Nitesh Rane on raza academy : रझा अकादमीच्या इफ्तारला पोलीस आयुक्तांना हजर राहायला सांगणं हा सरकारी आदेश नाही ना?; नितेश राणे यांचा सवाल

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे हे रझा अकादमीने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला उपस्थित राहिले होते. त्यावरून आता राजकारण रंगताना दिसत आहे.

Nitesh Rane on raza academy : रझा अकादमीच्या इफ्तारला पोलीस आयुक्तांना हजर राहायला सांगणं हा सरकारी आदेश नाही ना?; नितेश राणे यांचा सवाल
रझा अकादमीला पोलीस आयुक्तांना हजर राहायला सांगणं हा सरकारी आदेश नाही ना?; नितेश राणे यांचा सवालImage Credit source: tv9 marathi
Follow us
| Updated on: Apr 18, 2022 | 1:06 PM

मुंबई: मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे (sanjay pandey) हे रझा अकादमीने (raza academy ) आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला उपस्थित राहिले होते. त्यावरून आता राजकारण रंगताना दिसत आहे. रझा अकादमीने आयोजित केलेल्या इफ्तार पार्टीला हजर राहण्याचे पोलीस आयुक्तांना सरकारी आदेश तर नव्हते ना? असा सवाल भाजपचे नेते नितेश राणे (nitesh rane) यांनी केला आहे. तसेच पोलीस आयुक्त रझा अकादमीच्या इफ्तार पार्टीला हजर राहिल्याने संताप व्यक्त केला आहे. हीच ती रझा अकादमी ज्यांनी हुतात्मा स्मारकाची मोडतोड केली. महिला पोलिसांवर हल्ले केले. भिवंडीत महिला पोलीस अधिकाऱ्यांना मारलं. नांदेड, मालेगावसारख्या ठिकाणी दंगली भडकवल्या. कायम देशाविरोधात भूमिका घेणाऱ्या रझा अकादमीच्या इफ्तारला मुंबईचे पोलीस कमिश्नर जातातच कसे? असा संतप्त सवालही त्यांनी केला आहे.

नितेश राणे यांनी मीडियाशी संवाद साधताना आणि ट्विटरवरून हा संताप व्यक्त केला आहे. ज्या ‘रझा अकादमीने’ आझाद मैदानात अमर जवान मूर्ती तोडली. महिला पोलिस भगिनींशी गैरवर्तन केले अशा देशविरोधी कृती करणाऱ्यांच्या इफ्तारमध्ये सामिल होऊन त्यांना अधिकृतरित्या प्रोत्साहित करणे हे महाविकास आघाडीचं धोरण राबविण्याचा अधिकाऱ्यांवरती दबाव आहे का?, असा सवाल नितेश राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना ट्विटरवरू केला आहे.

पोलिसांचा तो फोटो ट्विट

एकीकडे गृहमंत्री सभागृहात रझा अकादमीवर बंदी घालण्याचा विचार करत आहोत अस सांगत असतात. तर दुसरीकडे त्यांचे अधिकारी रझा अकादमीच्या इफ्तारला हजर राहतात. हा सरकारी आदेश म्हणावा का?, असा सवालही त्यांनी केला आहे. नितेश राणे यांनी रझा अकादमीच्या कार्यकर्त्यांसोबतचा पोलीस आयुक्तांचा एक फोटोही ट्विट केला आहे.

हिंदू किती सुरक्षित हे मुख्यमंत्र्यांनी सांगावं

या आधी नितेश राणे यांनी ठाकरे सरकार हिंदू विरोधी असल्याचा आरोप केला होता. आम्ही वारंवार सांगतोय हे महाविकास आघाडीचे सरकार हिंदू विरोधी आहे. याचे असंख्य पुरावे दाखण्याचा प्रयत्न करतोय हे सरकार हिंदू विरोधी आहे. या महाराष्ट्रमध्ये हिंदूने जगले पाहिजे का? आम्हाला प्रत्येक वेळी अडवे जात असाल तर हिंदू किती सुरक्षित आहे हे मुख्यमंत्र्यांनी संगितले पाहिजे, असं ते म्हणाले होते.

हिंदूंच्या बाजूने बोलणे गुन्हा आहे का?

या राज्यात हिंदूंच्या बाजूने बोलणे गुन्हा आहे का? शक्ती कायदा कशासाठी आणलाय? तीन महिने एखादी महिला सापडत नसेल तर या कायदा काय करायचा? आम्ही कोणत्या धर्मा विरोधात नाही. मात्र आम्ही हिंदू सण, मिरवणुका काढायच्या नाही का? बाळासाहेबांचा मुलगा मुख्यमंत्री असतांना नगरमध्ये पाकिस्तानच्या घोषणा दिल्या जात आहे, असंही ते म्हणाले.

संबंधित बातम्या:

Raj Thackeray Effect : राज ठाकरे इफेक्ट, नाशिकचा पॅटर्न महाराष्ट्रभर राबवण्याची तयारी, गृहमंत्र्यांची डीजींसोबत बैठक, एसपी, आयुक्तांना आदेश

Kishori Pednekar: राज ठाकरेंना एवढंच सांगेन, जागते रहो, नाही तर निवडणुका आल्यावर…; किशोरी पेडणेकरांचा टोला

PNB Scam: नाशिकमध्ये चोकसीची जमीन विक्री आयकरने थांबवली; अनेक जण रडारवर, प्रकरण काय?

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.