महाड, नागोठणे, पेणमध्ये वीज यंत्रणा कोलमडल्या; ऊर्जामंत्री राऊत मंगळवारी करणार पाहणी

महाड आणि चिपळूणमध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे वीज यंत्रणाही कोलमडून गेली आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत. विजेच्या तारा तुटल्याने विद्यूत पुरवठा खंडित झाला आहे. (nitin raut)

महाड, नागोठणे, पेणमध्ये वीज यंत्रणा कोलमडल्या; ऊर्जामंत्री राऊत मंगळवारी करणार पाहणी
Nitin Raut
Follow us
| Updated on: Jul 26, 2021 | 7:33 PM

मुंबई: महाड आणि चिपळूणमध्ये अतिवृष्टी आणि महापुरामुळे वीज यंत्रणाही कोलमडून गेली आहे. अनेक ठिकाणी विजेचे खांब कोसळले आहेत. विजेच्या तारा तुटल्याने विद्यूत पुरवठा खंडित झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत उद्या मंगळवारी महाड, नागोठणे आणि पेणमध्ये जाऊन पाहणी करणार आहेत. (nitin raut to review power supply affected in flood affected area)

नितीन राऊत उद्या मंगळवारी हे प्रत्यक्ष महाड, पेण, नागोठणे या भागात जाऊन वीज कर्मचाऱ्यांशी संवादही साधणार आहेत. त्यांच्या अडचणीही जाणून घेणार आहे. तसेच प्रभावित क्षेत्रातील भागात दुरूस्तीसाठी त्वरित साहित्य व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्याच्या सूचनाही त्यांनी महावितरण व्यवस्थापनाला दिल्या आहेत. आपल्या या दौऱ्यात ते पूरग्रस्त गरजवंताना जीवनावश्यक साहित्याचे वाटपही करणार आहेत. तसेच महाड येथे दिवंगत काँग्रेस नेते माणिकराव जगताप यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट देणार आहेत. यानंतर ते माध्यम प्रतिनिधीसोबत संवादही साधणार आहेत.

साडे सहा लाख ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत

गेल्या आठवड्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे राज्यातील 1927 गावे व शहरातील 9 लाख 60 हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित झाला. महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी भर पावसात व पुरात साडेसहा लाख ग्राहकांचा वीज पुरवठा सुरळीत केला आहे. रात्रंदिवस युद्धपातळीवर दुरुस्तीचे कामे सुरू असून लवकरच उर्वरित भागाचा वीज पुरवठा सुरळीत होणार आहे. पावसामुळे प्रभावित क्षेत्रातील एकूण 14 हजार 737 रोहित्रे बंद पडली होती. त्यापैकी 9 हजार 262 रोहित्रे सुरू करण्यात यश आले आहे. बंद झालेल्या 474 वीज वाहिन्यांपैकी आता 268 वीज वाहिन्या चालू करण्यात आलेल्या आहेत. बंद पडलेल्या 67 वीज उपकेंद्रे व स्विचिंग केंद्रापैकी 44 केंद्रे ही पूर्ववत करण्यात यश मिळाले आहे. दोन अतिदाब उपकेंद्रापैकी एक उपकेंद्र आता चालू झालेला आहे.

महाडमध्ये वीज पुरवठा सुरू होणार

प्रलयात जलमय झालेल्या परिसरातील महावितरणची संपूर्ण वितरण प्रणालीच पाण्यात बुडाली. अनेक भागात तारांसह पोल जमीनदोस्त झाले. नदीला पुरामुळे आलेले तुफान झेलत, डोंगर दर्यातून अवजड पोल, रोहित्रे व इतर अवजड सामग्री खांद्यावर वाहून नेऊन महावितरणच्या जिगरबाज कर्मचाऱ्यांनी बहुतांश भागाचा वीज पुरवठा सुरळीत केला. त्यांच्या या कामगिरीचे ऊर्जामंत्री राऊत यांनी त्यांचे कौतुक केले आहे. महाड येथे महापारेषणचे दोन टॉवर पडले असल्याने संपूर्ण महाड तालुका अंधारात बुडाला आहे. मात्र पर्यायी व्यवस्था करत दवाखाने व पाणीपुरवठा योजनेला वीज पुरवठा उपलब्ध करून दिलेला आहे. तसेच उद्या सकाळ पर्यंत चक्राकार पद्धतीने महाड शहरातील ग्राहकांना वीज पुरवठा उपलब्ध होणार आहे. (nitin raut to review power supply affected in flood affected area)

संबंधित बातम्या:

15 टक्के शुल्क कपात, शालेय फी वाढीसंदर्भात राज्य सरकार मोठ्या निर्णयाच्या तयारीत, अध्यादेश आणण्याची शक्यता, सूत्रांची माहिती

मुंबई उपनगरातील आपत्ती रोखण्यासाठीच्या उपायांचा आदित्य ठाकरेकडून आढावा, पर्याय सादर करण्याच्या अधिकाऱ्यांना सूचना

5 जिल्ह्यांच्या किनारपट्टी भागात भिंत उभारणार, ठाकरे सरकारचा मोठा निर्णय, मुख्यमंत्र्यांची आपत्कालीन बैठक

(nitin raut to review power supply affected in flood affected area)

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.