निवडणूक आयोगावर आरोपांचा बॉम्ब, संजय राऊत यांनी असा घेतला समाचार

Sanjay Raut | संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर पुन्हा निशाणा साधला. गुरुवारी निवडणूक आयोगात राष्ट्रवादी नेमकी कुणाची याविषयीची सुनावणी झाली. त्यात मृत व्यक्ती आणि इतर पक्षामधील नेते, सदस्य म्हणून अजित पवार गटाने शपथपत्र दाखल केल्याचा आरोप शरद पवार गटाने केला होता. त्यावर राऊत यांनी आयोगावर आरोपांचा बॉम्ब टाकला.

निवडणूक आयोगावर आरोपांचा बॉम्ब, संजय राऊत यांनी असा घेतला समाचार
Follow us
| Updated on: Nov 10, 2023 | 11:22 AM

मुंबई | 10 नोव्हेंबर 2023 : राष्ट्रवादीतील बोगस शपथपत्रप्रकरणात खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगावर आरोपांची राळ उडवून दिली. राऊत यांनी पुन्हा आयोगावर निशाणा साधला. गुरुवारी राष्ट्रवादी कुणाची या मुद्दावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी झाली. या सुनावणीदरम्यान शरद पवार गटाने अजित पवार गटावर आरोप केले. मृत व्यक्ती आणि इतर पक्षातील नेते, अजित पवार गटाने सदस्य म्हणून दाखविल्याचा आरोप करण्यात आला. त्यावर राऊत यांनी निवडणूक आयोगावर आरोपांचा बॉम्ब टाकला. त्यांनी आयोगांवर आरोपांची राळ उठवली.

काय म्हणाले राऊत

शिवसेना कुणाची आणि राष्ट्रवादी कुणाची अशा निवडणूक आयोगासमोर दोन महत्त्वाच्या सुनावण्या सुरू आहेत. हे दोन्ही पक्ष महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणातील अत्यंत महत्त्वाचे पक्ष आहेत. सुनावणीच्या वेळेला शरद पवार हे समोर बसलेले आहेत तरीही इलेक्शन कमिशनला राष्ट्रवादी कोणाची असा प्रश्न पडत असल्याचा चिमटा त्यांनी काढला.

हे सुद्धा वाचा

शिवसेनेबाबत पण हाच प्रयोग

बोगस प्रतिज्ञा पत्रांचा प्रयोग शिवसेनेच्या प्रकरणात पण केल्याचा उल्लेख त्यांनी केला. ज्यांनी बेईमानी केली होती त्यांनी फक्त आमदार पळवले, पक्ष नाही. पक्षावर ताबा मिळवण्यासाठी त्यावेळी त्यांनी बोगस प्रमाणपत्र दिलेले होते, त्यावेळी निवडणूक आयोगाने त्याची दखल घेतली नाही आणि आणि एकतर्फी निर्णय घेतला असा आरोप त्यांनी केला. आज राष्ट्रवादीच्या बाबतीत हाच प्रश्न उपस्थित होत असल्याकडे त्यांनी लक्ष वेधले.

निवडणूक आयोग तर …

पूर्वीच्या काळी अशा टोळ्या होत्या इतिहासात जे कबील्यांचा ताब्या घ्यायच्या आणि लुटमार करायच्या. सध्या राजकारणात भाजपने टोळ्यात निर्माण केल्या आहेत आणि पक्षांचा ताबा घेतला जात आहे. त्यांना घटनात्मक संरक्षण दिलं जातंय, असा आरोप राऊत यांनी केला. इलेक्शन कमिशन ने काहीही निर्णय घेऊ द्या शिवसेना बाळासाहेब यांची होती आणि पुढे देखील राहील. देशाचा दुर्दैव आहे की इलेक्शन कमिशन ला कळत नाही की या पक्षाची मालकी नेतृत्व कोणाला कोणाकडे आहे पाकिस्तानला माहित आहे की शिवसेना ठाकरेंची आहे पण इलेक्शन कमिशनला माहित नाही. निवडणूक आयोग ही घटनात्मक संस्था आहे. पण सध्या पिंजऱ्यातला प*** झालेला आहे आणि त्याची पीस देखील जळून गेलेली आहेत

तर लगेच अवमान याचिका

कुणीतरी प्रायोजित केलेली व्यक्ती तुमच्या विरोधात न्यायालयात खटला दाखल करत आहे, सर्वोच्च न्यायालयाची अवस्था देखील तारीख पे तारीख अशी होऊ नये यासाठी चंद्रचूड यांनी स्पष्ट केले आहे. हे देशातील न्यायव्यवस्थेचा दुर्दैव आहे की सामान्य माणसाला तारखांवर तारखा देऊन देखील न्याय मिळत नाही, हे उद्धव ठाकरे यांनी मत व्यक्त केलं आहे. त्यांनी कोणावर व्यक्तिगत टीका केली नाही. कोणाची तरी पिल्लावळ असते ती आमच्या विरोधात याचिका दाखल करते, असे ते म्हणाले.

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.