मुंबईकरांसाठी महत्वाची बातमी; 2 आणि 3 डिसेंबरला ‘या’ भागांत पाणीपुरवठा बंद
दिनांक 2 आणि 3 डिसेंबर 2020 रोजी या कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे सदर कालावधीत ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या ( Mumbai Municipal Corporation) ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील गावडे चौक, सेनापती बापट मार्ग इथे अस्तित्वात असलेल्या ब्रिटिशकालीन 1450 मिली मीटर व्यासाच्या तानसा (पूर्व) मुख्य जल वाहिनीवरील गळती दुरुस्तीचं काम सुरू होणार आहे. दिनांक 2 आणि 3 डिसेंबर 2020 रोजी या कामाला सुरुवात होणार आहे. यामुळे सदर कालावधीत ‘जी दक्षिण’ आणि ‘जी उत्तर’ विभागातील काही परिसरांमध्ये पाणीपुरवठा (water supply) होणार नाही. (no water supply in mumbai Dadar Prabhadevi Mahim on 2nd and 3rd December use water sparingly and carefully)
मिळालेल्या माहितीनुसार, 2 डिसेंबरला सकाळी 8 वाजेपासून 3 डिसेंबरला दुपारी 2 वाजेपर्यंत हे काम पूर्ण करण्यात येईल. यामुळे ठराविक भागात पाणी पुरवठा होणार नसून काही परिसरांमध्ये कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती पालिकेकडून देण्यात आली आहे. यामध्ये ज्या परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही, त्या परिसरांची नावं आणि संबंधित माहिती पुढीलप्रमाणे देण्यात आली आहे.
1. जी दक्षिण
– बुधवार दिनांक 02.12.2020 रोजी दुपारी 2 ते 3 (डिलाईल रोड); दुपारी 3.30 ते सायं. 7 (सिटी सप्लाय)
– परिसर – ना. म. जोशी मार्ग,
– बी. डी. डी. चाळ, प्रभादेवी, जनता वसाहत, आदर्श नगर, एलफिस्टन (लोअर परळ);
– या परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही.
2. जी उत्तर
– बुधवार दिनांक 02.12.2020 रोजी सायं. 4 ते 7; तसेच सायं. 7 ते रात्री 10
– परिसर – एलफिस्टन (लोअर परळ), काकासाहेब गाडगीळ मार्ग, सेनापती बापट मार्ग, गोखले मार्ग, वीर सावरकर मार्ग, एल. जे. मार्ग, सयानी मार्ग, भवानी शंकर मार्ग, सेनाभवन परिसर, मोरी मार्ग, टि. एच. कटारीया मार्ग, कापड बाजार, माहीम (पश्चिम) पूर्ण परिसर, माटुंगा (पश्चिम) आणि दादर (पश्चिम) या परिसरांमध्ये पूर्णतः पाणीपुरवठा होणार नाही.
3. जी दक्षिण
– गुरुवार दिनांक 3.12.2020 रोजी पहाटे 4.30 ते सकाळी 7.45 (डिलाईल रोड)
– परिसर – ना. म. जोशी मार्ग, बी. डी. डी. चाळ, सखाराम बाळा पवार मार्ग, महादेव पालव मार्ग या परिसरांमध्ये पाणीपुरवठा होणार नाही. तसंच ज्या परिसरांमध्ये पाणीपुरवठा कमी दाबाने होणार आहे त्या परिसरांची नावं खाली देण्यात आली आहेत.
जी दक्षिण
– गुरुवार दिनांक 3.12.2020 रोजी पहाटे 4 ते सकाळी 7 (क्लार्क रोड)
– परिसर – धोबी घाट, सातरस्ता; या भागात कमी दाबाने पाणीपुरवठा होईल (no water supply in mumbai Dadar Prabhadevi Mahim on 2nd and 3rd December use water sparingly and carefully)
दरम्यान, संबंधित परिसरातील नागरिकांनी आदल्या दिवशी पुरेसा पाणीसाठा करुन ठेवावा असं पालिकेकडून आवाहन करण्यात आलं आहे. तसंच पाण्याचा काटकसरीने वापर करुन सदर जलवाहिनी गळती दुरुस्ती कालावधीमध्ये महानगरपालिका प्रशासनास सहकार्य करावं असं आवाहन करण्यात आलं आहे.
इतर बातम्या –
मुंबईतील पाणी कपात टाळण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणार, मुख्यमंत्र्यांचा निर्णय
सह्याद्रीचं पाणी आणल्यास दुष्काळ संपेल, या सरकारकडून मराठवाड्यावर अन्याय : देवेंद्र फडणवीस
Video | Kishori Pednekar | मुंबईत पाणी कपात टाळण्यासाठी समुद्राचे खारे पाणी गोडे करणार – किशोरी पेडणेकर pic.twitter.com/hk6FuLwMyE
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 23, 2020
(no water supply in mumbai Dadar Prabhadevi Mahim on 2nd and 3rd December use water sparingly and carefully)