वीज पुरवठा खंडित प्रकरणची उच्चस्तरीय चौकशी, ऊर्जामंत्री अॅक्शन मोडमध्ये

दक्षिण मुंबई वीज पुरवठा खंडित झाल्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिले आहेत. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर स्वतः ऊर्जामंत्री राऊत यांनी 'ऍक्शन मोड'मध्ये येत सर्व संबंधित अधिकारी आणि टाटा कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी यांच्याशी सतत संपर्कात होते.

वीज पुरवठा खंडित प्रकरणची उच्चस्तरीय चौकशी, ऊर्जामंत्री अॅक्शन मोडमध्ये
कोळसा अपुरा असल्याने राज्यावर वीज संकट असल्याचे ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी सांगितलेImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: Feb 27, 2022 | 5:56 PM

मुंबईसकाळी अचानक वीजपुरवठा खंडीत (Power outage) झाल्याने दक्षिण मुंबई (south Mumbai)  तासभर अंधारात होती. त्यामुळे या भागातील मोठे नुकसान झाले आहे. मागेही एकदा असाचा वीजपुरवठा खंडीत झाला होता. आता दक्षिण मुंबई वीज पुरवठा खंडित झाल्या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश राज्याचे ऊर्जामंत्री नितीन राऊत (Nitin Raut) यांनी दिले आहेत. वीज पुरवठा खंडीत झाल्यानंतर स्वतः ऊर्जामंत्री राऊत यांनी ‘ऍक्शन मोड’मध्ये येत सर्व संबंधित अधिकारी आणि टाटा कंपनीचे उच्चपदस्थ अधिकारी यांच्याशी सतत संपर्कात होते. “या घटनेची माहिती मिळताच मी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे तसेच महापारेषण व राज्य भार प्रेषण केंद्रातील प्रमुखांशी सतत संपर्कात होतो. वीज पूरवठा तात्काळ पूर्ववत व्हावा यासाठी मी त्यांना सूचना दिल्या आणि या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला. तसेच टाटा कंपनीच्या उच्चपदस्थ अधिकाऱ्यांशी ही प्रत्यक्ष बोलून वीज पुरवठा तात्काळ सुरू होण्याबाबत चर्चा केली. वरिष्ठ अधिकाऱ्यांना मी दुरुस्तीच्या ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष कामावर देखरेख ठेवण्याच्या सूचना दिल्या. विविध कारणांमुळे झालेला हा बिघाड दुरुस्त करून अवघ्या 70 मिनिटात दक्षिण मुंबईतील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला,”असे राऊत यांनी म्हटले आहे.

प्रकरणाची चौकशी होणार-राऊत

“या प्रकरणाची गंभीर दखल मी घेतली असून या प्रकरणी उच्चस्तरीय चौकशीचे आदेश दिले आहेत. या चौकशीत दोषी आढळणाऱ्यावर उचित कारवाई केली जाईल,”असेही राऊत यांनी जाहीर केले.वीज पुरवठा पूर्ववत करण्यास प्राधान्य दिल्याने माध्यम प्रतिनिधींना माहिती देण्यास विलंब झाला,असेही त्यांनी म्हटले आहे. टाटा ग्रीड फेल्यूअर झाल्याने दक्षिण मुंबईत वीज पुरवठा खंडित झाला. कुलाबापासून ते कुर्ल्यापर्यंत आणि चर्चगेटपासून ते विरारपर्यंत वीज पुरवठा अचानक खंडित झाल्याने नागरिकांची प्रचंड गैरसोय झाली. बत्तीगुल झाल्यामुळे छत्रपती शिवाजी टर्मिनसही अंधारात गेले होते.

काही काळ रेल्वेला फटका

अचानक वीज पुरवठा खंडित झाल्याने छत्रपती शिवाजी टर्मिनसही अंधारात गेले होते. संपूर्ण रेल्वेस्थानकात अंधारा झाला होता. मात्र, रविवार सुट्टीमुळे स्थानकात गर्दी नव्हती. त्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. वीज पुरवठा खंडित होण्याचा रेल्वे सेवेवरही परिणाम झाला. पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असल्याने नागरिकांना त्याचा अधिक फटका बसला नाही. तसेच सुट्टीचा दिवस असल्याने कोणतीही गैरसोय झाली नाही. पश्चिम मार्गावरील रहिवाशांची गैरसोय होऊ नये म्हणून जोगेश्वरी उपकेंद्रातून वीजपुरवठा वाढविण्यात आला होता. दरम्यान, तासाभराच्या प्रयत्नानंतर वीज पुरवठा पूर्ववत सुरू झाला. तसेच ओव्हरहेड वायरवरील वीज पुरवठा पूर्ववत करण्यात आला.

दक्षिण मुंबईतील बत्तीगुल, रेल्वेचा खोळंबा, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसही अंधारात; तासभर फटका

अमित ठाकरेंच्या खांद्यावर ‘मनसे’ची मोठी जबाबदारी; राज यांनी साधला मराठी भाषा गौरव दिनाचा अमृतयोग!

2024मध्ये शिवसेना दिल्लीत बसणार म्हणजे बसणारच; आदित्य ठाकरेंचा पुनरुच्चार

Non Stop LIVE Update
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?
सुप्रिया सुळे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा? शरद पवार त्यांना CM करणार?.
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'
लाडकी बहीणचा महायुतीला फायदा होणार? पवार म्हणाले, 'नाव गोंडस पण...'.
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा
इचलकरंजीत 2019च्या सभेची पुनरावृत्ती,भर पावसात पुन्हा शरद पवारांची सभा.
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल
'एकदा या गद्दाराला पाडा...', उद्धव ठाकरेंचा अब्दुल सत्तारांवर हल्लाबोल.
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय
MNS Manifesto : ''आम्ही हे करु'','मनसे'च्या जाहीरनाम्यात कोणासाठी काय.
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही
शिवतीर्थवरील सभेच्या शर्यतीतून मनसे आऊट? 17 तारखेची सभा होणार की नाही.
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल
'...मुली आणणार कुठून?', मुंडेंचा शरद पवार गटाच्या उमेदवाराला खोचक सवाल.
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक
'भाजपविरोधात मतदान करा, नाहीतर अल्लाहसोबत बेईमानी...', फडणवीस आक्रमक.
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'
महायुतीचा CM पदाचा चेहरा कोण? फडणवीस स्पष्टच म्हणाले, 'मी शर्यतीत...'.
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट
म्हणून राष्ट्रपती राजवट लागली, पवारांचं नाव घेत फडणवीसांचा गौप्यस्फोट.