उद्घाटनप्रसंगी कोणतंही राजकारण करणार नाही, राणेंची घोषणा, सौजन्यशील की बॅकफुटवर?
चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी शिवसेनेच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याची घोषणा केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली होती. (no politics in chipi airport inauguration programme, says narayan rane)
मुंबई: चिपी विमानतळाच्या उद्घाटनावेळी शिवसेनेच्या नेत्यांच्या भ्रष्टाचाराची पोलखोल करणार असल्याची घोषणा केंद्रीय सुक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे यांनी केली होती. मात्र, 18 तास होत नाही तोच राणे बॅकफूटवर गेले आहेत. उद्घाटनप्रसंगी कोणतंही राजकारण करणार नाही. कार्यक्रमाला गालबोट लागेल असं कोणतंही कृत्या आमच्याकडून होणार नाही, असं नारायण राणे यांनी स्पष्ट केलं.
नारायण राणे आज सपत्नीक चिपी विमानतळाच्या उद्घाटनासाठी निघाले. त्यावेळी त्यांनी मीडियाशी संवाद साधताना हे विधान केलं. आम्ही कोणतंही राजकारण करणार नाही. राजकारण केलं जाणार नाही. उद्घाटनाला कोणतंही गालबोट लागणार नाही हे आम्ही पाहू, असं राणे म्हणाले.
बऱ्याच वर्षाने चांगला योग आला
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तुम्ही एकाच व्यासपिठावर येत आहात, याकडेही राणेंचं लक्ष वेधण्यात आलं. ही चांगली गोष्ट आहे. बऱ्याच वर्षाने हा योग आला, असं राणे म्हणाले. पुन्हा हा योग येईल का? असा सवाल केला असता ते मुख्यमंत्र्यांनाच विचारा, असं सांगून राणेंनी अधिक बोलण्यास नकार दिला.
प्रहार करताना कोण सांगतं का?
शिवसेनेवर प्रहार करणार का? असा सवालही राणेंना विचारण्यात आला. त्यावर प्रहार करताना कोण सांगतं का? जो समोर असतो त्याच्यावर प्रहार होत असतो, असं त्यांनी स्पष्ट केलं.
माझ्याकडे 80 टक्के उद्योग
निमंत्रण पत्रिकेत राणेंचं नाव बारीक अक्षरात लिहिण्यात आलं आहे. त्यावरुन शिवसेनेने त्यांची खिल्ली उडवली आहे. त्यावरही त्यांनी भाष्य केलं. माझ्याकडे सुक्ष्मच नाही तर लघु आणि मध्यम उद्योग मंत्रीपद आहे. 80 टक्के उद्योग माझ्या हातात आहे. हे काही लोकांना कळत नाही, असं ते म्हणाले.
ठाकरे-राणे एकाच मंचावर
सिंधुदुर्गातील बहुचर्चित चिपी विमानतळाच्या उद्घाटनाचा मुहूर्त अखेर ठरला. चिपी विमानतळाचे उद्घाटन आज 9 ऑक्टोबर रोजी दुपारी 12.30 वाजता नागरी उड्डाण मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्मंत्री अजित पवार, शिवसेना नेते सुभाष देसाई, विनायक राऊत, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, केंद्रीय मंत्री नारायण राणे, केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य सिंधीया, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, परिवहनमंत्री अनिल परब उपस्थित राहणार आहेत. दरम्यान ठाकरे-राणे-शिंदे एकाच व्यासपीठावर उपस्थित राहणार असल्याने कोकणासाठी आज मोठा दिवस आहे.
MahaFast News 100 | महाफास्ट न्यूज 100 | 7 AM | 9 October 2021 https://t.co/IYnP9ZfALa #News #Bulletin
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 9, 2021
संबंधित बातम्या:
12GB/256GB, Zeiss T कोटिंगसह 50MP कॅमेरा, Vivo चा शानदार स्मार्टफोन बाजारात, किंमत…
(no politics in chipi airport inauguration programme, says narayan rane)