आता राष्ट्रवादीचाही लॉकडाऊनला विरोध; मुख्यमंत्र्यांना म्हणाले…
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून त्यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात येत आहे. (NCP says lockdown not a solution to rising COVID-19 cases)

मुंबई: राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असून त्यासाठी राज्यातील विविध शहरांमध्ये लॉकडाऊन करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने राज्यात लॉकडाऊन करण्यास विरोध केला आहे. थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडेच राष्ट्रवादीने लॉकडाऊनला विरोध दर्शविला आहे. प्रमुख विरोधी पक्ष असलेल्या भाजपपाठोपाठ सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीने थेट लॉकडाऊनला विरोध केल्याने मुख्यमंत्र्यांची चांगलीच कोंडी होण्याची शक्यता आहे. (NCP says lockdown not a solution to rising COVID-19 cases)
राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी लॉकडाऊन बाबतची राष्ट्रवादीची भूमिका स्पष्ट केली. राज्यात कोरोनाची संख्या झपाट्याने वाढत असल्याने लॉकडाऊनचा विचार आला आहे. पण लॉकडाऊन हा अंतिम पर्याय होऊ शकत नाही. तसा आग्रहच आम्ही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना करण्यात आला आहे, असे नवाब मलिक यांनी सांगितलं.
आरोग्य सुविधा वाढवा
लॉकडाऊन हा राज्याला परवडणारा नाही. जनतेलाही परवडणारा नाही. त्यामुळे पर्याय होऊ शकत नाही. त्याऐवजी आरोग्य सुविधा वाढवण्यावर भर देण्यात यावा अशी आमची भूमिका आहे. मुख्यमंत्र्यांनीही प्रशासनाला आरोग्य सेवा अधिक सक्षम करण्याच्या सूचना केल्या आहेत. लोकांनी अजून काळजी घेतली पाहिजे. नियम पाळल्यास कोरोना वाढणार नाही, असंही त्यांनी सांगितलं.
पवार-शहा भेट नाहीच
अहमदाबादमध्ये कुठेही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार, नेते प्रफुल्ल पटेल आणि भाजप नेते अमित शहा यांची भेट झाली नाही. ही अफवा आहे. शहा यांनी केलेलं वक्तव्य संभ्रम निर्माण करणारं आहे. राज्यातील नेतेही याबाबत बोलत आहेत. गेल्या सहा वर्षांपासून असंच सांगून संभ्रम निर्माण केला जात आहे, असं सांगतानाच आम्ही विरोधात असतानाही राष्ट्रवादी भाजपसोबत जाणार असल्याची आवई उठवण्यात आली होती. संभ्रम आणि संशयाचं वातावरण निर्माण करण्यात आलं होतं. पण आम्ही भाजपसोबत गेलो नाही, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.
तेव्हाही संभ्रम निर्माण केला होता
राज्यात सत्ता स्थापन करत असताना आम्ही काँग्रेस आणि शिवसेनेसोबत गेलो. पण आम्ही भाजपबरोबर गेलो नाही. आता आघाडीतील एक पक्ष असलेला राष्ट्रवादी त्यांच्याबरोबर जाईल असा संभ्रम निर्माण केला जात आहे. पण त्यात काहीच तथ्य नाही, असंही ते म्हणाले. (NCP says lockdown not a solution to rising COVID-19 cases)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/qJ3huyGgHi
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 29, 2021
संबंधित बातम्या:
पवारांचे खंदे समर्थक, कागलकरांच्या मनातला ‘हिंदकेसरी’; जाणून घ्या, कोण आहेत हसन मुश्रीफ?
पवारांकडून आधी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी संधी, आता वडिलांच्या जागी तिकीट, कोण आहेत भगीरथ भालके?
सर्वसामान्यांना नाईट लाईफ नको, नाईट लाईफ हवे असणारे तुमच्यासोबत : चंद्रकांत पाटील
(NCP says lockdown not a solution to rising COVID-19 cases)