मुंबईतील नाईट क्लब सर्वात आधी बंद करू; अस्लम शेख यांचे संकेत

| Updated on: Mar 09, 2021 | 12:59 PM

मुंबई आणि ठाण्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. या दोन्ही शहरांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. (nightclubs might be closed says aslam shaikh)

मुंबईतील नाईट क्लब सर्वात आधी बंद करू; अस्लम शेख यांचे संकेत
अस्लम शेख, पालकमंत्री, मुंबई
Follow us on

मुंबई: मुंबई आणि ठाण्यात कोरोनाचा कहर वाढला आहे. या दोन्ही शहरांमध्ये कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण सापडत आहेत. मुंबईच्या नाईट क्लबमध्ये तर कोरोनाचा फज्जा उडालेला आहे. त्यामुळे सर्वात आधी नाईट क्लब बंद होऊ शकतात, असे संकेत मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले आहेत. (nightclubs might be closed says aslam shaikh)

विधानभवन परिसरात प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना अस्लम शेख यांनी हे संकेत दिले आहेत. गेल्या काही दिवसांपासून नाईट क्लबमध्ये सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडालेला आहे. काही नाईट क्लबवरही कारवाई करण्यात आली आहे. पण त्याने काहीही फरक पडलेला नाही, असं सांगतानाच मुंबईत पहिल्यांदा नाईट क्लब बंद होऊ शकतात, असं शेख म्हणाले.

मुंबईत अंशत: लॉकडाऊन

काल मुख्यमंत्री उद्धव ठकारे यांनी कोरोना आढावा बैठक घेतली. जिथं जिथं केसेस वाढत आहेत. त्या ठिकाणी अंशत: लॉकडाऊन, रात्रीची संचारबंदी आणि इतर निर्बंध लावण्यात येणार आहेत. स्थानिक प्रशासनाला तसे आदेश देण्यात आले आहेत. केसेस वाढत राहिल्यास मुंबईतही अंशत: लॉकडाऊन लागू शकतो, असं त्यांनी सांगितलं.

रात्रीची संचाबंदी लावणार

मुंबई आणि ठाण्यात कोरोनाच्या केसेस वाढत आहेत. त्यावर आरोग्य यंत्रणा लक्ष ठेवून आहे. या बैठकीत लोकल ट्रेन आणि बेस्ट बसेसमधील गर्दीवरही चर्चा झाली. तसेच लग्न समारंभांवरही चर्चा झाली, असं त्यांनी सांगितलं. रात्री अनेक ठिकाणी गर्दी होत असल्याचं आढळून आलं आहे. त्यामुळे रात्रीची संचाबंदी लावण्यात येणार आहे, असंही त्यांनी सांगितलं.

जिल्हाधिकाऱ्यांना अधिकार

राज्यात ज्या ज्या ठिकाणी गर्दी होत आहे, त्या ठिकाणी निर्बंध येऊ शकतात. त्याबाबत प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना स्थानिक पातळीवर निर्णय घेण्याचे अधिकार दिले आहेत, असं सांगतानाच कोरोना केसेस वाढत असल्या तरी लॉकडाऊन हा त्यावर पर्याय नाही, असंही त्यांनी स्पष्ट केलं. (nightclubs might be closed says aslam shaikh)

 

संबंधित बातम्या:

ठाण्यातील हॉटस्पॉटमध्ये लॉकडाऊन लागू; मुंबईही लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर?

तर मुंबईत अंशत: लॉकडाऊन, पालकमंत्र्यांचा इशारा

व्यापारी गौतम हिरणच्या मारेकऱ्यांना अटक करा; भाजपचे बुधवारी राज्यव्यापी आंदोलन

(nightclubs might be closed says aslam shaikh)