AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

महाविकासआघाडीच्या नेत्यांनीही रेमडेसिव्हीरचा साठा करुन ठेवलाय; मनसेच्या नेत्याचा आरोप

जनतेचा जीव महत्त्वाचा आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांना Remedisivir इंजेक्शन उपलब्ध होणे गरजेचे आहे | remdesivir injection mns

महाविकासआघाडीच्या नेत्यांनीही रेमडेसिव्हीरचा साठा करुन ठेवलाय; मनसेच्या नेत्याचा आरोप
REMDESIVIR
Follow us
| Updated on: Apr 18, 2021 | 4:24 PM

मुंबई: कोरोनाच्या उपचारांमध्ये महत्त्वपूर्ण ठरत असलेल्या रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सवरुन सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या लढाईत आता मनसेनेही (MNS) उडी घेतली आहे. रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा (Remdesivir injection) साठा केवळ भाजपकडेच नव्हे तर महाविकासआघाडीच्या नेत्यांकडेही आहे, असा आरोप मनसेचे नेते अखिल चित्रे यांनी केला आहे. (Mahavikas Aghadi leaders also stock remdesivir injection)

अखिल चित्रे यांनी यासंदर्भात ट्विट करत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना लक्ष्य केले. रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा साठा मविआ आमदारांकडेही आहे. काँग्रेसचे आमदार झिशान सिद्दीकी त्याचे वाटपही करत आहेत. नवाब मलिक यांनी याबाबतही जरा बोलावे. तुमचे राजकारण बंद करा, जनतेचा जीव महत्त्वाचा आहे. कोरोनाग्रस्त रूग्णांना Remedisivir इंजेक्शन उपलब्ध होणे गरजेचे आहे, असे अखिल चित्रे यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

राजकीय पक्ष चॅरिटीसाठी औषधं खरेदी करु शकत नाहीत, भाजपच्या नेत्यांवर गुन्हा करा: आम आदमी पक्ष

राज्यात रेमडेसिवीर इंजेक्शन्सच्या पुरवठ्यावरुन महाविकासआघाडी सरकार आणि भाजप नेत्यांमध्ये सुरु असलेल्या आरोप-प्रत्यारोपांच्या लढाईत आता आम आदमी पक्षाने (आप) उडी घेतली आहे. कोणताही राजकीय पक्ष चॅरिटीसाठी औषधं खरेदी करु शकत नाही. त्यामुळे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासह भाजपच्या नेत्यांवर गुन्हे दाखल करा, अशी मागणी ‘आप’च्या नेत्या प्रिती शर्मा यांनी केली आहे.

रेमडिसिवीरच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे महाराष्ट्रात माणसं मृत्यूमुखी पडत असताना भाजपा रेमडिसिवीरचा जो पुरवठा करत आहे त्याचा आप पक्ष निषेध करतो. माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी वक्तव्य केलं आहे की, भाजप नेते प्रसाद लाड हे भाजपच्या बाजूने दमणला जाऊन येऊन ब्रुक फार्मा यांना भेटून आले. या करता त्यांनी रेमडिसिवीरच्या आयातीच्या परवानगीसाठी केंद्र सरकारचा वापर केला. तीच ताकद वापरून भाजपा ने ब्रुक फार्म यांच्याकडून रेमडिसिवीरचा स्टॉक विकत घेतला. राजकीय पक्ष हे इलेक्शन कमिशनला रजिस्टर असतात, चॅरिटी कमिशनला नाही. कोणत्याही प्रकारच्या डोनेशनसाठी एखाद्या पक्षाने ड्रग्ज, औषधं विकत घेणं हे पूर्णतः बेकायदेशीर आहे, असे प्रिती शर्मा यांनी आपल्या पत्रकात म्हटले आहे.

संबंधित बातम्या:

मीदेखील विरोधी पक्षनेता होतो, पण संकटाच्या काळात कधीही असला खेळ खेळला नाही; खडसेंनी फडणवीसांना फटकारले

VIDEO: ‘त्या’ कंपनीच्या मालकासाठी देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे नेते इतक्या तातडीने पोलीस ठाण्यात का गेले?

फार्मा कंपनीकडे रेमडेसिव्हीर इंजेक्शन्सचा मोठा साठा? मुंबई पोलिसांनी मालकाला घेतले ताब्यात; फडणवीस पोहोचले पोलीस ठाण्यात

(Mahavikas Aghadi leaders also stock remdesivir injection)

'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत
'पहलगाम'वरून मविआतील मतभेद उघड, पवार अन् राऊतांचं वेगळं मत.
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'
‘सिंधू’ करार स्थगितीचा प्लॅन ठरला... पाकिस्तानवर 'वॉटर स्ट्राईक'.
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली
'ही आमची चूक...', पाकच्या रक्षा मंत्री ख्वाजा आसिफ यांची मोठी कबुली.
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्...
पहलगाम हल्ल्यानंतर काहीतरी मोठं घडणार? शाहांकडून बैठकांचा सपाटा अन्....
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?
'काश्मीर जन्नत', हल्ल्यानंतर पहलगाम पर्यटकांनी फुललं, सध्या माहौल कसा?.
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'
'शरद पवारांनी मृत्यू झालेल्यांच्या नातेवाईकांकडून घटना ऐकावी, मग...'.
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!
पहलगामच्या हल्ल्यात आदिलचा मृत्यू, शिंदेंनी घेतला झटक्यात मोठा निर्णय!.
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक
सिंधु पाणी करारावर आज महत्वाची बैठक.
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'
काश्मीरमध्ये अडकलेले महाराष्ट्रातील पर्यटक म्हणताय, 'I Love Kashmir'.
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली
पाकिस्तानचे धाबे दणाणले; आंतरराष्ट्रीय सीमेवर देखील सुरक्षा वाढवली.