स्कॉर्पिओ, इनोव्हाच्या दोन्ही ड्रायव्हरचा शोध लागला, दोघांचंही वाझेंशी कनेक्शन?;
उद्योगपती अंबानी यांच्या घरासमोर सापडेल्या स्कॉर्पिओ कार आणि इनोव्हा कारच्या ड्रायव्हरचा सुगावा लागला आहे. (nia searched two drivers in ambani Bomb Scare case)
मुंबई: उद्योगपती अंबानी यांच्या घरासमोर सापडेल्या स्कॉर्पिओ कार आणि इनोव्हा कारच्या ड्रायव्हरचा सुगावा लागला आहे. हे दोन्ही ड्रायव्हर पोलीस दलातच कार्यरत असून वाझेंच्या संपर्कातील असल्याची धक्कादायक माहिती समोर आल्याचं सूत्रांनी सांगितलं. (nia searched two drivers in ambani Bomb Scare case)
अँटालिया स्कॉर्पिओ स्फोटप्रकरण एनआयएने हाती घेतल्यापासून आणि सचिन वाझे यांना अटक केल्यापासून या प्रकरणात रोज नवनवीन धक्कादायक माहिती समोर येत आहे. आता अँटालिया येथे स्फोटकांनी भरलेली स्कॉर्पिओ आणणाऱ्या ड्रायव्हरचा शोध लागला आहे. तसेच या स्कॉर्पिओसोबत एक इनोव्हाही अँटालियाबाहेर आली होती. 24 फेब्रुवारीच्या रात्री 1 वाजता या दोन्ही कार आल्या होत्या. स्कॉर्पिओ पार्क केल्यानंतर ही इनोव्हा कार निघून गेली होती. धक्कादायक बाब म्हणजे या दोन्ही कारचे ड्रायव्हर पोलीस दलातच कार्यरत असून वाझेंच्या संपर्कातील असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे हे दोन्ही ड्रायव्हर सीआययू युनिटशी संबंधित असल्याचंही सांगण्यात येतं. त्यामुळे वाझे यांना नेमकं काय करायचं होतं? अँटालिया येथे स्फोटकांनी भरलेली कार कुणी? का? कशासाठी? आणि कुणाच्या सांगण्यावरून आणली? आदी प्रश्न निर्माण झाले आहेत.
दोन्ही ड्रायव्हरवर वॉच
दरम्यान, या दोन्ही ड्रायव्हरच्या मागावर एनआयएचे अधिकारी आहेत. हे ड्रायव्हर कुठेही पळून जाऊ नये म्हणून एनआयएचे अधिकारी सतर्क असून या दोन्ही ड्रायव्हरला लवकरच चौकशीसाठी बोलावलं जाण्याची शक्यताही सूत्रांकडून वर्तवण्यात आली आहे.
कार चोरी झालीच नव्हती?
दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अंबानींच्या घराबाहेर सापडलेली स्कॉर्पिओ कार कधीच चोरी झाली नव्हती. कुणाच्या तरी दबावाखाली ही कार चोरी झाल्याची तक्रार विक्रोळी पोलीस ठाण्यात करण्यात आली होती, असा एनआयएला संशय आहे. वाझेंनी त्यांच्या घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज बेकायदेशीररित्या काढून घेतल्याचंही तपासातून उघड झालं आहे. पोलिसांच्या ऑफिशियल वापरासाठी हे डीव्हीआर पाहिजेत, असं सांगून वाझेंनी सोसायटीकडून सीसीटीव्ही फुटेज घेतले होते. त्यानंतर हे फुटेज डॅमेज करण्यात आले होते. चौकशीच्यावेळी कोणताही पुरावा मिळू नये म्हणून त्यांनी हे केलं होतं. सीसीटीव्ही फुटेज मिळावं म्हणून वाझेंनी त्यांच्या एका मित्राच्या नावाने सोसायटीला पत्रंही दिलं होतं. हे पत्रं एनआयएच्या हाती लागलं आहे. अंबानी प्रकरणाच्या चौकशीसाठी हे फुटेज हवं असल्याचं या पत्रात म्हटलं असून त्यावर वाझेंचे हस्ताक्षरही आहेत, असं सूत्रांनी सांगितंल. (nia searched two drivers in ambani Bomb Scare case)
LIVE : महत्त्वाच्या घडामोडी https://t.co/85f9PM9pYl
— TV9 Marathi (@TV9Marathi) March 15, 2021
संबंधित बातम्या:
मोठा खुलासा! स्कॉर्पिओ चोरी झालीच नव्हती, वाझेंकडेच होती; सीसीटीव्ही फुटेजमधून ‘कार’नामे उघड?
सचिन वाझेंनी स्वत; सोसायटीतला डिव्हीआर काढला, पत्रव्यवहारांची tv9 कडे कॉपी
सचिन वाझे तपासात सहकार्य करत नाहीत, मोबाईल घरी ठेवून आले, कुटुंबीयही गायब
सचिन वाझेंच्या घराला टाळं; कुटुंबीयही 10-12 दिवसांपासून गायब, NIA घराची झडती घेणार?
(nia searched two drivers in ambani Bomb Scare case)