नीता अंबानीच्या भावी सूनेने केला धमाकेदार डान्स, फॅन्स म्हणाले…

| Updated on: Feb 22, 2024 | 12:34 PM

Anant Ambani Radhika Merchant Wedding | राधिका हिने ब्लॅक टॉप आणि मल्टी कलर लहंगा परिधान केला आहे. हा लहंगा संदीप खोसला आणि अबू जानी यांचे कलेक्शन आहे. राधिकाने हा लहंगा प्रियंका चोपडाच्या लग्नातही घातला होता. राधिकाच्या साधेपणावर फॅन्स खूश झाले आहे.

नीता अंबानीच्या भावी सूनेने केला धमाकेदार डान्स, फॅन्स म्हणाले...
Follow us on

मुंबई, दि. 22 फेब्रुवारी 2024 | अंबानी परिवारात लवकरच लग्न होणार आहे. मुकेश आणि नीता अंबानी यांचा लहान मुलगा अनंत अंबानी यांचे लग्न होणार आहे. अनंत अंबानी त्याची बालमैत्रीण राधिका मर्चेंटसोबत लग्न करणार आहे. या लग्नाची तयारी दोन्ही परिवारात सुरु आहे. लग्न समारंभ विशेष करण्याकडे लक्ष दिले जात आहे. राधिका मर्चंट हिच्या लुक्स आणि स्टाईलची चर्चा होत आहे. सध्या राधिका मर्चंटचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. त्यात ती डान्स करताना दिसत आहे.

मैत्रिणीच्या लग्नात जोरदार डान्स

राधिका मर्चेंट अंबानी परिवारची सून होणार आहे. यामुळे सर्वांचे लक्ष राधिकाकडे आहे. तिची स्टाइल आणि एलीगेंस लुक लोकांना आवडत आहे. नुकतीच राधिका हिने तिच्या एका मैत्रिणीच्या लग्नास हजेरी लावली. त्याठिकाणी राधिका मर्चंटने धमाकेदार डान्स केला. अंबानी परिवाराच्या फॅन्स पेजवर तिच्या या डान्सचा व्हिडिओ शेअर केला गेला आहे. ishaambanipiramal नावाच्या फॅनने हे पेज तयार केले आहे. व्हिडिओत मैत्रिणींबरोबर गाण्यांवर करताना दिसत आहे.

हे सुद्धा वाचा

साधेपणावर फॅन्स खूश

राधिका हिने ब्लॅक टॉप आणि मल्टी कलर लहंगा परिधान केला आहे. हा लहंगा संदीप खोसला आणि अबू जानी यांचे कलेक्शन आहे. राधिकाने हा लहंगा प्रियंका चोपडाच्या लग्नातही घातला होता. राधिकाच्या साधेपणावर फॅन्स खूश झाले आहे. सोशल मीडिया युजर्स म्हणतात, श्रीमंत असतानाही आउटफिट रिपीट करणे म्हणजे जमिनीवर असल्याचे लक्षण आहे. राधिका डाउन टू अर्थ आहे. अनेकांनी राधिकाच्या स्वभावाचे कौतूक केले आहे. व्हिडिला हजारो जणांनी पाहिले आहे. तसेच अनेकांनी लाईक केले आहे.

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांचा मोठा मुलगा आकाश अंबानी यांचे लग्न २०१९ मध्ये झाले होते. मुंबईतील जिओ सेंटर येथे हा शाहीविवाह सोहळा झाला होता. हिरा व्यापारी रसेल मेहता यांच्या मुलीसोबत आकाशने लग्नगाठ बांधली होती.