आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात रोहित पवारांचं नाईट आऊट

वरळीत स्वतः फोटो काढत रोहित पवारांनी मुंबईतील नाईट आऊटचा अनुभव शेअर केला आहे. (Rohit Pawar Night Out at Worli)

आदित्य ठाकरेंच्या मतदारसंघात रोहित पवारांचं नाईट आऊट
Follow us
| Updated on: Jan 05, 2021 | 11:57 AM

मुंबई : राष्ट्रवादीचे युवा आमदार रोहित पवार यांनी काल मुंबईतील वरळीत नाईट आऊट केलं. स्थानिक कोळी, मच्छिमार बांधव, बॅंडवाले यांच्याशी रोहित पवारांनी संवाद साधला. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात रात्रीच्या वेळेस मारलेला फेरफटका रोहित पवारांनी सोशल मीडियावर शब्दबद्ध केला आहे. (NCP MLA Rohit Pawar Night Out at Aditya Thackeray Worli Constituency)

रोहित पवार यांनी रविवारी रात्री बारा वाजताच्या सुमारास वरळी किल्ल्याला भेट दिली. यावेळी स्थानिक कार्यकर्त्यांच्या कुटुंबीयांची त्यांनी विचारपूस केली. वरळीत स्वतः फोटो काढत रोहित पवारांनी मुंबईतील नाईट आऊटचा अनुभव शेअर केला आहे.

रोहित पवार यांची फेसबुक पोस्ट

देशाची आर्थिक राजधानी, मायानगरी, कोणालाही उपाशी झोपू न देणारं शहर… अशी कितीतरी विशेषणं मुंबईला दिली जातात. किंबहुना ही वस्तुस्थिती आहे. अशा मुंबईचं आकर्षण कुणाला नाही? माझं तर कॉलेजचं शिक्षणही याच मुंबईत झालंय आणि मुंबई आपली राजधानीही आहे. त्यामुळे मुंबईविषयी कुणी काही तारे तोडत असलं तरी महाराष्ट्रावर प्रेम करणाऱ्या आपल्या सर्वांनाच मुंबईचं आकर्षण आहे मुंबईवर प्रेमही आहे.

मुंबई आपली आहे, हीच भावना मनाला नेहमी सुखावत असते. काल असंच मुंबईतील दिवसभराची कामं उरकल्यानंतर संध्याकाळी ‘वरळी सी लिंक’ परिसरात मित्रासोबत फेरफटका मारण्यासाठी गेलो होतो. गप्पा मारत झगमगत्या मुंबईला मोबाईल कॅमेऱ्यात टिपत होतो, मुंबईचं सौंदर्य डोळ्यांत साठवत होतो. त्याच वेळी मला ओळखणाऱ्या एक व्यक्तीने ‘आमच्या कोळीवाड्यालाही भेट द्या’, अशी विनंती केली आणि मीही लगेच होकार दिला.

त्यांना दिलेला शब्द पाळायचा असल्याने मग लगेचच कोळीवाड्याला भेट देण्याचा निर्णय घेतला आणि लगेच तिकडं पोचलो. वास्तविक मास्क असल्याने कुणी ओळखत नव्हतं, त्यामुळे सुरुवातीला बिनधास्त होतो, पण नंतर काही चतुर तरुणांनी ओळखलंच. मग त्यांच्यासोबत फोटो काढत, गप्पा मारत इतरही अनेक जण भेटले. तिथं जवळच एक लग्न समारंभ सुरु होता. तिथलेही काहीजण भेटले असता त्यांच्याशी गप्पा मारल्या.

पुढं ‘श्री. सरस्वती ब्रॉस बँड’ पथकाचा सराव सुरु होता. मंत्रमुग्ध करणाऱ्या त्यांच्या कलेला दाद देत त्यांच्याशीही बराच वेळ चर्चा केली, सोबत फोटो काढले. कोळी बांधव होड्या उभ्या करतात त्या ठिकाणीही भेट देऊन तिथल्या तरुणांसोबत संवाद साधला. अनेक विषयांवर आम्ही चर्चा केली.

इथंच माझ्या मतदारसंघातील राशीन, जामखेड या भागातील काही मंडळीही भेटली. त्यांना भेटून तर खूप आनंद झाला. वरळीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे वॉर्ड अध्यक्ष बाळू साठे यांचीही तिथं भेट झाली. त्यांनी आग्रहाने जवळच असलेल्या त्यांच्या घरी नेलं. घरी चहा घेत त्यांच्या कुटुंबियांसोबत गप्पा मारल्या. माझ्या परिचयाचे अमीर जगताप यांच्याही घरी भेट दिली. ‘वरळी फोर्ट’लाही भेट दिली. (NCP MLA Rohit Pawar Night Out at Aditya Thackeray Worli Constituency)

एकूणच वरळी सी लिंक आणि कोळीवाडा भागातील माणसांना भेटून खूप छान वाटलं. पर्यावरण मंत्री आदित्य जी ठाकरे यांचा हा मतदारसंघ. त्यांच्यावर मनापासून प्रेम करणारे लोक इथं आहेत. या लोकांचे असलेले प्रश्न सोडवण्याचा आदित्यजी प्रयत्न करतच आहेत, त्यामुळे पुढच्या काळात अनेक प्रश्न मार्गी लागतील, असा विश्वास आहे.

संबंधित बातम्या :

अजित पवारांची कार्यपद्धत फॉलो, रोहित पवार पहाटे चार वाजता APMC मार्केटमध्ये

(NCP MLA Rohit Pawar Night Out at Aditya Thackeray Worli Constituency)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.