सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारी संस्था, विद्यापीठांचं सहकार्य घ्या, नितीन राऊत यांची महावितरणला सूचना

मुंबई : सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनी घेण्यात अडचणी असल्यास त्यासाठी संबंधित मुख्य अभियंता यांनी पुढाकार घ्यावा. सरकारी संस्था, विद्यापीठे व इतर संस्था यांच्या उपलब्ध जमिनीवर सोलर प्रकल्प उभारण्यासाठी संयुक्त प्रकल्प तयार करून नफा व मिळकत यांच्यात त्यांना वाटेकरी करून घ्यावे, अशी सूचना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. (Nitin Raut said Mahadiscom can start […]

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारी संस्था, विद्यापीठांचं सहकार्य घ्या, नितीन राऊत यांची महावितरणला सूचना
नितीन राऊत
Follow us
| Updated on: Jun 09, 2021 | 7:01 PM

मुंबई : सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनी घेण्यात अडचणी असल्यास त्यासाठी संबंधित मुख्य अभियंता यांनी पुढाकार घ्यावा. सरकारी संस्था, विद्यापीठे व इतर संस्था यांच्या उपलब्ध जमिनीवर सोलर प्रकल्प उभारण्यासाठी संयुक्त प्रकल्प तयार करून नफा व मिळकत यांच्यात त्यांना वाटेकरी करून घ्यावे, अशी सूचना ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी केली आहे. (Nitin Raut said Mahadiscom can start solar energy project with universities and government institutions)

सोलर व रुफ टॉप सोलर प्रकल्पाच्या महावितरणच्या कामावर असमाधानी

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी व रुफ टॉप सोलर प्रकल्पाबाबत महावितरणची प्रगती संथ असल्याबाबत ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. तसेच याप्रकरणातील संबंधित दोषी अधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस देण्याचे आदेश ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज महावितरणला दिले.मंत्रालयात पार पडलेल्या आढावा बैठकीत डॉ राऊत यांनी अधिक्षक अभियंत्याना सोलर व रुफ टॉप सोलर प्रकल्पाच्या प्रगतीबाबत धारेवर धरत येत्या 7 दिवसात अहवाल सादर करण्याचे निर्देश दिलेत.

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी सरकारी संस्था विद्यापीठांची मदत

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी जमिनी घेण्यात अडचणी असल्यास त्यासाठी संबंधित मुख्य अभियंता यांनी पुढाकार घ्यावा. सरकारी संस्था, विद्यापीठे व इतर संस्था यांच्या उपलब्ध जमिनीवर सोलर प्रकल्प उभारण्यासाठी संयुक्त प्रकल्प तयार करून नफा व मिळकत यांच्यात त्यांना वाटेकरी करून घ्यावे, अशी सूचना त्यांनी यावेळी केली.

सोलर वीज प्रकल्पाचा आढावा घेण्यासाठी ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करून मासिक आढावा घेण्यात यावा. हायब्रीड ऊर्जा प्रकल्पाअंतर्गत पवन ऊर्जेसोबत सोलर ऊर्जा निर्मिती करण्यासाठी पवन ऊर्जा प्रकल्पाच्या उपलब्ध जमिनीवर सोलर ऊर्जा निर्मिती करण्यासाठी पवन ऊर्जा प्रकल्पांना प्रोत्साहन देण्यात यावे, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले.

ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल, ऊर्जामंत्री यांचे सल्लागार उत्तम झाल्टे व इतर अधिकारी यावेळी उपस्थित होते.

एचव्हीडीएस योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करा : नितीन राऊत

शेतकऱ्यांच्या प्रलंबित कृषिपंपांना त्वरित वीज जोडण्या देण्यासाठी उच्चदाब विद्युत वितरण प्रणाली योजनेची कामे जलद गतीने करा. वेळेत काम न करणाऱ्या कंत्राटदाराना काळ्या यादीत टाकण्याचे निर्देश ऊर्जामंत्री डॉ नितीन राऊत यांनी आज महावितरणला दिले.

संबंधित बातम्या:

खरिप हंगामासाठी किमान आधारभूत किमती जाहीर, कोणत्या पिकाची MSP सर्वाधिक वाढली?

कृषिपंपाना त्वरित वीज जोडण्या द्या, एचव्हीडीएस योजनेची कामे जलदगतीने पूर्ण करा : नितीन राऊत

(Nitin Raut said Mahadiscom can start solar energy project with universities and government institutions)

Non Stop LIVE Update
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ
अजितदादांची शरद पवारांकडून पुन्हा भरसभेत नक्कल अन्..., बघा व्हिडीओ.
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'
रामटेकमध्ये वाद पेटला; 'सुनील केदार मारूतीच्या बेंबीतील विंचू अन्..'.
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले..
2014 नंतर मला त्या बाबत कोणी विचारले नाही...राज ठाकरे यांनी सांगितले...
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?
मुख्यमंत्रिपदावरून विनोद तावडेंचं वक्तव्य, दिल्लीत कोणता चेहरा फिक्स?.
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'
अमित ठाकरेंविरोधात सरवणकर भिडल्या, देशपांडेंवरही निशाणा, 'लाथ घालून..'.
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.