मुंबई: पुण्यातील जम्बो कोव्हिड सेंटरमध्ये (jumbo covid centre) भ्रष्टाचार झाल्याचा भाजप नेते किरीट सोमय्या (kirit somaiya) यांनी आरोप केला आहे. या घोटाळ्यात त्यांनी शिवसेना नेते संजय राऊत (sanjay raut) यांच्या निकटवर्तीयांचा समावेश असल्याचा दावा केला आहे. सोमय्या यांच्या या आरोपांना शिवसेना प्रत्युत्तर देणार आहे. येत्या मंगळवारी 15 फेब्रुवारी रोजी शिवसेनेची पत्रकार परिषद होणार आहे. ही माझी पत्रकार परिषद नसेल. ती शिवसेनेची असेल. त्यानंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद असेल. त्यामुळे तुम्हाला काय फायली काढायच्या त्या काढा. जेवढं भुंकायचं असेल तेवढं भुंका, असं शिवसेना नेते संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी मीडियाशी संवाद साधताना भाजपला करारा जवाब देणार असल्याचं स्पष्ट केलं. त्यामुळे शिवसेना काय उत्तर देणार? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
कोव्हिड सेंटरमध्ये कोणताही घोटाळा झाला नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केलं आहे. पण काही लोक भुंकत असतील. सवय असेल काही लोकांना भुंकायची. सवय असते काही लोकांना भुंकू द्या. कोव्हिडला लोक घाबरत होते अशा वेळी काही संस्था लोक पुढे आले. त्यांनी कोव्हिड सेंटर चालवले. त्यावेळी भाजपचे लोकं नव्हते. घाबरत होते. राजकारण नंतर समाजकारण आधी, हा आमचा वसा आहे. त्यानुसार आम्ही काम केलं. तुमच्याही फायली तयार आहेत. तेव्हा कळेल फायली काय असतात. आम्ही तुम्हाला घाबरत नाही. तुमच्या पोटात दुखत असेल तर पोटावर उपचार करू, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.
येत्या मंगळवारी 15 फेब्रुवारी रोजी दुपारी 4 वाजता पत्रकार परिषद घेण्यात येईल. ही पत्रकार परिषद शिवसेनेची असेल. माझी नसेल. त्या आधी काय फायली दाखवायच्या त्या दाखवा. नंतर महाविकास आघाडीची पत्रकार परिषद घेऊ, असंही राऊत यांनी सांगितलं.
कोव्हिड सेंटरचे भ्रष्टाचार काढणाऱ्यांना रुग्णालयात भरती करा, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरही राऊत यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ते योग्य आहे. कोव्हिडच्या काळात केलेल्या कामाचं मुंबई आणि महाराष्ट्राचं कोर्टाने आणि सर्व जगाने कौतुक केलं. त्याची वेदना त्यांना आहे. आमच्याकडे गंगेत मृतदेह वाहत नव्हते. कुणाला एफआयआर दाखल करायचे असेल तर काशी आणि वाराणासीत जाऊन करावे. तिथे जाऊन सेंट्रल एजन्सीकडून चौकशीची मागणी करावी. कुणी भुकंत असेल तर येथील राज्यातील जनता लक्ष देत नाही, असंही ते म्हणाले.
Video : Special Report | नियमानं कंत्राट मिळवलं, किरीट सोमय्या यांचे आरोप चहावाले राजीव साळुंखेंंनी फेटाळले https://t.co/TVoFUkzoVP @KiritSomaiya @rautsanjay61 @BJP4Maharashtra @AjitPawarSpeaks @OfficeofUT #KiritSomaiya #CovidCenterScam #RajivSalunkhe #MahaVikasAghadi
— TV9 Marathi (@TV9Marathi) February 12, 2022
संबंधित बातम्या:
अहमदनगरच्या श्रीगोंद्यात भीषण अपघात, कारची ऊसाच्या ट्रेलरला धडक, तीन मित्रांचा तो प्रवास ठरला अखेरचा
Maharashtra News Live Update : आदित्य ठाकरे डॉ. सलीम अली पक्षी अभयारण्याची करणार पाहणी
कोण आहेत मुंबईतले चहावाले राजीव साळुंखे ज्यांना थेट पुण्यातलं कोविड सेंटर चालवायला मिळालं?