Maharashtra Assembly Election Results 2024: मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न होते, आता ‘मविआ’तील पक्षांना विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नाही, काय आहे तो नियम?

maha vikas aghadi: विरोधी पक्ष नेतेपद लोकशाहीत महत्वाचे असते. विधिमंडळात विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिलेला असतो. त्यानुसारच विरोधी पक्षनेतपदाला पगार, भत्ते आणि सुविधा मिळत असतात. विरोधी पक्षनेता सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेऊन असतो. सरकारच्या धोरणांवर जाब विचारु शकतो.

Maharashtra Assembly Election Results 2024: मुख्यमंत्रीपदाचे स्वप्न होते, आता 'मविआ'तील पक्षांना विरोधी पक्षनेतेपदही मिळणार नाही, काय आहे तो नियम?
maha vikas aghadi
Follow us
| Updated on: Nov 24, 2024 | 11:50 AM

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल आता बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. महायुतीने डबल सेंचुरी केली आहे. महायुतीने 215 पेक्षा जास्त जागांवर विजय मिळवताना दिसत आहे. महाविकास आघाडी अर्धशतक करत आहे. महाविकास आघाडीला 52 जागा मिळताना दिसत आहे. निकालात भाजपला 125, शिवसेना 55 तर राष्ट्रवादी काँग्रेसला 38 जागा मिळताना दिसत आहे. महाविकास आघाडीतील काँग्रेस 20, शिवसेना उबाठा 19 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 13 जागा मिळत आहे. महाविकास आघाडीकडून यापूर्वी मुख्यमंत्रीपदाचा दावा केला जात होता. शिवसेना उबाठा आणि काँग्रेसमध्ये मुख्यमंत्रीपदावरुन भांडण सुरु झाले होते. परंतु आता त्यांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार नाही. राज्यात प्रथमच विधानसभेत विरोधी पक्षनेतेपद नसणार आहे. त्याला कारण घटनेतील एक नियम आहे.

काय आहे तो नियम

महाराष्ट्राच्या विधिमंडळाचे माजी मुख्य सचिव डॉ. अनंत कळसे यांनी संसदेतील त्या नियमाची माहिती दिली. लोकसभा असो की राज्याची विधानसभा असो विरोधीपक्षनेतेपद मिळण्यासाठी त्या पक्षाला एकूण जागांचा दहा टक्के जागा मिळणे आवश्यक आहे. आताची परिस्थिती पाहिली तर विरोधी पक्ष असलेल्या काँग्रेस 20, शिवसेना उबाठा 19 आणि शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 13 जागा मिळत आहे. तिघांपैकी एकाही पक्षाला विरोधी पक्षनेतेपदासाठी 28 चा जादूई आकडा गाठता येणार नाही. त्यामुळे राज्यात आता विरोधीपक्षनेतेपद नसणार आहे.

लोकसभेत दहा वर्ष विरोधी पक्षनेता नव्हते

लोकसभेत 2014च्या निवडणुकीत आणि 2019च्या निवडणुकीत विरोधी पक्षनेतेपद नव्हते. कारण या दोन्ही निवडणुकीत कोणत्याही पक्षाला दहा टक्के जागा मिळाल्या नव्हत्या. लोकसभेत 543 जागा आहे. त्यापैकी 55 जागा एखाद्या पक्षाला मिळायला हव्या होत्या. परंतु विरोधात असलेल्या कोणत्याही पक्षाला या जागा मिळाल्या नाही. 2014च्या निवडणुकीत काँग्रेसला 44 जागा तर 2019च्या निवडणुकीत काँग्रेसला 52 जागा मिळाल्या आल्या. त्यामुळे लोकसभेत विरोधी पक्षनेताच नव्हता. 2024च्या निवडणुकांमध्ये काँग्रेसने 99 जागा जिंकल्या. त्यामुळे आता विरोधी पक्षनेतेपद राहुल गांधी यांना मिळाले.

हे सुद्धा वाचा

का असते विरोधी पक्षनेतेपदाचे महत्व

विरोधी पक्ष नेतेपद लोकशाहीत महत्वाचे असते. विधिमंडळात विरोधी पक्ष नेत्याला कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा दिलेला असतो. त्यानुसारच विरोधी पक्षनेतपदाला पगार, भत्ते आणि सुविधा मिळत असतात. विरोधी पक्षनेता सरकारच्या कामकाजावर लक्ष ठेऊन असतो. सरकारच्या धोरणांवर जाब विचारु शकतो. सरकारच्या कामकाजावर नियंत्रण ठेवण्याचे काम विरोधी पक्षनेता करतो असतो. विधानसभेच्या महत्वाच्या विषयांवर चर्चा आणि प्रस्तावांवर विरोधी पक्ष नेत्याची भूमिका महत्त्वाची असते. विधिमंडळात विरोधकाचा आवाज नसेल तर सरकार मनमानी कायदे करु शकतो. त्यामुळे विरोधी पक्षाचा धाक असणे महत्वाचे आहे.

उत्तर महाराष्ट्रातील निवडणूक निकालाचे प्रत्येक अपडेट वाचा

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल 2024 LIVE Counting

महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा
सतीश वाघ यांच्या हत्येची 5 लाखांची सुपारी, पत्नीनेच काढला पतीचा काटा.
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप
मुंडेंनी 118 पोलिंग बुथवर मतदारांना अडवलं, संजय राऊत यांचा आरोप.
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी
पुण्यात अल्पवयीन बहि‍णींची हत्या, आरोपीचा एन्काऊंटर करण्याची मागणी.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये..
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी घडामोड, CIDचे अडीशनल डीजी बीडमध्ये...
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन
देवेंद्रजी पर्यटन म्हणून तरी बीडला जा, अंजली दमानिया यांचे आवाहन.
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन
सदावर्तेंमुळे एसटी बँकेचे वाटोळे, कर्मचाऱ्यांचे या तारखेला आंदोलन.
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा
सोलापूरात कृषी उत्पन्न बाजार समितीत लसणाचे दर काय ? पाहा.
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?
विनोद कांबळी याच्या उपचाराची जबाबदारी आमची, काय म्हणाले परिवहनमंत्री?.