Shivsena VS Shinde: दादर राड्यावेळी गोळीबार केलेला नाही, जाणीवपूर्वक बदनामीचा डाव, दादरच्या राड्यावर आमदार सदा सरवणकर काय म्हणाले?
आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, पोलिसांवर दबाव आणून कुणी गुन्हा दाखल केला असेल तर पोलीस त्याचा तपास करतील असेही सरवणकर यांनी स्पष्ट केले आहे. या भागातील आमदार असल्याने हा सगळा बदनामीचा प्रकार असल्याचा त्यांनी सांगितले. आपण कामातून मोठे झालेलो आहोत, भांडणे करुन मोठे झालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भविष्यात असे वाद करु नयेत, याची काळजी घ्यायला हवी. पोलिसांना मदत करण्यासाठी, त्यांनी चौकशीला बोलावले तर जाऊ असेही त्यांनी सांगितले.
मुंबई- दादर मध्ये झालेल्या शिवसेना (Shivsena)आणि शिंदे गटात (CM Eknath Shinde)झालेल्या वादाप्रकरणी सदा सरवणकर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. यानंतर आपण गोळीबार केलेला नाही, कोणताही गुन्हा केलेला नाही. जाणीवपूर्वक बदनाम करण्याची रणनीती असल्याचा आरोप शिंदे गटाचे आमदार सदा सरवणकर (Sada Sarvankar)यांनी केला आहे. आमदार आहे, शिंदे गटात गेल्यामुळे हे षडयंत्र करण्यात येते आहे. आपल्यासोबत स्टेनगनधारी पोलीस असताना मला पिस्तूल हातात घेण्याची काय गरज आहे, असे मला वाटत नाही.
आपण कोणताही गुन्हा केलेला नाही, पोलिसांवर दबाव आणून कुणी गुन्हा दाखल केला असेल तर पोलीस त्याचा तपास करतील असेही सरवणकर यांनी स्पष्ट केले आहे. या भागातील आमदार असल्याने हा सगळा बदनामीचा प्रकार असल्याचा त्यांनी सांगितले. आपण कामातून मोठे झालेलो आहोत, भांडणे करुन मोठे झालेले नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे. भविष्यात असे वाद करु नयेत, याची काळजी घ्यायला हवी. पोलिसांना मदत करण्यासाठी, त्यांनी चौकशीला बोलावले तर जाऊ असेही त्यांनी सांगितले.
पोस्टर फाडून, दगडफेक करुन माझे काम संपवता येणार नाही, असेही सरवणकर यांनी म्हटले आहे. यामागे बदनाम करण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप यांनी केले आहे. अशा प्रकारचा उद्रेक करण्यापेक्षा एकमेकांना कामाने जिंकू, असे विरोधकांना सदा सरवणकर यांनी सांगितले आहे. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा झाली नसल्याचेही त्यांनी सांगितले.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी काय झाले?
अनंत चतुर्दशीच्या दिवशी शिवसेनेच्या वतीने दरवर्षी स्वागत कक्ष असतो, त्याप्रमाणे तो स्वागत कक्ष उभारण्यात आला होता. तिथे मनसे आणि दुसऱ्या शिवसेनेचाही गट होता. त्यावेळी दुसऱ्या शिवसेनेच्या स्वागत कक्षातून एकमेकांना डिवचण्याचे प्रकार सुरु होते. घडलेला प्रकार हा दुर्दैवी आहे. त्यानंतर आपण तिथे पोहचल्यावर ते रोखण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी विनंती केल्यानंतर रात्री ११ वाजता स्वागत कक्ष बंद करण्यात आला.
शनिवारी रात्री काय झाले?
काल रात्री बारा वाजता शाखाप्रमुख संतोष तेलवणे यांच्यावर हल्ला करण्यासाठी काही जण पोहचले होते. अनंत चतुर्दशीच्या दिवशी स्वागत कक्षात झालेल्या डिवचण्याचा प्रकार झाला, त्याचा राग मनात धरुन हे तिथे पोहचले असे सरवणकर यांनी सांगितले. सोशल मीडियावर टीका झाली असेल तर त्याचे उत्तर सोशल मीडियातून द्यायला हवे. घरी जाऊन मारहाण करणे अयोग्य असल्याचे त्यांनी सांगितले. माहिती मिळाल्यावर तिथे गेलो तिथून पोलीस स्टेशनला गेलो. सणासुदीच्या दिवशी असे आपआपसात वाद करुन हिंदू समाज वेदना होतील, असे प्रकार घडू नये असे प्रयत्न करायला हवेत. ही सगळी एकाच कुटुंबातील एकत्र राहणारी मुलं आहेत, असे वाद चुकीचे आहेत. असेही सरवणकर