ज्याचे मोदी, शहांसोबत फोटो तो भानुशाली एनसीबी कारवाई करताना हजर कसा?; नवाब मलिक यांचे भाजप, एनसीबीला पाच सवाल
एनसीबीने क्रूझवरील रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईवरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी आणि भाजपवर गंभीर आरोप केला आहे. (No drugs seized at cruise, Aryan Khan’s panchnama manipulated, claims Nawab Malik)
मुंबई: एनसीबीने क्रूझवरील रेव्ह पार्टीवर केलेल्या कारवाईवरून राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांनी एनसीबी आणि भाजपवर गंभीर आरोप केला आहे. एनसीबीने क्रूझवर छापा मारलाच नव्हता. भाजपच्या एका उपाध्यक्षानेच ही कारवाई केली आहे. भाजपच्या कार्यकर्त्याने कोणत्या अधिकारात ही कारवाई केली? एनसीबीही भाजपची शाखा झाली आहे का?, असे सवाल नवाब मलिक यांनी केला आहे.
नवाब मलिक यांनी पत्रकार परिषद घेऊन भाजप आणि एसीबीवर गंभीर आरोप केले आहेत. तसेच मनिष भानुशालीचे काही फोटोही त्यांनी व्हायरल केले आहेत. एनसीबीने क्रूझवर कारवाई केलीच नाही. मनिष भानुशाली या व्यक्तीने आर्यन खानला ताब्यात घेतलं होतं. भानुशाली हा भाजपचा उपाध्यक्ष आहे. त्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, अमित शहा, जेपी नड्डा, देवेंद्र फडणवीस आणि आशिष शेलारांसोबतही फोटो आहेत, असं सांगतानाच भाजपच्या या कार्यकर्त्यांना अशी कारवाई करण्याचा अधिकार कुणी दिला? असा सवाल मलिक यांनी केला आहे.
क्रूझवर ड्रग्ज नव्हतंच
एनसीबीने त्या क्रूझवर छापेमारी केली नाही. शिवाय त्या क्रूझवर ड्रग्ज सापडलंच नाही, असा दवाही त्यांनी केला. तसेच मनिष भानुशाली यांचा गुजरात ड्रग्ज प्रकरणाशी काही कनेक्शन आहे का? असा सवालही त्यांनी केला.
मग तो नक्की कोण?
एनसीबीनं कारवाई केली, त्या कारवाईत एक व्यक्ती आर्यन खानला घेऊ जात आहे. त्याच्याबरोबर सेल्फी काढणायत आला. सेल्फी व्हायरला झाला. त्यातील व्यक्ती एनसीबीचा अधिकार नाही, असा दावा मलिक यांनी केला आहे. तो व्यक्ती एनसीबीचा नाही असं सांगण्यात आलं. मग हा व्यक्ती नक्की कोण? असा सवाल त्यांनी केला आहे.
अमली पदार्थाचे फोटो झोनल डिरेक्टरच्या ऑफिसचे
काही फोटो एनसीबीनं जारी केलेत. त्यात काही अमली पदार्थ दाखवण्यात आले आहेत. पण हे फोटो दिल्ली एनसीबीकडून जारी करण्यात आले आहेत. हे फोटो झोनल डिरेक्टरच्या ऑफीसचे आहेत. किरण गोसावी यांचा झोनल डिरेक्टरशी संबंध काय? एनसीबीनं उत्तर द्यावं, अशी मागणी त्यांनी केली आहे.
मलिक यांचे सवाल
>> मनिष भानुशाली क्रूझवर कसा? >> मनिष भानुशाली हे भाजपचे उपाध्यक्ष आहेत. भाजपच्या कार्यकर्त्याला कारवाई करण्याचा अधिकार आहे का? >> भानुशाली यांचा गुजरात ड्रग्ज प्रकरणाशी काही संबंध आहे का? >> किरण गोसावी यांचा झोनल डिरेक्टरशी संबंध काय? >> अमली पदार्थांचे व्हायरल झालेले फोटो कुठले?
VIDEO : 100 Super Fast News | सुपरफास्ट 100 न्यूज | 6 October 2021https://t.co/NusrP8DDaC#SuperFastNews100 #SuperFastNews #MarathiBatmya
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 6, 2021
संबंधित बातम्या:
कुठलही ड्रग्ज सापडलेलं नाही, आर्यन खान प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचा मोठा गौप्यस्फोट
स्वबळावर लढूनही भाजप नंबर 1, पण आघाडीची डोकेदुखी कायम; मनसेची साथ हवीच?
शिवसेनेला सर्वात मोठा धक्का, खासदारपुत्राचा जिल्हा परिषद पोटनिवडणुकीत पराभव
(No drugs seized at cruise, Aryan Khan’s panchnama manipulated, claims Nawab Malik)