मुंबई : माजी खासदार निलेश राणे यांनी कोरोनावर मात केली आहे (Nilesh Rane Corona test negative). त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला आहे. याबाबत त्यांनी स्वत: ट्विट करुन माहिती दिली आहे. “माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या, मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो”, असं निलेश राणे ट्विटरवर म्हणाले आहेत (Nilesh Rane Corona test negative).
माझी कोरोना टेस्ट निगेटिव्ह आली आहे. ज्यांनी मला शुभेच्छा दिल्या मी त्यांचे मनापासून आभार व्यक्त करतो.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 29, 2020
निलेश राणे यांनी 16 ऑगस्ट रोजी ट्विटरवर आपला कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याची माहिती दिली होती. तेव्हापासून ते मुंबईत सेल्फ क्वारंटान होते. यावेळी त्यांनी संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना कोरोना चाचणी करण्याची विनंती केली होती. “कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करुन घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी”, असं ट्विट निलेश राणे यांनी केलं होतं.
कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसल्याने चाचणी केली असता माझा कोविड-19 रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. माझी तब्ब्येत उत्तम असून डॉक्टरांच्या सल्ल्याने मी स्वतःला सेल्फ क्वारंटाईन करून घेतले आहे. गेल्या काही दिवसात माझ्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींनी स्वत:ची चाचणी करावी.
— Nilesh N Rane (@meNeeleshNRane) August 16, 2020
कोण आहेत निलेश राणे?
निलेश राणे हे भाजप खासदार नारायण राणे यांचे सुपुत्र. 2009 मध्ये ते रत्नागिरी-सिंधुदुर्ग मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर खासदारपदी निवडून आले होते. वयाच्या 28 व्या वर्षी ते संसदेत पोहोचले. मात्र 2014 मध्ये शिवसेना खासदार विनायक राऊत यांच्याकडून ते पराभूत झाले. राणे कुटुंबाने 2019 मध्ये भाजपमध्ये प्रवेश केला.
निलेश राणे हे सोशल मीडियावरील आक्रमक पवित्र्यासाठी ओळखले जातात. शिवसेना आणि काँग्रेसच्या नेत्यांसोबत अनेक वेळा त्यांची ट्विटरवर जुगलबंदी रंगली आहे.