शिंदे गटावर खोक्यांवरून नवा गंभीर आरोप, शिंदे गटाच्या आमदारांना आणखी पाच खोके

चंद्रकांत खैरे आणि संजय राऊत यांना बडबड करण्याशिवाय दुसरा उद्योग नाही.

शिंदे गटावर खोक्यांवरून नवा गंभीर आरोप, शिंदे गटाच्या आमदारांना आणखी पाच खोके
चंद्रकांत खैरे
Follow us
| Updated on: Dec 01, 2022 | 9:05 PM

मुंबई – 50 खोक्यांच्या मुद्द्यावरून कायमचं विरोधक टीका करतात. पण, आता ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी नवा आरोप केलाय. गुवाहाटी दौऱ्यात आमदारांना पाच-पाच कोटी देण्यात आले. असा आरोप चंद्रकांत खैरे यांनी केलाय. २६ नोव्हेंबरला शिंदे गटाचे आमदार पुन्हा गुवाहाटीला गेले. कामाख्या देवीचं दर्शन घेतलं. यावर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी स्फोटक आरोप केलाय. शिंदे गटाचे आमदार इकडे तिकडे भरकटू नये म्हणून आणखी पाच-पाच कोटी आमदारांना देण्यात आल्याचा आरोप खैरे यांना केलाय.

खात्रीलायक माहिती मला एका उद्योगपतीनं हे सांगितलं. सरकार जपण्यासाठी हे गद्दार करत आहेत. आमदारांच्या खुशामती केल्या जातात. हे चुकीचं असल्याचं चंद्रकांत खैरे म्हणाले.

चंद्रकांत खैरे आणि संजय राऊत यांना बडबड करण्याशिवाय दुसरा उद्योग नाही. यांना खोके घेतले नि हे झालं याशिवाय दुसरं काही बोलता येत नाही. उद्धव ठाकरे यांचं नियंत्रण यांच्यावर राहिलेलं नाही. पक्ष संपत चाललाय. यांचे बारा वाजले आहेत. त्यामुळं त्यांच्याकडं लक्ष द्यायची गरज वाटत नसल्याचं शिंदे गटाचं म्हणणंय.

अब्दुल सत्तार म्हणाले, ज्यांचं डोकं खराब आहे, त्यांच्यासाठी आमच्याकडं आज शिबिर होता. मुंबईतील शिबिरात आधी चंद्रकांत खैरे यांचं डोकं तपासावं लागेल. जुने ठेवलेले खोके मोजले नसतील, तर आमचे मोजायला पाठवून द्या.

संजय गायकवाड यांनीही चंद्रकांत खैरे यांचा समाचार घेतला. हे म्हातारं सटकलं आता. उगाच काहीतरी बडबड करू नये. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री करताना त्यांनी किती खोके दिले, हे त्यांना जाऊन विचारावं, असा खोचक टोलाही त्यांनी लगावला.

'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?
PM Modi VIDEO : 'सुरतच जेवण आणि काशीच मरण...', मोदी नेमकं काय म्हणाले?.
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?
Indian Navy : INS निलगिरी, वाघशीर अन् सूरत जहाजाची वैशिष्ट्ये काय?.