“धर्मवीर म्हणण्याला समकालीन इतिहासात पुरावे नाहीत”;राष्ट्रवादीच्या खासदाराने संभाजीराजांचं मोठेपण सांगितलं

अभिनेता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी इतिहासातील दाखले आणि संदर्भ देत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याचे त्यांनी समर्थन केले आहे.

धर्मवीर म्हणण्याला समकालीन इतिहासात पुरावे नाहीत;राष्ट्रवादीच्या खासदाराने संभाजीराजांचं मोठेपण सांगितलं
Follow us
| Updated on: Jan 02, 2023 | 10:52 PM

मुंबईः विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी छत्रपती संभाजी महाराज हे धर्मवीर नव्हते तर ते स्वराज्यरक्षक असल्याचे मत व्यक्त केले होते. त्यांच्या त्या वक्तव्यावरून राज्यातील वातावरण ढवळून निघाले आहे. भाजपसह शिंदे गटातील नेत्यांनी अजित पवार यांच्यासह राष्ट्रवादी पक्षावर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

त्यातच आता आता अभिनेता आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार अमोल कोल्हे यांनी इतिहासातील दाखले आणि संदर्भ देत विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वक्तव्याचे त्यांनी समर्थन केले आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी संभाजीराजे धर्मवीर नव्हते तर स्वराज्यरक्षक होते असं वक्तव्य केल्यानंतर अजित पवार यांच्या विरोधात आणि समर्थनात दोन्हीकडून वाद प्रतिवाद होत आहेत.

त्यामुळे राष्ट्रवादीचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांनी इतिहासातील संदर्भ देत संभाजी महाराज हे धर्मवीर होते असा कोणताही पुरावा समकालीन इतिहासात उपलब्ध नाही. मात्र छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते हे त्या त्या काळातील इतिहासावरून स्पष्ट होते अशी माहिती खासदार अमोल कोल्हे यांनी दिली.

खासदार अमोल कोल्हे यांनी संभाजी महाराज यांच्या काळातील इतिहास सांगताना समकालीन इतिहासाचा संदर्भ दिला आहे. ते म्हणाले की, छत्रपती संभाजी महाराज हे स्वराज्य रक्षकच होते आणि हीच बिरुदावली व्यापक असल्याचे त्यांनी् म्हटले आहे.

कारण त्या काळातील इतिहासामध्ये, बखरीमध्ये संभाजी महाराज यांचा इतिहास लिहिताना इतिहासकारानी देव, देश आणि धर्म हे स्वराज्य होते, आणि त्यातच संभाजी महाराज यांनी आपले शौर्यही गाजवले आहे त्यामुळेच संभाजीराजे हे धर्मवीर नव्हे तर ते स्वराज्यरक्षकच होते असाही त्यांनी दावा केला आहे.

त्या बरोबरच संभाजी महाराज यांचा त्या काळात लिहिलेल्या गेलेल्या इतिहासावर धर्मवीर नव्हे तर स्वराज्यरक्षक असचं चित्र त्यावेळीही रेखाटले असल्याचे मत खासदार अमोल कोल्हे यांनी म्हटले आहे.

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.