AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

रिलेशनशिपसाठी रेणू शर्माचा माझ्यावरही दबाव, कॉल, मेसेज करायची, आता माजी आमदाराचा आरोप

कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. | Krishna Hegde

रिलेशनशिपसाठी रेणू शर्माचा माझ्यावरही दबाव, कॉल, मेसेज करायची, आता माजी आमदाराचा आरोप
Follow us
| Updated on: Jan 14, 2021 | 4:04 PM

मुंबई: राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर करण्यात आलेल्या बलात्कार आरोपाच्या प्रकरणाला आता वेगळे वळण लागण्याची शक्यता आहे. कारण आता भाजपचे नेते कृष्णा हेगडे (Krishna Hegde) यांनी रेणू शर्मा (Renu Sharma) यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यांनी मुंबई पोलिसांना यासंदर्भात सविस्तर पत्र लिहून माहिती दिली आहे. (Congress former MLA Krishna Hegde allegations against Renu Sharma)

या पत्रात कृष्णा हेगडे यांनी रेणू शर्मा यांनी मलाही रिलेशनशिपच्या जाळ्यात ओढण्याचा प्रयत्न केल्याचा खळबळजनक आरोप केला आहे. 2010 पासून रेणू शर्मा मला सतत कॉल आणि मेसेज करत होती. त्या सातत्याने मला रिलेशनशिपसाठी गळ घालत होत्या.

मी नकार देऊनही रेणू शर्मा यांनी 2015 पर्यंत मला त्रास देणे सुरुच ठेवले. त्यांनी माझ्यावर पाळतही ठेवली होती. रेणू शर्मा या मला हनी ट्रॅपमध्ये अडकवण्याच्या प्रयत्नात होत्या. मात्र, मी त्यांना भेटणे टाळले. मात्र, मी बाहेरून केलेल्या चौकशीत रेणू शर्मा यांनी अशाप्रकारे इतर व्यक्तींना फसवल्याची माहिती मला समजली. मुंबई पोलिसांनी याप्रकरणाची चौकशी करावी, असे कृष्णा हेगडे यांनी पत्रात म्हटले आहे. विशेष म्हणजे कृष्णा हेगडे यांनी या पत्रामध्ये रेणू शर्मा ज्या फोन नंबरवरुन संपर्क साधायच्या ते क्रमांकही दिले आहेत. आता कृष्णा हेगडे थोड्यावेळात अंबोली पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल करणार आहेत.

‘धनंजय मुंडेवरील आरोप ऐकून धक्का बसला’

“मी तिला स्पष्टपणे सांगितलं होतं, की मी तुला भेटण्यात अजिबात रस नाही, मग तिच्या मागणीनुसार रिलेशनशीप ठेवण्याचा प्रश्नच येत नाही. अगदी 6 आणि 7 जानेवारी 2021 रोजीही तिने मला व्हॉट्सअॅप केले. मी थंबचा इमोजी पाठवण्याशिवाय काहीच रिप्लाय दिला नाही” अशी माहिती कृष्णा हेगडे यांनी पत्रात दिली.

“दोन दिवसांपूर्वी मंत्री धनंजय मुंडे यांच्याविरोधात मीडियामध्ये केलेले आरोप वाचून मी थक्क झालो. त्याच वेळी मी रेणू शर्माबद्दल तुम्हाला सांगण्याचा निर्णय घेतला” असंही कृष्णा हेगडेंनी सांगितलं.

“आज त्यांनी धनंजय मुंडेंना टार्गेट केले आहे, काही वर्षांपूर्वी त्या जागी मी असू शकलो असतो, उद्या दुसरं कोणी असेल. ही आमिषाने भुलवणे, हनी ट्रॅप, ब्लॅकमेल आणि खंडणी वसुलीची कार्यपद्धत आहे. मी मुंबई पोलिसांना विनंती करतो, त्यांनी एफआयआर दाखल करुन तार्किक निष्कर्ष काढावा” अशी विनंती कृष्णा हेगडेंनी केली आहे.

संबंधित बातम्या:

हसत हसत कडक इशारा, शरद पवार धनंजय मुंडेंवर कारवाई करणारच?

धनंजय मुंडेंवरील आरोपाचं स्वरुप गंभीर, पक्ष म्हणून विचारा करावा लागेल: शरद पवार

(Congress former MLA Krishna Hegde allegations against Renu Sharma)

पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला
पाकिस्तानला सळो की पळो करून सोडलं! भारतानंतर बलुच आर्मीचा पाकवर हल्ला.
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही
चोराच्या उलटा बोंबा, पाकचा माज उतरेना, म्हणताय एकही अतिरेकी अड्डा नाही.
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला
पाकिस्तानचा अटारी सीमेवर हल्ल्याचा प्रयत्न फसला.
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा...
पाकने जगातील देशांपुढे पसरले हात केली एकच विनंती, भारताला सांगा....
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे
भारताच्या हल्ल्याने पाकिस्तानच्या राजकीय व्यवस्थेला हादरे.
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला
S-400 भारताने घातले पाकिस्तानचे दात पुन्हा घशात, पाकड्यांचा डाव उधळला.
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर
सीमावर्ती भागात घरांचं नुकसान; भारताकडून पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर.
भारतानं या 9 ठिकाणचे पाकचे हल्ले उधळले अन् 7 मिसाईलचा चुराडा बघा VIDEO
भारतानं या 9 ठिकाणचे पाकचे हल्ले उधळले अन् 7 मिसाईलचा चुराडा बघा VIDEO.
भारतावर हल्ल्याची खुमखुमी पाकिस्तानला भोवली, रात्रभर काय घडलं?
भारतावर हल्ल्याची खुमखुमी पाकिस्तानला भोवली, रात्रभर काय घडलं?.
भारतावर हल्ल्याची खुमखुमी अन् पाकची जिरवली..चायना मेड विमानांचा चुराडा
भारतावर हल्ल्याची खुमखुमी अन् पाकची जिरवली..चायना मेड विमानांचा चुराडा.