AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दिवाळीपुरती नव्हे तर मेट्रो आता कायमची रात्री उशीरापर्यंत धावणार, पाहा काय झाला बदल

मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी दिवाळी निमित्त मेट्रोची वेळ वाढविण्यासाठी एमएमआरडीएला पत्र लिहीले होते. त्यावर मुख्यमंत्र्यांनी मेट्रोची वेळ केवळ सणापुरती न वाढवता नियमितपणे वाढविण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. 

दिवाळीपुरती नव्हे तर मेट्रो आता कायमची रात्री उशीरापर्यंत धावणार, पाहा काय झाला बदल
Metro 2A and Meto 7 Image Credit source: socialmedia
Follow us
| Updated on: Nov 10, 2023 | 1:54 PM

मुंबई | 10 नोव्हेंबर 2023 : मुंबईत पश्चिम उपनगरातील प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो – 2 अ आणि मेट्रो – 7 ची सेवा रात्री उशीरापर्यंत चालविण्याचा निर्णय एमएमआरडीए प्रशासनाने घेतला आहे. दिवाळीनिमित्त मुंबईकरांना रात्री उशीरापर्यंत मेट्रोने प्रवास करायला मिळणार आहे. एमएमआरडीएचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तांना पत्र लिहून मेट्रोची सेवा रात्री उशीरापर्यंत चालविण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता केवळ सणापुरताच नव्हे तर येत्या शनिवार 11 नोव्हेंबरपासून मेट्रोच्या वेळेत कायम स्वरुपी वाढ करण्यात आली आहे, मेट्रोची सेवा आता रात्री 10.30 ऐवजी रात्री 11 वाजेपर्यंत सुरु रहाणार आहे.

मेट्रो मार्ग – 2 अ आणि मेट्रो – 7 ची सुविधा सुरु झाल्यापासून पश्चिम उपनगरातील प्रवाशांची वाहतूक कोंडी आणि प्रदुषणातून सुटका झाली आहे. मुंबईतील पहिली मेट्रो घाटकोपर ते वर्सोवा मुंबई मेट्रो वनशी कनेक्शन झाल्याने दोन्ही मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. नवरात्री महोत्सवात मुंबईकरांच्या सोयीसाठी मेट्रो- मार्ग – 2 अ आणि मेट्रो – 7 रात्री उशीरापर्यंत चालवून दिलासा देण्यात आला होता. आता दिवाळीतही मेट्रोची सेवा रात्री 10.30 ऐवजी रात्री 11 वाजेपर्यंत चालवून प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईकरांना दिवाळीचे जणू गिफ्ट मिळाले आहे.

असा झाला वेळापत्रकात बदल

मुंबई मेट्रो मार्ग 2 अ च्या अंधेरी पश्चिम स्थानकावरून आणि मेट्रो मार्ग 7 च्या गुंदवली स्थानकावरून शेवटची मेट्रो आता 10.30 ऐवजी रात्री 11 वाजता सुटणार आहे. सध्या मेट्रो मार्ग 2 अ आणि 7 वर गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान सोमवार-शुक्रवार सकाळी 5.55 ते रात्री 10.30 या कालावधीत सुमारे मेट्रोच्या 253 फेऱ्या या साडे सात ते साडे दहा मिनिटांच्या अंतराने चालविण्यात येतात. आता या स्थानकांदरम्यान स. 5.55 ते रात्री 11 दरम्यान मेट्रोच्या 257 फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. तसेच, रात्री 10 वाजल्यानंतर दहिसर पश्चिम ते गुंदवलीपर्यंत दोन अतिरिक्त मेट्रोच्या फेऱ्या तर डहाणूकरवाडी ते अंधेरी पश्चिम दरम्यान दोन अतिरिक्त मेट्रो फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ‘मेट्रो मार्ग 2अ आणि 7 वर आत्तापर्यंत सुमारे सहा कोटी नागरिकांनी प्रवास केला आहे. तर जवळपास 1.6 लाख मुंबईकरांनी मेट्रो वन कार्ड खरेदी केले आहे.

'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'
'राऊत उलट्या पायाचे बांडगुळ, शरद पवारांच्या घरात भांडी घासण्याचं...'.
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट
...म्हणून तेव्हा मोदींची अटक टळली, राऊतांचे खळबळजनक गौप्यस्फोट.
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर
भारताविरोधातील चीनच्या कुरापती अन् गुन्ह्यांचे 10 पुरावे समोर.
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल
मुरिदकेच्या मरकजवर भारताचा हल्ला अन् पाक पत्रकाराचं रिपोर्टिंग व्हायरल.
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द
भारतीय पर्यटकांनी टाकला तुर्कीवर बहिष्कार; सगळ्या सहली रद्द.
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं
बीएसएफने पाकिस्तानचं ऑब्जर्वेशन टॉवर उद्ध्वस्त केलं.
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी
तुलबुल प्रकल्प सुरू करण्याची ओमर अब्दुल्ला यांची मागणी.
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार
नरकातला राऊत... 'त्या' पुस्तकासंदर्भात बावनकुळे राऊतांना पत्र लिहीणार.
आयएमएफकडून मिळालेल्या पैशातून पाकिस्तान टेरर फंडिंग करतो - राजनाथ सिंह
आयएमएफकडून मिळालेल्या पैशातून पाकिस्तान टेरर फंडिंग करतो - राजनाथ सिंह.
राऊतांच्या पुस्तकावर विचारताच फडणवीस म्हणाले, माझं वय बालवाङ्मय...
राऊतांच्या पुस्तकावर विचारताच फडणवीस म्हणाले, माझं वय बालवाङ्मय....