‘अजित पवार यांच्यासाठी माझ्या हृदयात…’, अमोल कोल्हे यांचं मोठं वक्तव्य, नेमकी भूमिका काय?

खासदार अमोल कोल्हे यांनी आज 'टीव्ही 9 मराठी'ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सध्या सुरु असलेल्या घडामोडींवर आपलं रोखठोक मत मांडलं. यावेळी त्यांनी अजित पवार यांच्याबद्दलची आपली भूमिका स्पष्ट केली.

'अजित पवार यांच्यासाठी माझ्या हृदयात...', अमोल कोल्हे यांचं मोठं वक्तव्य, नेमकी भूमिका काय?
Follow us
| Updated on: Jul 03, 2023 | 8:32 PM

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी आज सकाळी ट्विट करत सध्याच्या राजकीय घडामोडींवर आपली भूमिका स्पष्ट केली. कोल्हे काल उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या शपथविधीला हजर होते. पण त्यांनी कोणतीही प्रतिक्रिया देण्यास नकार दिला होता. त्यानंतर आज त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यासोबत असल्याचं म्हटलं. तर दुसरीकडे त्यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया देताना अजित पवार यांच्याबाबत महत्त्वाचं वक्तव्य केलं. अजित पवार यांच्या शपथविधीच्या कार्यक्रमाला आपण का आणि कसे पोहोचलो? याबाबतही अमोल कोल्हे यांनी खुलासा केला आहे.

“अजित पवार यांच्याशी काल एका विषयावर भेट झाली आणि तिथून मी शपथविधी सोहळ्याला गेलो. त्यावेळी मला अजिबात कळले नाही की, आजच शपथविधी होणार आहे. मी तिथे लगेच पोहोचलो. अनेक प्रश्न निर्माण होऊ लागले, सर्वप्रथम माझा प्रश्न होता की, ही लोकशाही कोणत्या दिशेने चालली आहे? कोणाशीही वैयक्तिक वैर नाही, पण धोरणाच्या विरोधात उभे राहून बोलणे गरजेचे आहे”, असं खासदार अमोल कोल्हे म्हणाले.

‘खूप विचार करून ठरवलं की…’

अमोल कोल्हे यांनी आपल्या मनाची घालमेल कशी झाली, याविषयी माहिती दिली. “माझ्याकडे काय झाले? याचे उत्तर नव्हते. मी स्वतःला विचारले की, मला सामील व्हायचं आहे का? तेव्हा माझी विवेकबुद्धीने परवानगी दिली नाही. खूप विचार करून ठरवलं की, त्या राजकारणाचा भाग व्हायचा नाही. मी खासदारकीचा राजीनामाही देऊ शकतो, कारण हे राजकारण चांगलं नाही”, असं कोल्हे म्हणाले.

हे सुद्धा वाचा

‘मी माझ्या मतदारसंघात गेलो आणि…’

“शरद पवार यांच्याशी माझं बोलणं झालं आहे. ते म्हणाले, उद्या मी मुंबईत येत आहे. त्यानंतर तुम्ही तुमचा निर्णय घेऊ शकता”, असं अमोल कोल्हे यांनी यावेळी सांगितलं. “लाखो नागरिकांनी मला मतदान केले होते. मी माझ्या मतदारसंघात गेलो आणि त्यातील एकाने मला विचारले की भाऊ तुम्ही असे का केले? तर मला वाटते जबाबदारी माझ्यावर आहे आणि मी म्हणतो भाऊ, मी त्याच विचारधारेचा आहे, ज्याने तुम्ही मला मत दिले”, असं अमोल कोल्हे म्हणाले.

‘अजित पवार असं काही करतील याची कल्पना नव्हती’

“अजित पवार असे काही करू शकतील याची मला कल्पना नव्हती. अजित पवार यांच्यासोबत मी खूप जवळून काम केले आहे. अजित पवार यांच्यासाठी माझ्या मनात जी जागा आहे ती कायम राहील. अजित पवार यांच्यासाठी माझ्या हृदयात जागा आहे, पण मी त्यांच्या निर्णयासोबत नाही”, असं अमोल कोल्हे यांनी स्पष्ट केलं.

‘लोकशाहीच्या पायावरच प्रश्नचिन्ह’

“मी खूप छोटा कार्यकर्ता आहे, पक्षाच्या चिन्ह आणि नावाबाबतच्या दाव्यावर आमच्या मोठ्या नेत्यांनी सांगितले तर मला आवडेल. या प्रकारामुळे लोकशाहीच्या पायावरच प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे”, असं अमोल कोल्हे म्हणाले. “जो मार्ग निवडायला नको तो मार्ग निवडल्यावर आपण काय करणार? सुनील तटकरे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांना शुभेच्छा देण्याशिवाय आम्ही काय करू शकतो?”, असं अमोल कोल्हे म्हणाले.

‘आमदारांना वेळ द्यायला हवा’

“कोणता आमदार कोणासोबत आहे, हे येत्या काही दिवसांत स्पष्ट होणार आहे. मी माझ्या मतदारसंघातील अनेक आमदारांशीही बोललो आहे. ते म्हणतात की, मला याबद्दल माहिती नव्हती. त्यांना विचार करण्यासाठी थोडा वेळ द्यायला हवा”, असं मत अमोल कोल्हे यांनी मांडलं.

“खासदार प्रफुल्ल पटेल आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यातील वैयक्तिक संबंध सर्वांनाच माहीत आहेत. माझ्यासारखा छोटा कार्यकर्ता कोणाच्या 30-35 वर्षांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकत नाही”, अशी प्रतिक्रिया अमोल कोल्हे यांनी दिली.

Non Stop LIVE Update
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान
'...तर आव्हाडांनी दादांच्या म्हशीच्या गोठ्यावर काम कराव', कोणाच आव्हान.
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?
बच्चू कडूंना महायुती अन मविआकडून फोन, तिसऱ्या आघाडीचा पाठिंबा कोणाला?.
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले..
जयंत पाटलांच्या हाती मविआ नेत्यांच्या गाडीचं स्टेअरिंग; राऊत म्हणाले...
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप
'मध्यरात्री EVM ठेवलेल्या स्ट्रॉग रुममध्ये भाजपच्या...', पवारांचा आरोप.
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?
'... तर प्रणिती शिंदे यांचे घर फोडू', कोणी भरला काँग्रेसला सज्जड दम?.
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा
'एक्झिट पोलची ऐशी की तैशी, आम्ही 26 ला सरकार बनवतोय'; राऊतांचा दावा.
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?
'नागपूरहून मी आणि फडणवीस सोबतच मुंबईला...', नाना पटोले असं का म्हणाले?.
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान
शिंदे हेच मुख्यमंत्री, शिंदेंच्या शिवसेनेचं ठरलं? बड्या नेत्याचं विधान.
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?
राज्यात कोणाचं पारडं जडं? सरकार कोणाचं येणार? काय सांगतोय एक्झिट पोल?.
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या
पवारांसोबत शिंदे गेले तर..., शिरसाटांच्या वक्तव्यानं भुवया उंचावल्या.