मुंबई : मुंबईत नीता मुकेश अंबानी कल्चरल सेंटर (NMACC) चे भव्य उद्घाटन झाले. या समारंभात रिलायन्स फाऊंडेशनच्या अध्यक्षा आणि संस्थापक नीता अंबानी यांनी केलेल्या नृत्याने सर्वांचे लक्ष वेधले. या सोहळ्याला देश-विश्वातील स्टार्स पोहोचले होते. मुंबईतील वांद्रे कुर्ला संकुलातील जिओ वर्ल्ड गार्डनमध्ये NMACC बांधण्यात आले आहे. रिलायन्स इंडस्ट्रीजचे सीएमडी मुकेश अंबानी आणि त्यांची मुलगी रिलायन्स रिटेल व्हेंचर्स लिमिटेड (RRVL) च्या संचालक ईशा अंबानी या समारंभाला उपस्थित होत्या. याशिवाय अनंत अंबानी आणि त्यांची मंगेतर राधिका मर्चंट यांनीही उद्घाटन सोहळ्याला हजेरी लावली होती. या कार्यक्रमात आकाश अंबानी आणि त्याची पत्नी श्लोका अंबानी देखील सहभागी झाले होते.
#WATCH | Mumbai: Nita Ambani gracefully dances on 'Raghupati Raghava Raja Ram' at Nita Mukesh Ambani Cultural Centre (NMACC) pic.twitter.com/ndCKYdvvj1
हे सुद्धा वाचा— ANI (@ANI) April 1, 2023
‘रघुपती राघव’वर डान्स
NMACC च्या उद्घाटनाला देश-विदेशातील मोठे चेहरे उपस्थित होते. कार्यक्रमात नीता अंबानी यांनी ‘रघुपती राघव’वर डान्स केला. हा व्हिडिओ चांगलाच व्हायरल होतोय. कार्यक्रमाला प्रियंका चोपडा, निक जोनस, दीपिका पादुकोण, रणवीर सिंह, शाहरुख खान, सोनम कपूर, रजनीकांत, ऐश्वर्या राय, करीना कपूर खान आले होते.
नीता अंबानी यांची बनारसी साडी
या खास सोहळ्यासाठी नीता अंबानी यांनी निळ्या रंगाची बनारसी सिल्क साडी नेसली होती. ज्यामुळे त्यांचा लूक एकदम फ्रेश दिसत होता. साडीवर तांबे आणि सोन्याच्या जरीच्या धाग्यांनी फुलांचा आकृती होती. फुलांचे डिझाईनही दिसत होते. मॅचिंग ब्लाउजमुळे नीता अंबानी यांचा लूक अधिक परफेक्ट झाला होता.