देशमुखांबद्दलचे पवारांचे एक एक दावे, फडणवीसांनी पुराव्यानिशी खोडले, वाचा प्रेसमध्ये काय काय बोलले?

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत नेहमीच्या प्रथेला छेद दिला. | Devendra Fadnavis

देशमुखांबद्दलचे पवारांचे एक एक दावे, फडणवीसांनी पुराव्यानिशी खोडले, वाचा प्रेसमध्ये काय काय बोलले?
देवेंद्र फडणवीस शरद पवार
Follow us
| Updated on: Mar 23, 2021 | 2:48 PM

मुंबई: गृहमंत्री अनिल देशमुख यांचा बचाव करताना शरद पवार यांच्या तोंडून चुकीची माहिती वदवून घेण्यात आली, असे वक्तव्य देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केले. त्यांच्यासारख्या राष्ट्रीय नेत्याला योग्यप्रकारे माहिती देण्यात आली नाही. त्यामुळे दिल्लीतील शरद पवारांच्या (Sharad Pawar) पत्रकारपरिषदेत खोटेपणा उघडा पडला. राष्ट्रवादी काँग्रेसने या गोष्टीचा विचार केला पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. (Devendra Fadnavis take a dig at NCP)

ते मंगळवारी मुंबईतील पत्रकारपरिषदेत बोलत होते. काल पवारांना योग्य ब्रिफिंग करण्यात आले नाही. पवारांसारख्या राष्ट्रीय नेत्याच्या तोंडून चुकीची माहिती दिली गेली. देशमुखांना प्रोटेक्ट केलं गेलं. त्यामुळे ते एक्सपोज झाले होते. 15 तारखेला देशमुख आयसोलेट नव्हते. त्या दिवशी त्यांना अनेक लोक भेटले होते, असा दावा देवेंद्र फडणवीसांनी केला.

पोलिसांच्या दैनंदिन कार्यक्रमानुसार देशमुख मुंबईत

15 तारखेचा गृहमंत्र्यांची ही कार्यक्रम पत्रिका आहे. 15 तारखेला ते एका खासगी विमानाने आले होते. 15 तारखेला ते आपल्या घरी होते. पण पोलीस विभागाच्या दैनंदिन कामाचा माझ्याकडे एक कागद आहे. त्यात 17 फेब्रुवारीची एक तारीख आहे. त्यात राज्यपाल भगतसिंग कोश्यारी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे मुंबईतला राहतील. तर अनिल देशमुख हे दुपारी 3 वाजता सह्याद्रीला येतील. त्यानंतर 24 तारखेला पुन्हा अनिल देशमुख हे 11 वाजता मोटारीने निवासस्थानी जाणार असल्याचं पोलिसांची माहिती आहे. अर्थात त्या कार्यक्रमानुसार ते गेले असतीलच असा माझा दावा नाही, असं फडणवीस म्हणाले.

मला शरद पवारांसारखं इंग्रजी येत नाही: फडणवीस

देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी मुंबईत घेतलेल्या पत्रकारपरिषदेत नेहमीच्या प्रथेला छेद दिला. त्यांनी या पत्रकारपरिषदेची सुरुवात हिंदीत केली. शरद पवारांनी हा विषय राष्ट्रीय केला असल्याने आज आपला प्रकार बदलून तमाम मराठी पत्रकारांची आणि माय मराठीची क्षमा मागून मी आजची पत्रकार परिषद हिंदीत सुरु करणार आहे, असे देवेंद्र फडणवीसांनी सांगितले. तेव्हा प्रसारमाध्यमांनी त्यांना इंग्रजी बोला, असे सांगितले. त्यावर फडणवीस यांनी, मला शरद पवार यांच्याइतकं चांगलं इंग्रजी येत नाही, असे सांगितले. तेव्हा उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला. संबंधित बातम्या : 

ठाकरे सरकारवर देवेंद्र फडणवीसांचा डेटाबॉम्ब; पोलीस दलातील बदल्यांच्या रॅकेटचा पर्दाफाश

अनिल देशमुख 15 फेब्रुवारी रोजी काय करत होते?; फडणवीसांनी केला मोठा गौप्यस्फोट

एटीएसला आणखी एक कार दमनमध्ये सापडली; वाझेंचे ‘कार’नामे उघड होणार?

(Devendra Fadnavis take a dig at NCP)

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.