‘तुमचं माझं नातं काय? जय शिवाजी, जय शिवाजी’, जामीन मिळताच आव्हाडांच्या घोषणा

जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घोषणाबाजी केली.

'तुमचं माझं नातं काय? जय शिवाजी, जय शिवाजी', जामीन मिळताच आव्हाडांच्या घोषणा
जितेंद्र आव्हाड
Follow us
| Updated on: Nov 12, 2022 | 6:05 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना आज अखेर ठाण्याच्या विवियाना मॉल मारहाण प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन मंजूर झालाय. आव्हाडांना जामीन मंजूर झाल्यानंतर ते न्यायालयाबाहेर आले. यावेळी न्यायालयाबाहेर राष्ट्रवादी काँग्रेसच्या शेकडो कार्यकर्त्यांनी गर्दी केलेली होती. यावेळी जितेंद्र आव्हाडांनी जोरदार घोषणाबाजी केली. विशेष म्हणजे आव्हाडांकडून यावेळी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या नावाने जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

जितेंद्र आव्हाड पोलिसांच्या ताब्यातून सुटल्यानंतर त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी ‘तुमचं माझं नातं काय? जय शिवाजी, जय शिवाजी’अशी घोषणाबाजी केली. त्यांच्या घोषणाबाजीला कार्यकर्त्यांनी देखील उत्सफुर्त प्रतिसाद दिला.

जितेंद्र आव्हाड यांनी जामीन मिळाल्यानंतर पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी आपला पोलिसांवर रोष नाही, असं स्पष्ट केलं. तसेच आपल्याला पोलीस ठाण्यात ठेवण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करण्यात आले. त्यामुळे आपल्याला रात्रभर पोलीस ठाण्यात राहावं लागलं, अशी भूमिका त्यांनी मांडली.

हे सुद्धा वाचा

“ठाण्याच्या वर्तक नगरच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचा या प्रकरणाशी शून्य संबंध आहे. त्यांची हतबलता मला प्रत्येक मिनिटाला समजत होती. त्यांच्या डोळ्यांमधून फक्त अश्रू येणं बाकी होतं. बाकी सगळे हतबल होते. कारण असं कुणाला अटक करत नाही”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

“मला जी कलम 41 अ अन्वये नोटीस देण्यात आली होती ती दुपारी दोन वाजता मिळाली होती. आणि त्यामध्ये पाच वाजता हजर व्हावे, असं सांगितलं होतं. त्याआधीच त्यांनी मला अडीच वाजता अटक केली”, असा दावा आव्हाडांनी केला.

जितेंद्र आव्हाड यांच्या घोषणाबाजीचा व्हिडीओ :

“सात वर्षाच्या आतमध्ये असलेल्या शिक्षेसाठी तुम्हाला नोटीस द्यावी लागते.सुप्रिया कोर्टाने याबाबत काही नियम लागू केले आहेत. मुंबई हायकोर्टाचे जस्टीस डांगरे यांनी सप्टेंबरमध्ये नोटीस दिल्यानंतर 72 तासांमध्ये अटक करु नये, असं म्हटलं आहे”, अशी भूमिका त्यांनी मांडली.

“माझ्याबरोबर बारा आरोपी आहोत. माझ्या नोटीसवर क्रिमिनल अॅमेंडमेंट अॅक्ट सेक्शन 7 टाकण्यात आलं. इतरांवर टाकण्यात आलं नाही. म्हणजे यांना एखाद्या दिवशी जेलमध्ये ठेवायचंच असेल तर कोणतं कलम लावावं हे त्यांच्या मनात होतं. पण कलमसाठी त्यांना तक्रारदार मिळत नव्हता तर त्यांनी जोरजबरदस्ती मॉल आणि सिनेपोलिसांवर केला. माझ्या नोटीसवर क्रिमिनल अॅमेंडमेंट अॅक्ट सेक्शन 7 ची शिक्षा सहा महिन्याचीच आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ
'ठाकरे गट झोपेत, काँग्रेसची मोडलेली पाठ..',कोल्हेंच्या वक्तव्यानं खळबळ.
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण
वडेट्टीवारांचा गंभीर आरोप, 'मविआ'ला फटका बसण्याचं सांगितलं कारण.
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर
...म्हणून शरद पवार महाविकास आघाडीत नाराज, मोठी माहिती समोर.
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप
काँट्रॅक्ट द्यायचं असेल तर कराडशी संपर्क साधा.', आव्हाडांचं गंभीर आरोप.
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?
शाळेच्या शौचालयात विद्यार्थिनीचं टोकाच पाऊल अन् संपवलं जीवन, काय घडलं?.
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य
'तर आम्ही आमचा मार्ग...'; मविआत वादाची ठिणगी? राऊतांचं मोठं वक्तव्य.
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले...
मंत्रिपद तूर्त वाचलं, मुंडेंच्या राजीनाम्यावर दादा स्पष्टच म्हणाले....
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा
आकाचा आकासुद्धा 302 च्या लाईनमध्ये? सुरेश धसांचा वाल्मिक कराडला इशारा.
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं
'हाके भाजपचे हस्तक', माईकच हिस्कावला अन् स्थानिकांनी त्यांनाच सुनावलं.
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?
धस अन् दादांमध्ये मुन्नी वॉर, बीड प्रकरणावरून कोणी कोणाला धरलं धारेवर?.