राज्यात नव्या कोरोनाचा एकही रुग्ण नाही; पण, काळजी घ्या: राजेश टोपे
राज्यात नव्या कोरोनाचा संसर्ग झालेला एकही रुग्ण सापडलेला नाही. पण गाफिल राहून चालणार नाही. सरकार सर्व खबरदारी घेत आहे. तुम्हीही काळजी घ्या, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं. (New Covid-19 mutant strain: No need for citizens to panic, says Rajesh Tope)
मुंबई: राज्यात नव्या कोरोनाचा संसर्ग झालेला एकही रुग्ण सापडलेला नाही. पण गाफिल राहून चालणार नाही. सरकार सर्व खबरदारी घेत आहे. तुम्हीही काळजी घ्या, असं आवाहन राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं. तसेच राज्यात लॉकडाऊन लावण्याचा सरकारचा कोणताही विचार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं. (New Covid-19 mutant strain: No need for citizens to panic, says Rajesh Tope)
देशात नव्या कोरोनाचा संसर्ग झालेले काही रुग्ण सापडले आहेत. पण महाराष्ट्रात अजूनतरी नव्या कोरोनाचा संसर्ग झालेला रुग्ण सापडलेला नाही. महाराष्ट्रात कोणीही इन्फिल्टेड झालेलं आढळलेलं नाही. पण आम्ही पूर्ण खबरदारी घेत आहोत, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
ब्रिटनमधून आलेल्या प्रत्येक प्रवशांचा स्वॅब घेऊन त्यांना क्वॉरंटाईन केलं जात आहे. आतापर्यंत 43 जणांचे सँपल घेण्यात आले आहेत, असं सांगतानाच नव्या कोरोनाच्या संसर्गावरून महाराष्ट्र सरकार अॅलर्ट झालं आहे. सरकार अत्यंत गंभीरपणे या प्रकरणात लक्ष घालत आहे. कोणताही निष्काळजीपणा केला जात नाही, असंही त्यांनी सांगितलं.
प्रवासी सापडत नाहीत
ब्रिटनमधून आलेले काही प्रवासी सापडत नाहीत. हा गंभीर विषय आहे. पोलिसांना या प्रवाशांना शोधण्याच्या सूचना देण्यात आल्या असून या प्रवाशांचा शोध सुरू आहे. या प्रवाशांनीही स्वत:हून आरोग्य यंत्रणेसमोर येऊन तपासणी करून घ्यावी, असं आवाहनही टोपे यांनी केलं आहे.
लॉकडाऊन नाही
राज्यातील कोरोनाची परिस्थिती नियंत्रणात आहे. लोक मास्क लावत असून सोशल डिस्टन्सिंगचे नियमही पाळत आहेत. त्यामुळे राज्यात पुन्हा लॉकडाऊन करण्याचा विचार नाही. मात्र, नागरिकांनी गाफिल राहू नये. गर्दी करू नये आणि गर्दीच्या ठिकाणी जाऊ नये. सरकारने दिलेल्या नियमांचं काटेकोर पालन करावं, असंही ते म्हणाले.
लोकल सुरू करण्याचा निर्णय मुख्यमंत्रीच घेतील
नव्या वर्षाच्या पहिल्या आठवड्यात मुंबईत लोकल सेवा सुरू होणार का? असा सवाल टोपे यांना विचारण्यात आला. त्यावर लोकल सेवा पुढच्या वर्षी सुरू करायच्या की नाही, याचा आढावा घेतला जाईल. नवीन वर्षात रुग्णांची संख्या काय राहते हे पाहू, त्यानंतरच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याबाबतचा अंतिम निर्णय घेतील, असंही ते म्हणाले. (New Covid-19 mutant strain: No need for citizens to panic, says Rajesh Tope)
VIDEO | SuperFast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 30 December 2020 https://t.co/xSWOe9xDc6 @CMOMaharashtra #superfastnews #TopNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) December 30, 2020
संबंधित बातम्या:
कोरोनाच्या नव्या अवताराची डोकेदुखी, यूकेत पहिल्यांदाच एका दिवसात 40 हजार रुग्ण
कोरोनाची लस घेतल्यावर तब्येत बिघडली तर, जबाबदारी सरकार घेणार की कंपनी?
कोरोनाच्या नव्या घातक अवताराची भारतात एन्ट्री, 6 जण नव्या विषाणूमुळे बाधित
(New Covid-19 mutant strain: No need for citizens to panic, says Rajesh Tope)