NIA Raids : एनआयएची मोठी छापेमारी, अब्दुल वाहिद याच्या घरी झाडाझडती; पीएफआयला हादरा

एनआयएने आज देशभरात मोठी छापेमारी केली आहे. महाराष्ट्रासह सहा राज्यात ही छापेमारी करण्यात आली आहे. पीएफआय या संघटनेशी संबंधित ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. अब्दुल वाहिद शेख यांच्या घरातही एनआयएची झाडाझडती सुरू आहे.

NIA Raids : एनआयएची मोठी छापेमारी, अब्दुल वाहिद याच्या घरी झाडाझडती; पीएफआयला हादरा
nia agencyImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Oct 11, 2023 | 12:26 PM

मुंबई | 11 ऑक्टोबर 2023 : एनआयएने उत्तर प्रदेश, दिल्ली, राजस्थानसह महाराष्ट्रात मोठी छापेमारी केली आहे. पीएफआय या संघटनेशी संबंधित ठिकाणांवर ही छापेमारी करण्यात आली आहे. एवढेच नव्हेतर अब्दुल वाहिद शेख यांच्या घरातही एनआयएची झाडाझडती सुरू आहे. त्यामुळे एकच खळबळउडाली आहे. अब्दुल वाहिद शेख याला ट्रेन ब्लास्ट प्रकरणात अटक करण्यात आली होती. मात्र त्याची सर्व प्रकरणातून निर्दोष मुक्तताही झाली होती. त्यानंतर आज एनआयएने एकाचवेळी छापेमारी करून पीएफआयला मोठा हादरा दिला आहे.

एनआयएने आज देशभरात पीएफआय या संघनेशी संबंधित ठिकाणांवर जोरदार छापेमारी केली आहे. विक्रोळी पार्क साईट येथील वाहिद शेख यांच्या घरी एनआयएचे पथक पहाटे 5 वाजताच पोहचले. मात्र वाहिद शेख हा दरवाजा उघडत नव्हता. जो पर्यंत योग्य नोटीस दाखवत नाही तो पर्यंत दरवाजा उघडनार नाही असा पवित्रा त्याने घेतला होता. त्यामुळे एनआयएचे पथक आणि पोलीस त्यांच्या घराबाहेर ठाण मांडून बसले होते. त्यानंतर एनआयएच्या पथकाने त्याच्या घरात झाडाझडती सुरू केल्याचं सांगितलं जात आहे.

निर्दोष मुक्तता

अब्दुल वाहित हा 2006मध्ये झालेल्या ट्रेन ब्लास्ट स्फोटातील आरोपी होता. त्याला अटकही करण्यात आली होती. त्याचा पीएफआय या संघटनेशी संबंध असल्याचं सांगितलं जात आहे. मात्र, ट्रायल कोर्टाने त्याची सर्व गुन्ह्यातून निर्दोष मुक्तता केली होती. त्यानंतर आज एनआयएने पहाटेच त्याच्या घरी छापेमारी केल्याने खळबळ उडाली आहे. त्याच्या विक्रोळी येथील घराच्या बाहेर मोठा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचं सूत्रांनी सांगितलं.

बंदी असलेली संघटना

एनआयएने आज देशभरातील सहा राज्यात छापेमारी केली आहे. राजस्थानच्या टोंक, कोटा आणि गंगापूर येथे आणि हौज काजी, बलिमारन येथेही छापेमारी करण्यात आली आहे. महाराष्ट्र, राजस्थान, मध्यप्रदेश, तामिळनाडू आणि दिल्लीत ही छापेमारी सुरू आहे. या छापेमारीत एनआयएच्या हाती बरंच घबाड लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. सप्टेंबर 2022मध्ये केंद्र सरकारने पीएफआय या संघटनेवर बंदी घातलेली आहे. दहशतवादी कारवाया करत असल्याच्या आरोपावरून ही बंदी घालण्यात आली आहे.

देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी
Beed चा खरा तपास करायचा आहे, तर या लोकांचे CDR काढा, खासदाराची मागणी.
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?
मला या जिल्ह्याचं पालकमंत्री व्हायला आवडेल,काय म्हणाले देवेंद फडणवीस ?.
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस
'विरोधकांनी बीडमध्ये जरुर जावे, पण...,' काय म्हणाले देवेंद्र फडणवीस.
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?
एका कार्डवर शेतकऱ्यांची सर्व कामं; काय आहे Farmer Digital ID?.
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला
पूजा खेडकरचा जामीन अर्ज दिल्ली हायकोर्टाने फेटाळला.
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे
संतोष देशमुखांना टॉर्चर करून करून मारलं - बजरंग सोनावणे.