’24 नको, 22 जानेवारीलाच येतो’, रोहित पवार यांची ईडीच्या समन्सवर पहिली प्रतिक्रिया

रोहित पवार यांना ईडीकडून चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे. ईडीने 15 दिवसांपूर्वीच रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीशी संबंधित सहा ठिकाणी छापेमारी करण्यात आली होती. त्यानंतर आता त्यांना समन्स बजावण्यात आलं आहे. ईडीच्या या कारवाईवर रोहित पवार यांची पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

'24 नको, 22 जानेवारीलाच येतो', रोहित पवार यांची ईडीच्या समन्सवर पहिली प्रतिक्रिया
rohit pawarImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Jan 19, 2024 | 8:37 PM

मुंबई | 19 जानेवारी 2024 : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांचे नातू आमदार रोहित पवार यांना ईडीने समन्स बजावलं आहे. ईडीने मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी रोहित पवार यांना चौकशीचं समन्स बजावलं आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र राज्य शिखर बँकेकडून औरंगाबादमधील कन्नड सहकारी साखर कारखान्याचा करण्यात आलेल्या लिलाव प्रकरणी ईडीने रोहित पवार यांना समन्स बजावलं आहे. रोहित पवार यांच्या बारामती अ‍ॅग्रो कंपनीने कन्नड सहकारी साखर कारखाना विकत घेतला होता. याच प्रकरणाची सविस्तर चौकशी करण्यासाठी ईडीकडून रोहित पवार यांना 24 जानेवारीला ईडी कार्यालयात हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. ईडीच्या या समन्सवर रोहित पवार यांनी ट्विटरवर पहिली प्रतिक्रिया दिली. आपण ईडी अधिकाऱ्यांना 24 जानेवारी पेक्षा 22 किंवा 23 जानेवारीला चौकशीसाठी बोलवा, असं सांगितल्याचं रोहित पवार म्हणाले आहेत.

“ईडीच्या बातमीमुळे राज्यातून अनेकांनी फोन आणि मेसेज केले. या सर्वांचे मनापासून आभार मानतो. पण काळजीचं काहीही कारण नाही. कोणत्याही अधिकाऱ्यांची चूक नसते, तर ते केवळ आदेशाचं पालन करुन त्यांचं काम करत असतात म्हणून त्यांना सहकार्य करणं हे आपलं कर्तव्य आहे. आजपर्यंत सर्वच यंत्रणांना सहकार्य केलं आणि यापुढंही राहील”, असं रोहित पवार म्हणाले आहेत.

“ईडीला विनंती केलीय की, मराठा आरक्षणाचा विषय महत्त्वाचा असून राज्यभरातून आंदोलक मुंबईत येत आहेत. या पार्श्वभूमीवर २४ तारखेऐवजी २२ किंवा २३ तारखेलाच चौकशीला बोलवावं, तशी माझी तयारी आहे. मला अपेक्षा आहे की, ईडी ही विनंती मान्य करेल”, अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे.

(हेही वाचा : रोहित पवार यांना ईडीचं समन्स का? कारवाईमागे नेमकं कारण काय?)

किशोरी पेडणेकर यांनाही समन्स

रोहित पवार यांच्या पाठोपाठ ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनादेखील ईडीने चौकशीसाठी उपस्थित राहण्याचं समन्स बजावलं आहे. कथित कोविड बॉडी घोटाळा प्रकरणी पेडणेकर यांना 25 जानेवारीला चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावण्यात आलं आहे. ईडीच्या या कारवाईवर किशोरी पेडणेकर यांचीदेखील पहिली प्रतिक्रिया समोर आली आहे.

“मुळात मला आश्चर्य वाटतं, ईडी आपल्या ऑफिसमध्ये बसते की कोणाच्या घरी? कोव्हिड घोटाळ्याशी माझा काडीचाही संबंध नाही. मी कुठलाही गुन्हा केला नाही. माझ्यापर्यंत अजून नोटीस पोहचली नाही. आली तर मी चौकशीला नक्की जाईन. मात्र मला अजून नोटीस आली नाही. ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बरोबर जे आहेत त्यांना टार्गेट केलं जातंय”, अशी टीका किशोरी पेडणेकर यांनी केली.

तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे
Beed Morcha: दोन तारखेच्या आधी अटक करा, अन्यथा... - बंजरंग सोनावणे.
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस
'पंकूताई...वाट वाकडी करुन...,' काय म्हणाले सुरेश धस.
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
डॉ. मनमोहन सिंग यांना अखेरचा निरोप, शासकीय इतमामात अंत्यसंस्कार.
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू
Beed Morcha : सत्य महत्वाचं असते, सत्ता नाही...काय म्हणाले बच्चू कडू.
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी
सरपंच देशमुख हत्या प्रकरणात न्यायासाठी मोर्चा सुरु, मुंग्यासारखी गर्दी.
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.