बोरिवलीमध्ये जोडप्यांच्या किसिंगने फेरफटका मारणारे हैराण, थेट रस्त्यावर सूचना लिहित इशारा
मुंबईच्या बोरवली परिसरात लागलेल्या पाट्या काहीशा वेगळ्या आहेत. त्या पाट्या वाचून भल्याभल्यांच्या भुवया उंचावतील.
मुंबई : तुम्ही आतापर्यंत नो हॉर्नच्या पाट्या वाचल्या असतील. सायलेंट झोनच्या पाट्याही वाचल्या असतील. तसंच नो पार्किंगच्या सुद्धा पाट्या वाचल्या असतील. मात्र, मुंबईच्या बोरवली परिसरात लागलेल्या पाट्या काहीशा वेगळ्या आहेत. त्या पाट्या वाचून भल्याभल्यांच्या भुवया उंचावतील. बोरवलीच्या जॉगर्स पार्कमध्ये लोक फेरफटका मारण्यासाठी येत असतात. मात्र, हे इथं लिहलंय “नो किसिंग झोन”. या जॉगर्स पार्कमध्ये अनेक कपल्स येत असतात. त्यांचे किसिंग पाहून इथल्या आसपासच्या सोसायटीतले लोक कंटाळले आहेत. त्यामुळे कंटाळलेल्या सोसायटीवाल्यांनी रस्त्यावरच ‘नो किसिंग झोन’ असं लिहिलंय.
जॉगर्स पार्कचा हा परिसर बोरवलीचा हाय प्रोफाईल परिसर आहे. याच हाय प्रोफाईल जागेमध्ये एक गार्डन बनवलं आहे. या गार्डनमध्ये रोज कपल्स येत असतात. आडोसा पाहून कुठेतरी बसत असतात. कुठल्यातरी कोपऱ्यात उभे राहतात आणि किसिंग करतात. यामुळे आसपास राहणाऱ्या इमारतीमधील महिला आणि वृद्ध व्यक्ती मात्र रोज हे पाहून हैराण झाले.
किसिंगचे वाढणारे हे प्रकार लक्षात घेता सोसायटीतल्या लोकांनी आता एक नामी शक्कल लढवली. या किसिंग करणाऱ्या कपल्सला वेसण घालण्यासाठी त्यांनी सोसायटीच्या बाहेर असणाऱ्या रस्त्यावरच ‘नो किसिंग झोन’ अशी जाहीर सूचना लिहिली. हा मेसेज लिहिल्यानंतर या भागामध्ये कपल्स कमी झालेत आणि किसिंगचे प्रकारही बंद झाले आहेत.
हेही वाचा :
Video | नवरीला भर मंडपात उचललं, पुन्हा पुन्हा किस करण्याचा प्रयत्न, नवरदेवाचा व्हिडीओ व्हायरल
व्हिडीओ पाहा :
No Kissing Zone in Borivali by Local residents near jogging park