकत आहेत. ठीक आहे आज राज तुम्हारा है कल राज हमारा होगा असा इशाराही त्यानी यावेळी दिला आहे.

पोलिसांच्या कारवाईवर बोलताना त्यांनी सांगितले की, जनतेशी असं वागायचं नसतं लोकशाहीमधे सर्व अधिकार जनतेकडे असतात पण तुम्ही पैशांनी आमदार विकत घेऊ शकालही. खासदार विकत घेऊ शकाल पण पैशांनी जनता विकत घेऊ शकत नाही कारण जनता स्वतः ला कधीच विकत नाही असा टोला त्यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

यावेळी सत्ताधाऱ्यांना इशारा देताना ते म्हणाले की, हे नजीकच्या काळात उघड होईल की ज्या पद्धतीने दादागिरीचे राजकारण सुरू आहे ते राजकारण महाराष्ट्र जास्त दिवस सहन करणार नाही.

माझ्या स्वतः च्या पोरीला गोळ्यांनी उडवण्याची धमकी मिळते आणि पोलीस कारवाईपण करत नाहीत. यावेळी त्यांनी उद्वेगानेही सांगत म्हणाले की, राजकारण गेलं खड्ड्यात.

एका पोरीचा मी बाप आहे मी थंड पण नाही राहणार आणि शंड पण नाही मी अशा शब्दात त्यांनी ठणकावून सांगितले आहे. आज एवढ्या जनतेसमोर सांगतो आहे की, तुमचा पाठिंबा माझ्यासोबत राहुद्या बाकी सगळ्यांसोबत लढाईला मी तयार आहे असा विश्वासही त्यांनी यावेळी दिला आहे.

मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?
मंत्री उदय सामंतांकडून धनंजय मुंडेंच्या खास माणसाच्या अटकेचे संकेत?.
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?
छगन भुजबळ 8 दिवसांत मंत्री की भाजपात? नवी इनिंग सुरू करणार?.
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.